धर्माची मर्यादा ओलांडून लिव्ह इन मध्येही राहिले, ४१ वर्षांचा रत्ना-नसिरूद्धीन शाहचा संसार प्रेरणात्मक

रत्ना पाठक आणि नसिरूद्धीन शाह ही बॉलीवूडमधील टॅलेंटेड जोडी. मालिका, चित्रपट क्षेत्रात दोघांचेही अमूल्य योगदान आहे. अशा रत्ना पाठकचा आज वाढदिवस असून नसीर आणि रत्ना पाठकची लव्ह स्टोरी कशी आहे हे जाणून घेऊया. ४१ वर्षांपूर्वी रत्ना आणि नसीरूद्धीन शाह यांनी लग्न केले. थिएटरमध्ये पहिली भेट ते लिव्ह इन रिलेशनशिप आणि नंतर लग्न असा प्रवास दोघांनी मिळून केला आहे.

इतक्या वर्षांपूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणं म्हणजे अत्यंत पुढारलेले विचार असणारे दोन्ही व्यक्तीमत्व असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. संसार करणे हे नक्कीच जबाबदारीचे काम असते आणि विवाहित माणसाशी, त्याशिवाय वेगळ्या धर्मातील माणसाशी लग्न करून ते टिकवून ठेवणेही जिकिरीचे काम रत्नाने करून दाखविले आहे. या दोघांच्या लव्ह – स्टोरीतून नक्कीच प्रेरणा घेता येईल. (फोटो सौजन्य – @naseeruddin49, @ratnapathakshah Instagram)

थिएटरमध्ये झाली पहिली भेट

थिएटरमध्ये झाली पहिली भेट

​‘संभोग से संन्यास तक’ नाटकाच्या वेळी रत्ना पाठक आणि नसीरूद्धीन शाह यांची पहिल्यांदा भेट झाली. तेव्हा दोघेही कॉलेजमध्ये होते. एका मुलाखतीत रत्ना पाठक यांनी हे पहिल्या नजरेतलं प्रेम नसल्याचा खुलासा केला होता. डायरेक्टरने ओळख करून दिली तेव्हा नसीर साहेबांचं नावही रत्ना पाठक यांना माहीत नव्हतं. मात्र दुसऱ्या दिवशीपासून दोघांनी एकमेकांसह वेळ घालवायला सुरूवात केली होती.

हेही वाचा :  लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये शोषण होतंय, वेळीच पडा बाहेर पाहू नका अंत!

मैत्रीनंतर प्रेम

मैत्रीनंतर प्रेम

या नाटकाच्या सरावादरम्यान दोघे एकमेकांजवळ येऊ लागले आणि एकत्र काम केल्यामुळे प्रेमात पडले. काही वेळानंतर दोघांनी साधारण काही दिवसांनी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते. तर १९८२ च्या त्या काळात दोघांनी लिव्हइनमध्ये राहून दाखवले आणि त्याचवर्षी रत्ना पाठकच्या आईच्या घरीच रजिस्टर्ड मॅरेज केले.

(वाचा – Saina Parupalli Love Story: १० व्या वर्षी प्रेमात, १८ वर्ष दुनियेपासून लपवले प्रेम, पारूपल्लीशी त्यानंतर बांधली लग्नगाठ )

रत्ना झाली होती नसीरचा आधार

रत्ना झाली होती नसीरचा आधार

रत्नाने एका मुलाखतीत स्पष्ट केले होते. त्यांचे लग्न होणे सोपे नव्हते. नसीरूद्धीनचे पहिले लग्न झाले होते आणि त्याशिवाय ते १३ वर्षांनी रत्ना यांच्यापेक्षा मोठे होते. नसीर यांच्या पहिली पत्नी पाकिस्तानी होती आणि त्यांच्यापेक्षा १६ वर्षांनी मोठी होती. दोघांचे पटत नव्हते आणि त्याचवेळी रत्ना त्यांच्या आयुष्यात आली होती. नसीरूद्दीन यांच्या रत्ना एक आधार झाल्या होत्या.

(वाचा – Alia Bhatt Birthday: आलिया – रणबीरची ‘अजब प्रेम की गजब कहानी’, लहानपणापासूनच्या क्रशसह लग्नबंधनात )

नसीर विवाहित आणि एका मुलीचा पिता

नसीर विवाहित आणि एका मुलीचा पिता

नसीर विवाहित होते आणि त्याशिवाय रत्नाशी लग्न झाले त्याआधी एका मुलीचा पिता होते. हीबा नावाची मुलगी नसीरला पहिल्या पत्नीपासून झाली होती. त्याशिवाय रत्ना हिंदू तर नसीर मुस्लीम असल्यामुळे लग्नात आडकाठी येण्याची शक्यता होती. मात्र रत्नाने आणि नसीरने एकमेकांना साथ देत हे लग्न यशस्वी करून दाखवले. इतकंच नाही तर हीबाचीही रत्नाने आपली मुलं विवान आणि इमादसह अत्यंत काळजी घेतली.

हेही वाचा :  कोल्हापूर राड्याप्रकरणी आतापर्यंत 36 जणांना अटक, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणारे कॉलेज विद्यार्थी

(वाचा – हिंदू-मुस्लीम विभिन्न धर्म पण खऱ्या अर्थाने जिंकलं प्रेम, मिनी माथुर – कबीर खानच्या लग्नाला झाली २५ वर्ष)

रत्नाच्या सामंजस्यावर फिदा नसीर

रत्नाच्या सामंजस्यावर फिदा नसीर

नसीरूद्धीन शाह यांना रत्नाच्या अभिनय कलेसह तिच्या सामंजस्याबाबतही प्रेम होते. प्रत्येक गोष्टीतील तिची असणारी समज त्यांना रत्नाच्या अधिक प्रेमात पाडत होती आणि त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केली होती.

मैत्री महत्त्वाची

मैत्री महत्त्वाची

एका मुलाखतीमध्ये रत्ना पाठकने स्पष्ट केले होते, ‘आमचे नाते अत्यंत छान आहे. मैत्रीचे हे नाते आजही तसंच टिकून आहे. नसीर मेहनती तर मी आळशी आहे. त्यांच्याकडे बघून मी मेहनत करते.’ एकमेकांना कायम साथ दिल्यामुळेच ४१ वर्षांचा संसार सुरळीत चालू आहे.

रत्ना पाठक शाह आणि नसीरूद्दीन यांनी प्रेमापुढे सर्व काही दुय्यम असल्याचेच आपल्या नात्यात दाखवून दिले आहे. इतके वर्ष संसार करायचा असेल तर एकमेकांशी मैत्रीचे नाते असणे महत्वाचे असल्याचा मूलमंत्रच दिला आहे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नाशिकमध्ये कायदा-सुव्यवस्था धाब्यावर! माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला… गुन्ह्यांमध्ये वाढ

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा आवाज कमी करायला सांगितल्याचा राग आल्याने तीन …

Maharastra Unseasonal Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Maharastra Rain Update : काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान …