आर्थिक नियोजनात मध्यमवर्गीय कुठे चुकतात? करोडपतीने सांगितली श्रीमंत बनण्याची ट्रिक

Trending News:  श्रीमंत कोणाला बनायचे नसते. पैसे कमवण्यासाठी व्यक्ती दिवस-रात्र मेहनत करतात. पण अधिक मेहनत करुनही त्याच्या हातात पैसा टिकत नाही. कमीत कमी वेळात जास्त पैसे कसे कमावता येतील याचाच विचार तो करत राहतो. मध्यमवर्गीय संपूर्ण आयुष्य काटकसरीने जगतात. पैसे असूनही जबाबदाऱ्या इतक्या असतात की त्यातच त्यांचे संपूर्ण आयुष्य निघून जाते. इमान-इतबारे नोकरी करुन पैसे कमावूनही हातात काहीच पैसे का उरत नाही? नेमकी चूक कुठे होते? असा सवाल अनेकांना सतावतो. याबबात एका करोडपती व्यक्तीने अलीकडेच सविस्तर माहिती दिली आहे. 

अमेरिकेत राहणाऱ्या एका करोडपती व्यक्तीने लोकांना पैसे कमावण्याची ट्रिक सांगितली आहे. त्याने हे देखील सांगितले आहे की, मध्यमवर्गीय लोक पैसे कसे कमावतात. व त्यांच्या एका चुकीमुळं ते कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की, श्रीमंत लोक पैसे कमवत नाहीत तर पैसे निर्माण करतात आणि मध्यमवर्गीय लोक हीच चुक करतात. 

मध्यमवर्गीय लोक कुठे चुकतात? 

अमेरिकेत राहणाऱ्या करोडपती व्यक्तीने टिकटॉकवर टेलर मनी नावाने अकाउंट क्रिएट केले आहे. तिथे तो लोकांना श्रीमंत बनण्याची व पैसे कमावण्याच्या अनेक ट्रिक्स शेअर करत असतो. त्याने अलीकडेच त्यांच्या एका व्हिडिओत म्हटलं आहे की, मध्यमवर्गीय लोक त्यांच्या मानसिकतेमुळं श्रीमंत बनू शकत नाही. त्याच्या म्हणण्यानुसार, सर्वसामान्य लोक फक्त पाच दिवस काम करतात आणि मेहनत आणि वेळ खर्च करुन पैसे कमावतात आणि तो पैसा बिल आणि इतर कर्जे फेडून टाकण्यावर खर्च करतात. हेच कारण आहे की ते पुढे जाऊ शकत नाही. तर, एकीकडे मध्यमवर्गीय लोक त्यांचे पैसे वाचवून मोठे घर, मोठी गाडी यासारख्या वस्तुंवर खर्च करतात. त्यामुळं ते कधी पैसा मोठा करु शकत नाही. 

हेही वाचा :  PUBG खेळाचं लागलं व्यसन! मुलाने ब्लेडने कापली नस आणि बोटे

टेलरच्या म्हणण्यानुसार, श्रीमंत लोक पैसे कमी खर्च करतात आणि पैसा वाढवण्याच्या दृष्टीने काम करतात. ते पैशांचा वापर करुनच पैसा वाढवतात. 25-28 वर्षाच्या एका करोडपती व्यक्तीने म्हटलं आहे की, पैशाला पैसे वाढवण्याच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. ना की खर्च करण्याच्या दृष्टीने. त्याचे म्हणणे आहे की, पैसे कमावण्यासाठी डोकं लढवण्यापेक्षा तो पैसा कसा वाढवाल यावर डोकं लढवायला हवं. तुम्ही तुमची रक्कम खर्च करण्याऐवजी एका चांगल्या ठिकाणी गुंतवणुक करा. जेणेकरुन तुमचे पैसे वाढतील. 

(Disclaimer: कुठेही गुंतवणूक करताना कृपया अर्थविषयक तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, ‘या’ पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा

Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यानंतर अनेकदा त्यातून फाटलेले नोटा येतात. एटीएममधून …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …