दिवसाला फक्त 15 ते 20 रुपये वाचवून बना करोडपती; श्रीमंत होण्याचा सिक्रेट फॉर्म्युला नक्की ट्राय करा

How to Become Rich, Secret Formula :  सध्या महागाई इतकी वाढली आहे की खर्चाचते नियोजन कसे करावे हेच समजत नाही. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याने खर्चासाठी पैसे पुरत नाहीत अशा स्थितीत सेव्हिंग कशी होणार? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. खर्ज किती असला तरी  दिवसाला फक्त 15 ते 20 रुपये वाचवले तरी लाखोंची बचत होवू शकते. जाणून घेवूया  श्रीमंत होण्याचा सिक्रेट फॉर्म्युला.

जेवढी पण कमाई आहे त्यातून तुम्ही केलेली छोटीशी सेव्हिंगी तुम्हाला लखपतीच काय कोट्याधीश बनवू शकते. यासाठी गरज आहे ती इच्छाश्कतीची, सातत्याची आणि पैशांच्या योग्य नियोजनाची. अशा अनेक आयडिया आहेत ज्या वापरुन तु्मही कमी कमाईत देखील श्रीमंत बनू शकता.

थोड्या रकमेतून गुंतवणूक सुरू करू 

कमी पगार घेणारे देखील लखपती होवू शकतात. योग्य गुंतवणूक करूनच तुम्ही तुमचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करू शकता. गुंतवणूक  करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता नाही. थोड्या रकमेतून गुंतवणूक सुरू करू शकता. मात्र, ही गुंतवणूक योग्य पद्धतीने आणि दीर्घकालीनव असली पाहिजे. जेणेकरुन ठारविक वर्षानंतर याचा तुम्हाला चांगला मोबदला मिळेल. 

हेही वाचा :  Raghuram Rajan on Rahul Gandhi: "राहुल गांधी पप्पू नाहीत, ते तर...", रघुराम राजन स्पष्टच बोलले

दिवसाला  15 ते 20 रुपये वाचवून बनू शकता कोट्याधीश

दिवसाला  15 ते 20 रुपये वाचवून देखील तुम्ही कोट्याधीश बनू शकता. यासाठी तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागेल. समजा जर तुम्ही दिवसाला 10 रुपयांची बचत केली तर एका महिन्यात 300 रुपये जमा होतात. म्युच्युअल फंडात एसआयपी करा. जर तुम्ही 35 वर्षांसाठी दर महिन्याला 300 रुपयांची SIP केला तर त्यावर  तुम्हाला 18% परतावा मिळाल्यास  35 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 1.1 कोटी रुपयांचा परतावा मिळेल.

महिन्याला 20-25 हजार रुपये कमावणारा  सहज होवू शकतो कोट्याधीश

महिन्याला 20-25 हजार रुपये कमावणारा व्यक्ती अगदी सहज  कोट्याधीश होवू शकतो. म्युच्युअल फंडात मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्याची गरज नाही.  महिन्याला 500 रुपयांपासून तुम्ही गुंतवणुक करु शकता. महिन्याला 1,000-2,000 रुपयांची बचत करणारे दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करून सहजपणे करोडपती होऊ शकतात. यासाठी दर महिन्याला SIP चालू ठेवावे लागेल. पगार वाढल्यावर गुंतवणूक वाढवा, सुरुवातीला उत्पन्नाच्या 20% गुंतवणूक करा.

कोणत्या वयात गुंतवणुक करावी?

गुंतवणुक कशी आणि कुठे करावी यासह  गुंतवणुक कोणत्या वयात करावी हे देखील तितकेच महत्वाचे आहे. जितक्या कमी वयात तुम्ही गुंतवणुक कराल तितका जास्त फायदा होईल. वयाच्या 20 व्या वर्षी 30 रुपयांची एसआयपी केल्यास निवृत्तीच्या वेळी म्हणजे 60 वर्षानंतर 12 टक्के व्याजाने 1.07 कोटींचे रिटर्नस मिळतील. वय 40 च्या पुढे असेल तर दर महिन्याला 10 हजार रुपयांची SIP केल्यास 60 वर्ष वयानंतर 99.91 लाख म्हणजेच  जवळपास 1 कोटींचा परतावा मिळेल.   

हेही वाचा :  राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा, कुणाची सरशी? कोण मारणार बाजी?

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …

भारतात लवकरच आपोआप दुरुस्त होणारे रस्ते? NHAI ने सुरु केलं काम; खड्ड्यांची समस्या कायमची संपणार

Self Healing National Highways In India: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वाखालील रस्ते वाहतूक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या …