How To Lose Weight: ३०० किलो वजनाच्या माणसाने केले १६५ किलो वजन कमी

US Overweight Man Nicholas Craft: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये निकोलस क्राफ्ट या माणसाचे ३०० किलो वजन होते आणि इतके वजन असल्यामुळे त्याचे जगणंही अवघड झाले होते. डॉक्टरांनी शेवटची धोक्याची घंटा दिल्यानंतर आपण वाचू शकणार नाही असंच त्याला वाटलं होतं. मात्र ४ वर्षात त्याने स्वतःच्या शरीरावर काम करत १६५ किलो वजन कमी केले.

निकोलस क्राफ्टची ही प्रेरणादायी गोष्ट सर्वांसाठीच अवाक् करणारी ठरत आहे. सध्या त्याच्या वजन कमी करण्याचीच चर्चा आहे. WDAM 7 News ने दिलेल्या रिपोर्टनुसार, चार वर्षात त्याने कमालीचे वजन कमी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. वजन कमी होणार नाही असं वाटणाऱ्यांसाठी ही नक्कीच प्रेरणा आहे. (फोटो सौजन्य – Facebook/nick.craft.18, Canva)

३-५ वर्षात मरशील – डॉक्टरांनी सांगितले

३-५ वर्षात मरशील - डॉक्टरांनी सांगितले

निकोलस क्राफ्टने आपल्या वजनाबाबत डॉक्टरांनी काय सांगितले याची माहिती दिली, ‘खूप खात पित होतो. अत्यंत वेगाने माझे वजम वाढले. शाळेतील मुलंही माझी मस्करी करू लागली. सर्वात शेवट डॉक्टरांनी सांगितले की वजन कमी करण्यासाठी काहीच केलं नाहीस तर ३-५ वर्षांपेक्षा अधिक जगू शकणार नाहीस’

हेही वाचा :  94 किलो मुलाने ही साधी घरगुती ट्रिक करून घटवलं 25 किलो वजन,दिसू लागला हिरोसारखा Slim-Trim

आजीने दिला पाठिंबा

आजीने दिला पाठिंबा

यानंतर क्राफ्ट याने मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, ‘मला अधिक काळ जगायची इच्छा होती आणि डॉक्टरांनी सांगितलेले गोष्ट माझ्या डोक्यात सतत रूंजी घालत होती. त्यामुळे मी जंक फूड खाणे सोडले. घरात माझी आजी होती आणि तिने मला वजन कमी करण्यासाठी खूप प्रोत्साहन दिले.
आजी म्हणाली की, मला तुला सतत जवळ बघायचे आहे, बारीक होण्यासाठी मेहनत कर’. यानंतर आजीला वजन कमी करण्याचे वचन दिले. ‘खूप काळ आपण एकत्र राहू’ हे वचन दिलं. मात्र त्याच्या आजीने त्याला बारीक झालेलं पाहिलं नाही आणि तिचे आधीच निधन झाले. मात्र आजीला दिलेल्या वचनासाठी त्याने बारीक होण्यासाठी मेहनत घेतली.

(वाचा – Heatwave: हीट वेव्ह अथवा लू म्हणजे नेमके काय? उष्माघातापासून वाचण्यासाठी कशी घ्याल काळजी)

वजन घटविण्यासाठी कॅलरी केली कमी

वजन घटविण्यासाठी कॅलरी केली कमी

वजन कसे कमी केले या प्रश्नावर निकोलस क्राफ्टने आपल्या सवयी बदलल्याचे सांगितले. वजन कमी करण्यासाठी विशिष्ट आहार घेतला. कॅलरी सेवन करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. जंक फूड पूर्ण सोडून दिले. सुरूवातीला प्रति दिन १२०० ते १५०० इतकी कॅलरी शरीरात जात होती. पण वजन कमी करण्यासाठी यामध्ये त्याने कपात केली.

हेही वाचा :  दिवसातून केवळ दोन वेळा जेवण आणि अर्धा लीटर दूध, बाबा रामदेव यांचा पूर्ण डाएट प्लॅन

(वाचा – ग्लुकोमा काय आहे, काळ्या मोतीबिंदूमुळे डोळे गमावू शकता का? लक्षणे, कारणे आणि उपाय)

शाळेत असतानाच होते १३६ किलो वजन

शाळेत असतानाच होते १३६ किलो वजन

क्राफ्टने २०१९ पासून आपले वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यासाठी त्याने डाएटिंग करून पहिल्या महिन्यात १८ किलो वजन कमी केले. Fox News Digital सह मुलाखत देताना त्याने सांगितले की, शाळेतच त्याचे वजन साधारण १३६ किलो होते. लहानपणापासूनच वजनामुळे संघर्ष करत असल्याचे दुःख व्यक्त केले होते.

(वाचा – Heart Blockage: बायपास सर्जरीशिवायही हार्ट ब्लॉकेजची समस्या होईल दूर, बाबा रामदेवने सांगितले ४ उपाय)

वजनामुळे कोणातही मिसळत नव्हता

वजनामुळे कोणातही मिसळत नव्हता

वजन अति असल्यामुळे नैराश्य आले होते आणि अधिक खाण्याची सवय लागली होती असेही क्राफ्टने सांगितले. यामुळे कौटुंबिक कार्यक्रमात जाणेही बंद केले. इतकंच नाही तर प्रवास करणेही बंद केले. अधिक वजनामुळे शरीरदुखी, सांधेदुखी त्रास आणि श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला होता.

आता वजन कमी झाल्यावर आनंदी आहे

आता वजन कमी झाल्यावर आनंदी आहे

१६५ किलो वजन कमी केल्यानंतर ४२ वर्षीय क्राफ्टने आपला आनंद व्यक्त करत आता अत्यंत व्यवस्थितपणे श्वास घेत असल्याचे सांगितले आहे. आता कुठेही जाणं सहज सोपं झालं असून आयुष्य चांगलं जगता येतंय असंही त्याने आवर्जून सांगितले आहे.

हेही वाचा :  पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ

निकोलस क्राफ्टचा हा वजन कमी करण्याचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. वजन कमी करण्यासाठी मनात विचार पक्का करणं आणि मेहनत करणं दोन्हीची गरज आहे हेच पुन्हा सिद्ध झाले आहे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत’, CM शिंदेंचा अण्णा हजारेंना Video Call; म्हणाले, ‘सेंच्युरी मारा’

CM Eknath Shinde Video Call To Anna Hazare: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी आपला 87 …

‘..तर तुमच्याविरुद्ध वॉरंट जारी करावं लागेल’; कोर्टाची भुजबळांना तंबी! अडचणी वाढणार?

Warning To Chhagan Bhujbal: अजित पवार गटामधील राजकीय घडामोडीमुळे मागील काही आठवड्यांपासून चर्चेत असलेले राज्यातील मंत्री …