४८ व्या वर्षी करिष्मा कपूर बॅकलेस ड्रेसमध्ये, ग्लॅम लुकने केले क्लीन बोल्ड

करिष्मा कपूर आजही अत्यंत सुंदर दिसते. वयाच्या ४८ व्या वर्षी कमालीचा फिटनेस करिष्माने सांभाळला आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा करिष्माने लॅक्मे फॅशन विकमध्ये रँप वॉक केल्यावर आलाय. कितीही अभिनेत्री आल्या आणि गेल्या. मात्र करिष्माच्या लुकपुढे सर्वच फिक्या पडलेल्या दिसून येत आहेत.

फोटो असो वा व्हिडिओ, मॉर्डर्न असो वा पारंपरिक करिष्मा कोणत्याही कपड्यांमध्ये ग्लॅमरस आणि सुंदरच दिसते. करिष्माच्या यात अदांनी पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केले आहे. रॅम्प वॉक करताना जॅकेट काढून ज्या आत्मविश्वासाने करिष्माने आपला जलवा दाखवला त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसून येत आहे. (फोटो सौजन्य – @lakmefashionwk, @therealkarismakapoor Instagram)

डिझाईनर राणा गिलची शो – स्टॉपर

डिझाईनर राणा गिलची शो - स्टॉपर

करिष्माने Lakmé Fashion Week x FDCI मध्ये डिझाईनर राणा गिलसाठी रॅम्प वॉक केले. शो-स्टॉपर म्हणून करिष्माने फ्लोअर लेंथ मॅक्सी गाऊन घातला होता, ज्याची हेमलाईन अनइव्हन होती. मात्र करिष्माच्या आत्मविश्वासाने या लुकला चारचाँद लावले. या ड्रेसवरील रफल्ड प्लेट्सने अधिक लक्ष वेधले, ज्यामुळे ड्रेसला ग्लॅम लुक प्राप्त झाला आहे.

हेही वाचा :  जपानमध्ये भूकंपानंतर समुद्र चक्क 820 फूट मागे सरकला; Before आणि After फोटो पाहून जग चिंतेत

कलरफुल प्रिंट

कलरफुल प्रिंट

गोल्डन बेस आणि कलरफुल प्रिंटमुळे या ड्रेसला अधिक शोभा आली होती. तर डीप नेकलाईन आणि ओव्हरऑल सिझलिंग एलिमेंट यामुळे करिष्माच्या सौंदर्यात भर पडली होती. प्लंजिंग व्ही नेकलाईन आणि स्ट्रेप्स फ्लोरल यामुळे अधिक सुंदरता दिसून येत आहे.

(वाचा – सगळीकडे फक्त प्राजक्ता माळीच्या लुकची हवा, चाहते म्हणतात ‘अस्सल मराठी सुंदरी आहेस तू’)

मिनिमल अक्सेसरीज

मिनिमल अक्सेसरीज

करिष्मा कपूरने या ड्रेससह अत्यंत कमी दागिने वापरल्याचे दिसून येत आहे. तर यासह तिने गोल्डन रंगाचे जॅकेटही घातले होते. यावर सिक्वेन वर्क करण्यात आले होते. पॉवर शोल्डरसह ब्लेझर स्टाईल जॅकेटने ड्रेसला मॅच केले. तर केवळ रिंग आणि इअररिंग्ज घालून करिष्माने लुक पूर्ण केला.

(वाचा – ‘गुलाबाची कळी कशी…’ रिंकूच्या गुलाबी लुकवर चाहते फिदा, म्हणतायत ‘महाराष्ट्राची अप्सरा’ )

करिष्माने काढले रॅम्पवर जॅकेट, आत्मविश्वासाने केले रॅम्प वॉक

बॅकलेस ड्रेसची कमाल

बॅकलेस ड्रेसची कमाल

बॉलीवूडच्या लोलोच्या या ड्रेसची कमाल म्हणजे हा ड्रेस बॅकलेस होता आणि तिने रॅम्पवर जॅकेट काढून अत्यंत सुंदर पद्धतीने हा लुक कॅरी केला. एखाद्या ग्रीक गॉडेसप्रमाणे करिष्माचा लुक दिसत होता. ४८ व्या वर्षीही तरूण मॉडेल्सना लाजवेल असा करिष्माचा लुक आणि आत्मविश्वास दिसत होता.

हेही वाचा :  Office Wear Ideas: उन्हाळ्याच्या दिवसात ऑफिस मध्ये कम्फर्टेबल व स्टायलिश दिसण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात| fashion beauty office wear ideas for women to look stylish and comfortable

(वाचा – हिरवीकंच नऊवारी आणि बंधगळा लुक सोनाली – आशयचा राजेशाही थाट, पारंपरिक लुकने वेधले लक्ष)

ग्लिटरी मेकअप

ग्लिटरी मेकअप

तर करिष्माने यावेळी गिल्टरी मेकअप केला होता. रॅम्प वॉक फिल येणारा असा हा गिल्टरी मेकअप अत्यंत सुंदर दिसत होता. यावेळी करिष्माने गोल्डन रंगाला मॅच होणारा असा डार्क मेकअप केला होता. डार्क काजळ, आयलायनर आणि डार्क लिपस्टिक शेड लावत तिने लुक पूर्ण केला.
करिष्माचा हा लुक पाहून कोणीही पुन्हा पुन्हा करिष्माच्या प्रेमात पडेल. तर लवकरच करिष्मा पन्नाशी गाठणार आहे यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …