Office Wear Ideas: उन्हाळ्याच्या दिवसात ऑफिस मध्ये कम्फर्टेबल व स्टायलिश दिसण्यासाठी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात| fashion beauty office wear ideas for women to look stylish and comfortable


तापमान दिवसेंदिवस आपली उंची गाठत आहे. अशात कायम प्रश्न पडतो की, कोणते कपडे घालावेत. नेमकं काय टाळावे आणि काय घालावे हेच कळत नाही.

तुमचा ड्रेसिंग सेन्स हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो, त्यामुळे ते निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. एक मजबूत आणि आत्मविश्वास तुमच्या संपूर्ण जीवनात पुढे जाण्याचा मार्ग सोपा बनवू शकतो आणि तुमचे दिसणे खूप महत्त्वाचे आहे. त्यातच आता उन्हाळा सुरू झाला आहे. तापमान दिवसेंदिवस आपली उंची गाठत आहे. अशात कायम प्रश्न पडतो की, कोणते कपडे घालावेत. नेमकं काय टाळावे आणि काय घालावे हेच कळत नाही. कपडे निवडताना काही गोष्टींचा विचार अगदी सावधपणे करायला हवा जेणे करून उन्हाच्या झळा लागणार नाहीत. आणि हे सगळं करताना आपण स्टायलिश कसे राहू हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे.

हेही वाचा :  आधी गोळ्या घातल्या, नंतर दगडाला बांधून मगरींनी भरलेल्या नदीत फेकलं; पोलिसांना हादरवणारी 'सैराट'पेक्षाही भयानक घटना

काही महत्वाच्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या टीप्स फॉलो करून तुम्ही उन्हाळ्यातही ऑफिसला जाताना स्टायलिश राहून एन्जॉय करू शकता.

कॅज्युअल वेअर टाळा

ऑफिसमधला कॅज्युअल लूक देखील तुमची वागणूक दर्शवतो तर प्रोफेशनल लूक तुमची सिरियसनेस दाखवतो. त्यामुळे हे लक्षात ठेवणे म्हत्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही एका दिवशी असा लूक कॅरी करायला हरकत नाही पण जर तुम्ही आठवड्यातून पाच दिवस कॅज्युअल वेअर्समध्ये ऑफिसला जात असाल तर ते योग्य नाही.

साईज आणि कम्फर्टकडे लक्ष द्या

परफेक्ट फिटिंग आणि कम्फर्ट यांच्यात योग्य संतुलन राखणे फार महत्वाचे आहे. सुसज्ज कपडे तुम्हाला प्रेझेंटेबल बनवतात तर खूप घट्ट कपडे तुम्हाला अस्वस्थ करतात. त्यामुळे ऑफिससाठी नेहमी असे कपडे निवडा, जे तुम्ही घातल्यावर आरामात बसून काम करू शकता. शरीराच्या प्रकारानुसार कपडे घातल्याने तुम्हाला आरामदायक आणि आत्मविश्वास दोन्ही राहतो. कधीही कोणताही ट्रेंड फॉलो करू नका, कारण ते तुम्हाला शोभतील असे नाही आणि तुम्ही त्यात आरामशीर असावे.

तुमचे कपडे तुमचा आत्मविश्वास दर्शवतात

आत्मविश्वास असणारा माणूस नेहमीच लोकांना आकर्षित करतो, त्यामुळे ऑफिससाठी नेहमी असे कपडे निवडा जे परिधान करून तुम्हाला कॉन्फिडेंट वाटेल, मग तो जीन्स-शर्ट, सूट किंवा साडी असो. रंग किंवा फॅब्रिकमध्ये काही विशेष पसंती असेल तर त्याला प्राधान्य द्या कारण कुठेतरी आत्मविश्वासाचा तुमच्या कामावरही परिणाम होतो.

हेही वाचा :  Maharashtra Strike Update : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आजचा 5 दिवस, संप कायम ठेवण्याचा निर्धार

– उन्हाळा असल्यामुळे तुम्ही कपडे निवडताना अतिशय सैल कपडे निवडा. जेवढं कमी फॅब्रिक तुमच्या अंगाला लागेल तेवढं कमी गरम होईल. कमी गरम होण्यासाठी सुती कपड्यांचा वापर करा. अतिशय घट्ट, अंगाला चिटकणारे कपडे वापरू नका.

– कॉटन आणि लिननचे कपडे गर्मीत आराम देतात. उन्हाळ्यात कपडे निवडताना काळजी घ्या. ज्या कपड्यांमध्ये घाम शोसून घेतला जाईल असे कपडे वापरा. सिल्क, सिन्थॅटिक आणि नायलॉन सारखे कपडे अजिबात वापरू नका. गर्मीच्या या दिवसांत या मटेरिलयचे कपडे घालणे शरीराला नुकसान देणार आहे.

– उन्हाळ्यात कपडे निवडताना रंगाची देखील काळजी घ्या. गर्मीत हलक्या रंगाचे कपडे घाला. जास्त करून सफेद रंगाचे कपडे घाला. या दिवसांत काळ्या रंगाचा वापर अजिबात करू नका.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …