नवीन आर्थिक वर्षात Old Tax Regime फायद्याशीर? फक्त 4 स्टेप्समध्ये असं बदला!

Old vs New Tax Regime In Marathi : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुन्या कर रचनेत थोडाफार दिलासा दिला आहे. नवीन कर प्रणालीमध्ये करदात्यांना जुन्या कर प्रणालीपेक्षा जास्त कर सवलत देण्यात आली आहे. भारताच्या आयकर कायद्यानुसार आयकर हा केवळ व्यक्तींवरच नाही तर कंपन्यांवरही आकारला जातो. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच HUF तसेच संस्था आणि कंपन्यांमध्येही भागीदारी संस्था, LLP आणि कॉर्पोरेटसह उत्पन्नावर आयकर आकारला जातो. तसेच  जुन्या कर प्रणालीमध्ये लागू होणारा आयकर दर प्रामुख्याने उत्पन्न आणि उत्पन्नाच्या स्लॅबवर अवलंबून असतो. यामध्ये वय देखील विचारात घेतले जाते. याशिवाय वयानुसारही कर मोजला जातो. जर वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल, तर जुन्या कर स्लॅब अंतर्गत 2.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर दर शून्य असेल. जर तुम्हाला जुन्या कर प्रणालीचा फायदा घेय्याचा असेल तर काय करावे ते जाणून घ्या… 

31 मार्च संपला की 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होते. नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वी अनेकजण गतवर्षीचा आयटीआर भरण्याच्या तयारीला लागतात. अशावेळीपण कोणती कर प्रणाली (टॅक्स स्लॅब) निवडावी? या संभ्रमात अडकतात. कोणती प्रणाली वापरल्यामुळे कोणते फायदे मिळतील? याबाबत बहुतांश लोकांमध्ये संभ्रम आहे. कारण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन करप्रणाली लागू केली आहे. पण नवीन टॅक्स स्लॅब खरोखरच सर्वांसाठी फायदेशीर ठरेल का?  की जुनाच  टॅक्स स्लॅब फायद्यचा ठरेल? 

हेही वाचा :  Income Tax Slab : खूशखबर! 'इतक्या' लाखांच्या पगारावर Income Tax नाही?

जुनी कर प्रणाली म्हणजे काय?

जुनी टॅक्स स्लॅबमध्ये 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. 2.5 लाख ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5% ची तरतूद आहे. फक्त सरकार यावर 12,500 रुपये ची सूट देईल. तसेच जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंत उत्पादन कर भरावा लागत नव्हता.

दरम्यान नवीन कर प्रणाली 2023 च्या अर्थसंकल्पात डीफॉल्ट करण्यात आली. याचा अर्थ असा की, जर तुम्ही तुमची कर प्रणाली स्वतः निवडली नाही, तर तुमचा कर आपोआप नवीन कर प्रणाली अंतर्गत मोजला जाईल. परंतु तुम्हाला आयटीआर दाखल करण्याच्या देय तारखेपूर्वी तुमची कर व्यवस्था बदलण्याचा अधिकार आहे. यामध्ये नोकरदार कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार प्रत्येक आर्थिक वर्षात त्यांची कर प्रणाली बदलण्याचा पर्याय आहे, तर ज्यांचे व्यवसाय उत्पन्न आहे, म्हणजे ज्यांचे उत्पन्न व्यवसायातून येते अशा करदात्यांना कर व्यवस्था बदलण्यासाठी फक्त एकदाच हा पर्याय असेल. ते पण शासन बदलू शकतात. तसेच जुन्या कर प्रणालीमध्ये कराचे दर जास्त आहेत, परंतु येथे तुम्हाला अनेक प्रकारच्या गुंतवणूक, खर्च आणि इतर गोष्टींवर कर सूट मिळते.

हेही वाचा :  देशभरातल्या करदात्यांसाठी गुड न्यूज! फोनपे इन्कम टॅक्स पेमेंट फीचर सुरु, तुम्हाला 'असा' मिळेल फायदा

जुनी कर प्रणाली सूट आणि त्याची मर्यादा

2.5 लाखांपर्यंत – 0%
2.5 लाख ते 5 लाख – 5%
5 लाख ते 10 लाख – 20%
10 लाखांपेक्षा जास्त – 30%

कर प्रणाली बदलण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता आहे का ते जाणून घ्या. नोकरदार कर्मचाऱ्यांना नियम बदलण्यासाठी वेगळा फॉर्म भरण्याची गरज नाही, त्यांचा ITR फॉर्म भरताना, ते प्रथम सांगू शकतात की ते कोणत्या नियमात रिटर्न भरत आहेत. तसेच जर तुम्ही व्यवसायातून उत्पन्न मिळवत असाल, तर तुम्ही फक्त एकदाच कर प्रणाली बदलू शकता आणि त्यासाठी तुम्हाला मूल्यांकन वर्षात 31 जुलैपूर्वी फॉर्म 10IE भरावा लागेल.

नोकरदार कर्मचाऱ्यांनी फॉलो करा या स्टेप्स

– सुरुवातीला  ITR फॉर्म उघडा.
– त्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला विचारण्यात येईल, कोणती कर प्रणाली निवडायची आहे?
–  यानंतर तुमच्या आवडीनुसार पर्याय निवडा.
– आता तुमचा ITR भरून त्याची पडताळणी करा आणि सबमिट करा.

ज्यांचा व्यवसाय असेल त्यांनी फॉलो करा या स्टेप्स

– ऑनलाइन फॉर्म 10IE डाउनलोड करा आणि भरा.
–  हा फॉर्म वर्षाच्या 31 जुलैपूर्वी भरा.
– आता तुमच्या आवडीनुसार कर व्यवस्था निवडा आणि ITR भरा.

हेही वाचा :  सरकारी अधिकाऱ्याचा निरोप समारंभात बारबालाचा 'अश्लील डान्स' Video Viral होताच चौकशीचे आदेश

जर व्यवसायिक उत्पन्न असलेले लोक जुन्या कर प्रणालीकडे परत जात असतील, तर त्यांना हा पर्याय फक्त तेव्हाच मिळेल जेव्हा त्यांनी यापूर्वी कधीही स्विच केले नसेल. तसेच तुम्ही चालू वर्षाच्या रिटर्नमध्ये जुन्या नियमानुसार कर सूट घेऊ शकत नाहीत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …