Solar Eclipse 2022: भरणी नक्षत्रात लागणार या वर्षीचं पहिलं सूर्यग्रहण, जाणून घ्या कधी आणि कुठे दिसेल


हिंदू पंचांनुसार या वर्षीचं पहिलं सूर्यग्रहण ३० एप्रिल २०२२ रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण खंडग्रास असल्याचे मानले जाते. पहिले सूर्यग्रहण वृषभ राशीत होणार आहे.

खगोलशास्त्रानुशार चंद्र आणि सूर्य ग्रहण होत असलं तरी हिंदू पंचांगानुसार त्याला विशेष महत्त्व आहे. नव वर्ष २०२२ मध्ये एकूण चार ग्रहण आहेत. त्यापैकी २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण होतील. हिंदू पंचांनुसार या वर्षीचं पहिलं सूर्यग्रहण ३० एप्रिल २०२२ रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण खंडग्रास असल्याचे मानले जाते. पहिले सूर्यग्रहण वृषभ राशीत होणार आहे. तर खगोलशास्त्रज्ञांनीही होणारे हे ग्रहण खंडग्रास असेल, असं सांगितलं आहे. दुसरे सूर्यग्रहण वर्षाच्या शेवटी २५ ऑक्टोबर २०२२ रोजी होईल. ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या मते, हे ग्रहण भारतात दिसणार नाही. पण भारतात राहणाऱ्या लोकांनीही या काळात काळजी घ्यावी. कारण ग्रहणाचा प्रभाव संपूर्ण जगावर पडतो. २०२२ या वर्षाच्या एप्रिलमध्ये होणारे पहिले सूर्यग्रहण ही खगोलीय घटना आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण शुभ आणि अशुभ दोन्ही मानले जाते. जेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो तेव्हा या काळात सूर्याची किरणे पृथ्वीपर्यंत पोहोचत नाहीत, याला सूर्यग्रहण म्हणतात. चला जाणून घेऊया या सूर्यग्रहणाचा प्रभाव कुठे असेल.

हेही वाचा :  Shani Dev: ३० वर्षांनंतर कुंभ राशीत शनि करेल प्रवेश, ‘या’ राशीच्या लोकांना मिळेल साडेसातीपासून मुक्ती

कुठे कुठे दिसणार सूर्यग्रहण: ३० एप्रिल २०२२ रोजी पहिले सूर्यग्रहण दक्षिण आणि पश्चिम दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक आणि अंटार्क्टिका महासागर यांसारख्या भागात दिसणार आहे. हे ग्रहण खंडग्रास असल्याने त्याचा भारतावर विशेष परिणाम होणार नाही. या कारणामुळे भारतात सुतकांचे नियम पाळले जाणार नाहीत. खरं तर जेव्हा संपूर्ण ग्रहण असते तेव्हा सुतकांचे नियम पाळले जातात.

सूर्यग्रहणाची वेळ: भारतीय वेळेनुसार, शनिवारी ३० एप्रिल २०२२ रोजी पहिले सूर्यग्रहण रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी सुरू होईल आणि पहाटे ४ वाजून ७ मिनिटांनी संपेल.

सुतक लागेल की नाही: धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण काळात शुभ कार्य करण्यास मनाई असते. वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. अशा स्थितीत सूर्यग्रहणाचा सुतक काळ भारतात वैध नसेल. सामान्यतः सुतक कालावधी ग्रहणाच्या १२ तास आधी सुरू होतो. ज्योतिषशास्त्रानुसार संपूर्ण ग्रहण काळातच सुतक नियम पाळणे बंधनकारक असते. दुसरीकडे, ग्रहण आंशिक असेल तर सुतक नियमांचे पालन करणे बंधनकारक नाही.

Mahashivratri 2022: महाशिवरात्रीला होणाऱ्या रुद्राभिषेकाचं महत्त्व आणि प्रकार जाणून घ्या

वर्षातील दुसरे सूर्यग्रहण: २०२२ या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण मंगळवार, २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याची वेळ ४:२९:१० वाजता सुरू होईल आणि ५:४२:०१ वाजता संपेल. हे ग्रहण भारतातील काही ठिकाणी दिसणार आहे, त्यामुळे या काळात भारतात सुतक काळ वैध असेल. यासोबतच आफ्रिका खंडाच्या ईशान्येकडील भाग, युरोप, आशियाचा नैऋत्य भाग आणि अटलांटिक महाद्वीपमध्येही ते पाहता येईल.

हेही वाचा :  आजचं राशीभविष्य, गुरुवार, १७ फेब्रुवारी २०२२

या राशींवर होणार प्रभाव: मेष राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण फलदायी ठरेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. दुसरीकडे, सिंह राशीच्या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ असणार आहे. तर धनु राशीच्या लोकांसाठी गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून काळ खूप चांगला जाणार आहे.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …