Breaking News

कोरियन आणि जपानी मुलींच्या काचेसारख्या त्वचेचे रहस्य तुमच्या स्वयंपाकघरात

Rice Water : कोरियन आणि जपानी त्वचा निगा राखणाऱ्या उत्पादनांमध्ये तांदूळ मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तांदळाचे पाणी केवळ केसांसाठीच नाही तर त्वचेची निगा राखण्यासाठी देखील या पाण्याचा आपण वापर करू शकतो. तांदळाच्या पाण्यात Amino ऍसिडस्. अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे समृद्ध असतात. जी वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास मदत करतात. हे पाणी लावल्याने त्वचेचा घट्टपणाही वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर तांदळाच्या पाण्याने टॅनिंग, काळे डाग आणि सनबर्नच्या समस्येपासूनही सुटका मिळते. तांदळाचे पाणी चेहऱ्यावर कसे लावायचे ते आज आपण जाणून घेऊयात. डॉ हंसा योगेंद्र यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत. (फोटो सौजन्य : @Istock)

त्वचेसाठी तांदळाचे पाणी

त्वचेसाठी तांदळाचे पाणी

तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावण्यासाठी आधी तांदळाचे पाणी बनवण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहेत. हे पाणी बनवण्यासाठी एक कप तांदूळ किमान अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. तुम्ही फक्त पांढरा तांदूळच नाही तर लाल तांदूळ किंवा बासमती तांदूळ देखील वापरू शकता. तांदळाचे पाणी तयार करण्याची आणखी एक पद्धत आहे जी अवलंबली जाऊ शकते. यासाठी जास्त पाणी घालून भात शिजवावा आणि भात शिजल्यावर त्यातील पाणी फेकून देण्याऐवजी वेगळ्या भांड्यात वापरण्यासाठी बाहेर काढावे.

हेही वाचा :  Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांना 'हे' पर्यायी मार्ग वाहतुक कोंडीतून वाचवणार

(वाचा :- ऋजुता दिवेकर यांनी सांगितले शेंगदाण्याचे त्वचेसाठी होणारे फायदे; ७ दिवसात चेहरा चमकू लागेल) ​

तांदळाचे पाणी कसे तयार करावे

तांदळाच्या पाण्यातील घटक

तांदळाच्या पाण्यातील घटक

तांदळाच्या पाण्यात खनिज, व्हिटॅमिन, अमिनो अ‍ॅसिड आणि अँटी ऑक्सिडेंट्सचा मोठ्या प्रमाणात साठा असतो. हे सर्व घटक त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी पोषक आहेत.

(वाचा :- Uric Acid: त्वचेवरील लाल डागांनी हैराण झाला आहात? ताबडतोब युरिक अ‍ॅसिडची चाचणी करा, ही आहेत लक्षणे) ​

टोनर म्हणून लागू करा

टोनर म्हणून लागू करा

हे तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यापैकी पहिला मार्ग म्हणजे ते तांदळाच्या टोनरप्रमाणे लावणे. तांदळाचे पाणी टोनर म्हणून लावण्यासाठी ते कापसात घेऊन चेहऱ्यावर चोळा. काही वेळानंतर, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमचा चेहरा देखील धुवू शकता.

(वाचा :- ऐकाल तर नवल ! मुलीने क्रिमऐवजी चेहऱ्याला लावली मेहंदी, पुढे जे झालं ते बघून गडबडून जाल)

तांदूळ बर्फाचे तुकडे

तांदूळ बर्फाचे तुकडे

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी तांदळाच्या पाण्यापासून बर्फाचे तुकडे बनवता येतात. यासाठी बर्फाच्या ट्रेमध्ये तांदळाचे पाणी भरून ते सेट होऊ द्यावे. पाणी बर्फ झाल्यावर डोळ्यांखालील भागासह संपूर्ण चेहऱ्यावर लावा. या बर्फाच्या तुकड्यांमुळे चेहरा चमकदार होतो, डोळ्यांची समस्या दूर होते, डाग हलके होतात आणि त्वचा देखील मुलायम होते.

हेही वाचा :  केसांचा क्लिप ठरु शकतो जीवघेणा, 'या' तरुणीवर बेतला भयंकर प्रसंग, पोहोचली थेट रुग्णालयात

ओपन पोअर्स होतात कमी

ओपन पोअर्स होतात कमी

जर तुम्हाला ओपन पोअर्सची समस्या असेल तर या पाण्याचा वापर फायदेशीर ठरतो. यासाठी कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावा. या पाण्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार होईल. महत्त्वाचे म्हणजे त्वचेवरील रोमछिद्रांची समस्या कमी होण्यास मदत मिळेल. तसंच मुरुमांची समस्या कमी करण्यासाठीही तुम्ही तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. मुरुमांमुळे चेहऱ्यावर येणारी सूज, लालसरपणा, डाग इत्यादी समस्याही दूर होतील.

फेस मास्कमध्ये मिसळा

फेस मास्कमध्ये मिसळा

तुमचा कोणताही फेस मास्क बनवताना किंवा बाहेरून आणलेल्या फेस मास्कमध्ये तुम्ही तांदळाचे पाणी घालू शकता. तांदळाच्या पाण्यामुळे फेस मास्क चेहऱ्यासाठी आणखी चांगला होईल. बेसनाच्या पीठात तांदळाचे पाणी मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील डागही कमी होण्यास मदत होते.

(वाचा :- Benefits of Amla for Hair : केस गळणं खूप वाढलंय? आवळ्याचा असा करा वापर ,७ दिवसात फरक जाणवेल)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘कपाळावर हात मारला, कोन बांडगुळ हाय ते.. लै अवलादी…’, किरण माने यांची पोस्ट चर्चेत

Kiran Mane Social Media Post :  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) …

पुणे कार अपघाताच्या दिवशी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक खुलासा

Pune Car Accident : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन आरोपीने त्याच्या पोर्श कारने (Porsche Car) रात्रीच्यावेळी एका …