Skin Care: त्वचा अधिक चमकदार करण्यासाठी आणि सुरकुत्या घालविण्यासाठी प्या गुळवेलचा रस

आयुर्वेदात परंपरेनुसार गुळवेलचा औषधी स्वरूपात वापर करण्यात येतो. करोना काळातही गुळवेलाचा काढा करून अनेकांनी प्रतिकारशक्ती वाढविण्यास फायदा करून घेतला. करोना काळात गुळवेलाबाबत अधिक जागरूकता दिसून येऊ लागली आहे. आता याचे झाड घरातही लावण्यात येऊ लागले आहे.

हिरव्या गडद रंगाची पाने असलेली ही वनस्पती जितकी आरोग्यासाठी फायदेशीर आहे तितकीच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. गुळवेलाच्या पानाचे आणि गुळवेलाच्या रसाचे नक्की त्वचेसाठी कसे फायदे करून घेता येतील याबाबत ब्युटिशियन स्मिता कांबळे यांनी आम्हाला सांगितले आहे. (फोटो सौजन्य – Freepik.com)

गुळवेलातील पोषक तत्व

गुळवेलातील पोषक तत्व

गुळवेलामध्ये अनेक पोषक तत्व असतात जे त्वचेसाठी उपयुक्त ठरतात. यामध्ये ग्लुकोसाईड आणि टीनोस्पेरीन, पामेरिन अथवा टीनोस्पोरिक असिड, कॉपर, लोह, फॉस्फरस, जिंक, कॅल्शियम आणि मँगनीज अधिक प्रमाणात मिळते. गुळवेलाचा आयुर्वेदात अमृतकुंभ असा उल्लेख केला असून याचे अनेक फायदे असल्यामुळेच अनन्यसाधारण महत्त्व आहे.

त्वचेसाठी कसे ठरते फायदेशीर

त्वचेसाठी कसे ठरते फायदेशीर

गुळवेलामध्ये अँटीएजिंग घटक आढळत असून शरीरातील अनेक आजार दूर करण्यासह त्वचेवर दिसणारा वाढत्या त्वचेचा परिणाम कमी करण्यासाठीही याचा उपयोग करता येतो. गुळवेलाचा रस संतुलित प्रमाणात तुम्ही नित्यनियमाने प्यायल्यास, त्वचा अधिक चमकदार होते आणि सुरकुत्या घालविण्यासाठीही याचा उपयोग होतो.

हेही वाचा :  मुलीचं नाव ठेवलं 'शिवसेना'? काय आहे या नावामागची गोष्ट, कट्टर शिवसैनिकाने बाळासाहेबांप्रती व्यक्त केली कृतज्ञता

(वाचा – केसांवर ३ पद्धतीने करा मेथी दाण्यांचा वापर, हेअरफॉल आणि कोंड्यापासून मिळेल सुटका )

त्वचेवर कसा करावा गुळवेलाचा वापर

त्वचेवर कसा करावा गुळवेलाचा वापर

गुळवेलाच्या काड्यांचा उपयोग करून तुम्ही त्याची पेस्ट बनवा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. साधारण २० मिनिट्स तसंच ठेवा आणि मग चेहऱ्यावरील कोरडेपणा गेलेला तुम्हाला दिसून येईल. ही पद्धत वापरल्याने Dermatitis सारखी त्वचेची समस्या दूर होण्यासही मदत मिळते. आयुर्वेदात याचा वापर सांगण्यात आला आहे.

(वाचा – मोहरीचे तेल आणि कडिपत्त्याचे समीकरण केसांसाठी ठरते फायदेशीर, कसे वापरावे घ्या जाणून)

आवळ्यासह कसे वापरावे

आवळ्यासह कसे वापरावे
  • ३-४ गुळवेलाची पाने आवळ्यासह वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्या
  • त्यानंतर त्वचेला ही पेस्ट लावा आणि साधारण १५ मिनिट्स तसंच राहू द्या
  • १५ मिनिट्स झाल्यावर तोंड स्वच्छ धुवा

यामुळे त्वचा अधिक चमकदार होते आणि याशिवाय चेहऱ्यावर आलेली मुरूमं जाण्यासही मदत मिळते. हा मास्क तुम्ही १५ दिवसांनी एकदा लाऊ शकता.

(वाचा – कोरफड आणि नारळाचे तेल रात्रभर केसांना लावले तर मिळतील अफलातून फायदे, केसांची वाढ थांबणार नाही )

गुळवेलाच्या रसामुळे चेहऱ्यावरील डागांपासून सुटका

गुळवेलाच्या रसामुळे चेहऱ्यावरील डागांपासून सुटका

गुळवेलाचा रस हा अँटीएजिंग तत्वांनी पोषक असल्याने तुम्ही याचा वापर त्वचेसाठी करून घेऊ शकता. तुम्ही गुळवेलाचा रस नियमित प्यायल्यास चेहऱ्यावरील काळ्या डागांपासून सुटका मिळते. याशिवाय तुम्हाला पफीनेसचा त्रास असल्यास, चेहऱ्यावरील सूजही निघून जाते. यामधील अँटीऑक्सिडंट्स चेहऱ्यावरील सुरकुत्या घालविण्यास मदत करतात. दिवसातून केवळ २० मिली इतकेच तुम्ही गुळवेलाच्या रसाचे सेवन करू शकता.

हेही वाचा :  Kolhapur LokSabha : शाहू महाराजांविरुद्ध कोण ठोकणार शड्डू? कोल्हापुरात भाजपची तिरकी चाल!

कोरफडसह गुळवेलाचा उपयोग

कोरफडसह गुळवेलाचा उपयोग

कोरफड त्वचेसाठी वरदान ठरते हे सर्वांनाच माहीत आहे. कोरफड जेलमध्ये तुम्ही गुळवेलाची पावडर मिक्स केली आणि ही पेस्ट जर चेहऱ्याला लावली तर त्वचा अधिक चमकदार होते. तसंच त्वचेवरील नैसर्गिक चमक टिकून राहण्यास मदत मिळते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …