केस गळणं खूप वाढलंय? आवळ्याचा असा करा वापर ,७ दिवसात फरक जाणवेल

Hair Loss : कामाचे वाढते तास, अपुरा आहार, बाहेरचं खाणं, प्रदूषण,अपुरी झोप, या सर्वांचा आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम असतो. त्यामुळे केसांच्याही विविध समस्या सहन कराव्या लागतात. बदलेल्या जीवनशैलीचा आणि आरोग्याचा परिणाम आपल्या शरीरावर झालेला दिसून येतो. शरीरातील बदलांचा थेट परिणाम आपल्या केसांवर झालेला स्पष्ट दिसतो. यामुळे अकाली केस सफेद होणे, केस गळणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
अशा परिस्थितीत तुम्ही घरातील काही गोष्टींचा वापर केल्यामुळे तुम्हाला या समस्येवर मात करता येईल. केसांसाठी आवळा अतिशय उपयोगी ठरतो. आवळ्यामध्ये Amla खूप पोषक तत्वे असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते, ज्यामुळे तुमचे केस मजबूत, घनदाट आणि चमकदार होण्यास मदत मिळते. खाण्यातून तसेच हेअर मास्कच्या माध्यमातून तुम्ही केसांसाठी आवळा वापरू शकता. (फोटो सौजन्य : Istock )

केसांच्या वाढीस मदत होते

केसांच्या वाढीस मदत होते

आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई आढळते. आवळा केसांमध्ये नियमित वापरल्यास केसांची वाढ होण्यास मदत होते. शास्त्रज्ञांच्या मते आवळ्याच्या वापरामुळे केसांच्या मुळांना ग्लुकोज आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. आवळामध्ये केसांच्या फोलिकल्समधील ऑक्सिडेटिव्ह तणावाचा प्रभाव कमी करून केसांच्या वाढीस मदत करू शकतो.

हेही वाचा :  ४० व्या वर्षात मिळेल Teenager Look, मेकअप करताना वापरा या सोप्या टिप्स

(वाचा :- Skin care tips : तुमच्या घाणेरड्या सवयी चेहऱ्यावर आणतात अकाली म्हातारपण, आजच बदला या सवयी)

केस गळणे कमी करतं

केस गळणे कमी करतं

आवळ्याचा वापर केल्याने आवळा वापरल्याने केस गळणे देखील कमी होऊ शकते. एका अभ्यासानुसार, केसांच्या कूपांमध्ये आढळलेल्या त्वचेच्या पॅपिला पेशींची संख्या कमी झाल्यामुळे केस गळण्याचा धोका वाढतो. आवळा अर्क पॅपिला पेशींची संख्या वाढवून केसांच्या वाढीचा वेग सुधारू शकतो.

(वाचा :- Beauty tips : हट्टी Blackhead ला ‘या’ उपायांनी मुळासकट काढून टाका, चमकदार त्वचेसाठी एकदा नक्की वापरा)​

हेअर एजिंगमध्ये फायदेशीर

हेअर एजिंगमध्ये फायदेशीर

वयानुसार केस पांढरे होतात. केस वृद्धत्वामुळे केसांचा पोत, जाडी आणि गुणवत्ता कमी होऊ शकते. या सर्वांमध्ये आवळा केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असतो. यावेळी आवळा हे हेअर टॉनिक म्हणून काम करू शकते आणि त्यात व्हिटॅमिन सी गुणधर्म आहेत. जे कोलेजनवर परिणाम करून पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करू शकतात. केसांसाठी त्याचा नियमित वापर केल्याने अकाली पांढरे होणे आणि नुकसान टाळता येते.

टाळू निरोगी ठेवण्यास मदत होते

टाळू निरोगी ठेवण्यास मदत होते

टाळूशी संबंधित समस्या जसे की कोंडा आणि कोरडेपणा हे केस गळण्याचे मुख्य कारण असू शकते. आवळ्याचा वापर टाळूच्या आयुर्वेदिक उपचारांसाठीही केला जातो. आवळा पावडर डोक्यातील कोंडा आणि कोरडेपणा यांसारख्या टाळूच्या समस्या दूर करण्यास देखील मदत करू शकते.

हेही वाचा :  नखांना नखं घासल्याने खरंच केस वाढतात का ? जाणून घ्या खरं उत्तर

केसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतं

केसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतं

आवळ्यामध्ये टॅनिन नावाचे घटक आढळतात. हे घटक सूर्यप्रकाश आणि उष्णतापासून केसांचे संरक्षण करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी तुम्ही आवळ्याचा वापर करु शकता.

केसांसाठी आवळाच्या पाण्याचा फायदे

केसांसाठी आवळाच्या पाण्याचा फायदे
  • केसांची चमक वाढवण्यासाठी तुम्ही आवळ्याचा वापर करू शकता.
  • या गोष्टीमुळे केसांचा कोरडेपणा दूर होतो.
  • यामुळे डोक्याच्या टाळूला अॅलर्जी आणि कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.
  • त्याचप्रमाणे केसांना येणारी खास देखील कमी होती.
  • केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी आवळ्याच्या पाण्याने केस धुवा.
  • काही दिवसात केस पांढरे होण्याची समस्या दूर होईल.
  • केसांची वाढ सुधारण्यासाठी आवळा पाणी देखील खूप प्रभावी ठरू शकते.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …