निसर्गसौंदर्यानं नटलेल्या ‘रोहतांग पास’च्या नावातच दडलंय भयावह वास्तव! जाणून म्हणाल, दिसतं तसं नसतं…

Rohtang Pass : जेव्हाजेव्हा हिमाचल (Himachal Pradesh) तिंवा लाहौल (Lahaul) मार्गावर असणाऱ्या एखाद्या ठिकाणाला भेट देण्याचा योग येतो तेव्हातेव्हा रोहतांग पासला भेट देणं आणि तिथून पुढच्या रोखानं प्रवास करण्याचाही योग येतो. इथं पोहोचल्यावर रक्त गोठवणारी थंडी, आजुबाजूंनी खुणावणाऱ्या राकट पर्वतरांगा हेच दृश्य नजरेस पडतं. बरं या विस्तीर्ण पर्वतरांगांपुढे आपण किती नगण्य आहोत याची जाणिवही तिथंच होते. असा हा रोहतांग पास जितका मन मोहणारा आहे तितकाच तो धडकी भरवणाराही आहे. 

रोहतांग पासशी संबंधीत स्थानिकांमध्ये काही अशा धारणा आहेत ज्या शहरी मंडळींना फारच नव्या आहेत. त्या जाणून घेण्याआधी हिमाचल रोखानं प्रवास करणाऱ्या सर्वच पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी. ती म्हणजे यंदाच्या वर्षाच्या प्रवासासठी Rohtang Pass Kfne करण्यात आला आहे. 13 जूनपासून हा मार्ग प्रवाशांना वापरता येणार आहे. यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यामुळं साधारण 38 दिवस उशिरानं हा मार्ग खुला झाला. 

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल (National Green Tribunal)च्या नियमांअंतर्गत दर दिवशी इथून 1200 वाहनं पुढे जाऊ शकणार आहेत. यासाठी पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही परवाना घेणं अपेक्षित आहे. https://rohtangpermits.nic.in/ या संकेतस्थळावर तुम्हाला 550 रुपयांना हा परवाना दिला जाईल. दर दिवशी या मार्गानं 800 पेट्रोल आणि 400 डिझेल वाहनं जाऊ शकणार आहेत. 

हेही वाचा :  Maharasta Politics : 'दिल्लीपती बादशहाला मातीत...', रोहित पवारांचा अशोक चव्हाणांना टोला, स्पष्टच विचारलं 'आपण कोण?'

रोहतांग पास आणि त्याबाबतच्या कधीही न ऐकलेल्या गोष्टी….

भौगोलिक रचनांच्या कारणास्तव रोहतांग पासचा जगाशी काही काळासाठी संपर्क पूर्णपणे तुटतो. पण, सध्याच्या काळात मात्र यावरही तोडगा निघताना दिसत आहे. अटल टनलच्या निर्मितीमुळं इथं प्रवास अधिक सुखकर झाला आहे. पण, त्याआधी दशकांपूर्वी इथं एक विचित्र प्रथा प्रचलित होती. ज्यानुसार लाहौल स्पिती ते मनाली या मार्गावरून ये-जा करणाऱ्या समुहांमध्ये एकाच कुटुंबातील दोन सदस्य प्रवास करत नसत. यामागचा हेतू एकच की, रोहतांग ओलांडताना कोणताही अपघात झाल्यास कुटुंबातील दोन व्यक्तींना एकदाच गमावण्याची वेळ येऊ नये. रोहतांगमधील हवमानाच्या माऱ्यामुळं ही प्रथा प्रचलित होती. 

रोहतांग शब्दाचा नेमका अर्थ…

13058 फूट इतक्या उंचीवर असणारी रोहतांगची दरी ही हिमाचल प्रदेशातील सर्वात धोकादायक दरी आहे. इतकंच काय, तर या ठिकाणाच्या नावामागेही एक धडकी भरवणारं वास्तव आहे. ‘रोहतांग’ या शब्दाचा अर्थ मुळात मृतदेहांचा असा आहे. असं म्हणतात की या भागातून प्रवास करताना अनेकांनीच जीव गमावला आहे. म्हणूनच या प्रदेशाला रोहतांग पास असं म्हणतात. तिबेटन भाषेमध्ये ‘रो’ म्हणजे मृतदेह आणि ‘तांग’ म्हणजे मैदान. शब्द जोडायचा झाल्यास मृतदेहांचं मैदान  अर्थात रोतांग/ रोहतांग. 

हेही वाचा :  तुटून पडणारे डोंगर अन् कोलमडणाऱ्या इमारती...; हिमाचल- उत्तराखंडमध्ये वरुणराजाच ठरतोय काळ; दृश्य पाहून बसेल धक्का

 

रोहतांगच्या नावामागच्या रहस्यासोबतच अनेक दंतकथाही सांगण्यात येतात. असं म्हणतात री रोहतांग भृगु तुंग नावानंही ओळखला जातो. काही पौराणिक कथांनुसार देवादिदेव महादेवाच्या त्रिशुळातून झालेल्या प्रहारानं येथील पर्वतशिखरांमध्ये एक मोठी भेग तयार झाली. हेच ते रोहतांग पास.  



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …