डायबिटीसच्या रूग्णांनी व्हाईट ब्रेड खाणे अयोग्य? काय होते नुकसान घ्या जाणून

केवळ भारतातच नाही तर जगभरात डायबिटीस अर्थात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या सांगण्यात येणाऱ्या आकडेवारीनुसार, भारतात ७७ मिलियन व्यक्तींना मधुमेह आहे तर १२.१ मिलियन व्यक्तींना कमी वयात मधुमेह झाला आहे. इतकंच नाही तर २०४५ पर्यंत मधुमेही रूग्णांची संख्या साधारण २७ मिलियन इतकी वाढू शकते असं सांगण्यात येत आहे. डायबिटीसवर वेळीच उपचार केल्यास आणि खाण्यापिण्यामध्ये सावधानता बाळगल्यास नियंत्रणात राहू शकतो. पण व्हाईट ब्रेड खाल्ल्याने डायबिटीस रूग्णांवर परिणाम होतो का? असा प्रश्न अनेकदा विचारण्यात येतो. याबाबत आम्ही डाएटिशियन सिल्की महाजन यांचे इन्स्टाग्राम पेज फॉलो केले आणि याबाबत अधिक माहिती मिळवली. (फोटो सौजन्य – iStock)

​डायबिटीस असताना व्हाईट ब्रेड खाता येतो?​

​डायबिटीस असताना व्हाईट ब्रेड खाता येतो?​

डाएटिशियन सिल्की महाजनने आपल्या पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे डायबिटीसच्या रूग्णांनी कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये अथवा टाळावे यामध्ये सर्वात पहिले वर व्हाईट ब्रेडचे नाव लिहिले आहे. साखर नियंत्रणात आणणे हे सर्वात पहिले काम आहे. डायबिटीसमध्ये तुम्ही व्हाईट ब्रेड खाल्ल्यास नुकसान पोहचते. वास्तविक व्हाईट ब्रेडमध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात असते, जे शरीरातील फॅट आणि रक्तातील साखरेची पातळी अधिक वाढवू शकते. त्यामुळे व्हाईट ब्रेड खाऊ नये.

हेही वाचा :  किचनमधील ४ मसाले जे करतील मत्कार, Diabetes रूग्णांनी त्वरीत उचला फायदा

व्हाईट ब्रेडमुळे वाढते वजन

व्हाईट ब्रेडमुळे वाढते वजन

डायबिटीसमध्ये वजन वाढणेही योग्य नाही. सफेद ब्रेडचे सेवन केल्याने वजन वाढू शकते. अन्य ब्रेडच्या तुलनेत यामध्ये अधिक कॅलरी आहे. तर डायबिटीसच्या रूग्णांचे वजन वाढल्यास, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणणे कठीण होते. अनेकदा डायबिटीस वाढल्याने हृदय रोग आणि स्ट्रोकसारखे आजार होण्याचा धोकाही वाढतो.

(वाचा – आहारात ही हेल्दी भाजी खात असाल तर व्हा सावध, Uric Acid दुप्पट वाढून होईल त्रास वेळीच करा आहारातून बाद)

​हृदयरोगाचा धोका व्हाईट ब्रेडमुळे वाढतो​

​हृदयरोगाचा धोका व्हाईट ब्रेडमुळे वाढतो​

अधिक प्रमाणात रिफाईंड कार्बोहायड्रेट असल्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांना हृदयरोगाचा धोकाही यामुळे संभवतो. रिसर्चनुसार, व्हाईट ब्रेडचे सेवन केल्यामुळे डायबिटीस रूग्णांना हृदयरोगाचा जास्त धोका संभविण्याचे सांगण्यात आले आहे.

(वाचा – Heart Failure किंवा मृत्यूसाठी जबाबदार ठरते पेरीकार्डियल इफ्यूजन, काय आहेत लक्षणे आणि उपचार)

​ब्लड शुगर वाढण्याची शक्यता​

​ब्लड शुगर वाढण्याची शक्यता​

सफेद ब्रेड बनविण्यासाठी जास्त प्रोसेसिंगचा वापर करण्यात येतो. प्रोसेस्ड झाल्यामुळे सफेद ब्रेड हा शरीरातील ब्लड शुगर वाढविण्यास मदत करतो. डायबिटीस असल्यास साखर वाढल्यास अन्य आजारांनाही निमंत्रण मिळते. त्यामुळे सहसा हा ब्रेड खाणे टाळा.

(वाचा – सप्लिमेंट्सचा शरीराच्या अवयवांवर होतो दुष्परिणाम? खरंच Supplements गरज आहे का)

हेही वाचा :  लग्नानंतर 7 महिन्यांतच बायकोने माझं जीवन मुश्किल करून ठेवलंय, मी काय करू

​पचनसंंबंधित समस्यांना कारणीभूत​

​पचनसंंबंधित समस्यांना कारणीभूत​

व्हाईट ब्रेड बनविण्यासाठी मैद्याचा वापर करण्यात येतो. यामुळे शरीरात पचनक्रिया योग्य पद्धतीने होत नाही. शरीराला मैदा पचविण्यासाठी अतिरिक्त मेहनत करावी लागते. मैद्याचा वापर झाल्यामुळे पचनसंबंधित बद्धकोष्ठता, पोटात दुखणे अथवा उलट्या होणे असेही त्रास निर्माण होतात. ज्याचा डायबिटीस रूग्णांवर अधिक दुष्परिणाम होऊ शकतो.

व्हाईट ब्रेड खाणे डायबिटीस रूग्णांसाठी कसे धोकादायक ठरू शकते याची कारणे आणि स्पष्टीकरण आम्ही तुम्हाला सांगितले आहे. त्यामुळे खाताना नक्की काळजी घ्या.

टीप – ही माहिती तुमच्या आरोग्यासंबंधी काळजी घेण्यासाठी दिली आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वागावे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …

बारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी

Loksabha 2024 Baramati : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात …