सप्लिमेंट्सचा शरीराच्या अवयवांवर होतो दुष्परिणाम? खरंच Supplements गरज आहे का

बर्‍याच लोकांसाठी, निरोगी जीवनशैलीसह जगणे म्हणजे केवळ पौष्टिक अन्नाचे सेवन करणे आणि पुरेसा व्यायाम करणे इतकेच असते. मात्र या पौष्टीक अन्नामध्ये जीवनसत्त्वांचा समावेश असलेला पूरक आहाराचाही समावेश आहे. मात्र या सप्लिमेंट्सची गरज नसताना किंवा जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो हेदेखील तितकेच खरे आहे. जेव्हा सप्लिमेंट्सचा विचार केला जातो तेव्हा ते घेण्यास काय नुकसान आहे? याबाबत आम्ही डॉ. श्रुती तापियावाला, नेफ्रोलॉजीस्ट आणि रेनल ट्रान्सप्लांट फिजिशियन, ग्लोबल हॉस्पिटल्स, परेल, मुंबई यांच्याकडून जाणून घेतले. (फोटो सौजन्य – iStock)

supplements for body (1)

supplements-for-body-1

सप्लिमेंट्सच्या फायद्यांबद्दल अनेकांना माहिती असून वास्तविकता आणि काल्पनिक गोष्टींमध्ये फरक करणे कठीण होऊ शकते. योग्य आहाराच्या सवयींचे पालन न केल्याने जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता निर्माण होते. मग अनेकजण याची कमतरता भरुन काढण्यासाठी ठराविक गोळ्या, कॅप्सूल किंवा पावडरचा वापर करतात.

हेही वाचा :  Purple Day: एपिलेप्सी म्हणजे काय? एपिलेप्सीचे संकेत, लक्षणे आणि उपाय घ्या जाणून

मात्र याचे केवळ फायदे न होता तोटे देखील होतात उदा. विटामिन डी 3 च्या अतिरेकामुळे तसेच कॅल्शियमची उच्च पातळी हृदय, मेंदू आणि मूत्रपिंडावर गंभीर परिणाम करु शकते. तसेच गंभीर परिणामांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारखे दुष्परिणामही दिसून येतात. केवळ ओमेगा -3 फॅटी ऍसिड आणि फॉलिक ऍसिड हृदयरोग रोखण्यासाठी उपयुक्त आहेत.

​शरीराला विशिष्ट पोषक तत्वांची गरज ​

​शरीराला विशिष्ट पोषक तत्वांची गरज ​

तुमचे शरीर नियमितपणे पेशी आणि ऊतींची दुरुस्ती आणि नवनिर्मितीस मदत करते. शरीरात पेशी निर्माण करण्याची तसेच जुन्या पेशींचे आयुर्मान संपल्यावर त्यांचा नाश/काढण्याची एक मजबूत प्रणाली असते. अन्न आणि त्याच्या चयापचयातून मिळणारी पोषक तत्वे सर्व अंतःस्रावी अवयवांची दैनंदिन कार्ये पार पाडण्यासाठी, मेंदू, हृदय आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कार्यासाठी आवश्यक रसायने तयार करण्यासाठी आणि हाडांच्या आरोग्यासाठी हाडांना योग्य प्रमाणात खनिजे प्रदान करण्यासाठी वापरली जातात

(वाचा – महिला आणि मुलांच्या आरोग्यासाठी लोहाचे महत्त्व, अन्यथा होऊ शकतो अ‍ॅनिमिया)

​आपल्या अन्नातून सर्वकाही पोषक तत्त्वे मिळतात का?​

​आपल्या अन्नातून सर्वकाही पोषक तत्त्वे मिळतात का?​

होय, जर एखाद्याने ताजी फळे, भाज्या, मसूर (डाळ), कडधान्ये, तृणधान्ये, दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असलेला समतोल आहार घेतला तर शरीर आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे शोषून त्यावर प्रक्रिया करू शकते. सकाळच्या सूर्यप्रकाशात आणखी व्यायाम केल्याने आणि ताजी हवा (ऑक्सिजन) मिळाल्यास हाडे आणि स्नायू मजबूत होण्यास मदत होईल.

हेही वाचा :  PCOS समस्येतून बाहेर यायचे असेल तर हे पदार्थ खावे, आयुर्वेदातील नियम

(वाचा – लघ्वी होताना जळजळ होत असेल तर डाएटमध्ये करा असे बदल)

​सप्लिमेंट घेण्यापूर्वी तुम्हाला काय माहीत असले पाहिजे?​

​सप्लिमेंट घेण्यापूर्वी तुम्हाला काय माहीत असले पाहिजे?​

अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आहारातील डाएटरी सप्लिमेंट्सच्या नियमनाची जबाबदारी घेत असताना, नवीन सप्लिमेंट्स विकले जाण्यापूर्वी कोणतीही सुरक्षा चाचणी किंवा एफडीएची मंजुरी आवश्यक नसते. शिवाय, पौष्टिक पूरक पॅकेजिंगमध्ये त्याच्या संभाव्य दुष्परिणामांचा उल्लेख करणारे कोणतेही निर्बंध नाहीत किंवा गोळ्यांच्या आकारासंबंधीतही काही मानक नाहीत (वृद्ध लोकांसाठी स्पष्ट धोका).
काही कारणास्तव, न्युट्रिशनल सप्लिमेंट्स, ओव्हर-द-काउंटर (OTC) आणि प्रिस्क्रिप्शन औषधांचे सेवन हे एकमेकांमध्ये व्यत्यय आणू शकतात. जेव्हा एखादी कमतरता सिद्ध होते आणि डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर आधारित सप्लिमेंट असल्यावरच त्याचे सेवन करावे.
(वाचा – स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण, तज्ज्ञांकडून सखोल माहिती)

​डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पूरक आहार घ्यावा​

​डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पूरक आहार घ्यावा​

प्रक्रिया न केलेले अन्न, ताजी फळे, भाज्या, मसूर, कडधान्ये, तृणधान्ये आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश असलेला आहार नियमित व्यायाम आणि ताजी हवा मानवी शरीराच्या गरजा पूर्ण करतात. वैद्यकीयदृष्ट्या सूचित केल्यावरच पूरक आहार वापरला पाहिजे. काही सप्लिमेंट्स, योग्यरित्या वापरल्यास, तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, तर काही निरुपयोगी किंवा अगदी घातकही असू शकतात.

हेही वाचा :  ‘परी म्हणू की सुंदरा' प्रियाचे परफेक्ट साडी लुक्स, पारंपरिक आणि मॉडर्न तडका

​पुरेसा व्यायामही आवश्यक​

​पुरेसा व्यायामही आवश्यक​

बर्‍याच लोकांसाठी, निरोगी जीवनशैलीचे पालन करणे म्हणजे केवळ पौष्टिक आहाराचे सेवन करणे आणि पुरेसा व्यायाम करणे यापेक्षा अधिक आवश्यक आहे; त्यात जीवनसत्त्वे, पूरक आहार आणि अतिरिक्त पौष्टिक पदार्थांचाही समावेश आहे. तथापि, त्यांच्या संभाव्य फायद्यांची व्यापक माहिती असूनही, त्यांच्या संभाव्य तोट्यांबद्दल कमी समज आहे. खरं तर, या वस्तूंचा वापर काहीवेळेस आपत्कालीन परिस्थिती देखील उद्भवू शकते.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …