Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा आकडा पाहूनच फुटेल घाम; उन्हाळा सहन करायचा तरी कसा?

Maharashtra Weather Update: देशातील हवामानात होणारे बदल, पश्चिमी झंझावाताचा कमी झालेला वेग अशी एकंदर परिस्थिती पाहता फेब्रुवारी (February) महिन्यातच तापमानवाढीचा सामना करावा लागत आहे. राजस्थान, हरियाणा, (Himachal Pradesh) हिमाचलमध्येही आता थंडीचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालेलं असून, महाराष्ट्रातही याचे परिणाम दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात ऐन फेब्रुवारीतच उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

अकोल्यात (Akola) दिवसा 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मागील दहा वर्षातील कमाल तापमानाचा हा उच्चांक ठरत आहे. तर, नागपुरातही पारा 38 अंशांवर गेला आहे. सकाळच्या वेळी उष्णता आणि रात्री थंडी असं चित्र सध्या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. फेब्रुवारीपासूनच सुरु झालेला हा उन्हाळा आता ऐन मार्च ते जून या काळात कसा असेल याच विचारानं अनेकांना घाम फुटू लागला आहे. दरम्यान पुढील चार दिवस (Nagpur) नागपूरसह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीत तापमान 40 अंशांच्याही पलीकडे जाण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

कोकणवासियांसाठीही इशारा… 

पुढील दोन दिवस कोकणात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्या धर्तीवर इथं तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअसच्या घरात राहण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड भागांत तापमानाचा आकडा वाढतच असेल. त्यातच आकाश निरभ्र असल्यामुळं इथं सूर्यकिरणांमुळं जाणवणारी उष्णता तुलनेनं अधिक असेल.

हेही वाचा :  'आई-बहिणींना अपशब्द वापरू नका' नाशिकच्या युवक महोत्सवात पीएम मोदींचं आवाहन

पिकांवरही उन्हाळ्याचा परिणाम… 

दिवसागणिक सातत्यानं वाढत्या उन्हाचा परिणाम शेतमालावरही होताना दिसत आहे. जिथं रब्बी पीक आणि भाजीपाल्याचं नुकसान होताना दिसत आहे. तापमानात एकाएकी 3 ते 4 अंशांनी वाढ झाल्यामुळं हरभऱ्याची फुलंही गळून पडली आहेत. तर, गव्हाच्या ओंब्याही करपू लागल्या आहेत. ज्यामुळं येत्या काळात या गोष्टींच्या किमतीही वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान विदर्भात तापमानाच झालेली वाढ पाहता येथील कोणत्या जिल्ह्यात नेमकं किती तापमान हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं. त्यामुळं गरज नसल्यास दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नका. उष्माघातापासून स्वत:चा बचाव करण्यावर भर द्या.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

VIDEO : ‘तुझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य.. ‘, चिमुकल्या जसप्रीतच्या मदतीसाठी अर्जुन कपूर धावला, म्हणतो ‘वडिलांच्या निधनानंतर…’

Arjun Kapoor offers to help Jaspreet :  हिरवा टी-शर्ट आणि गडद निळ्या रंगाच्या पगडीमधील एका …

दिल्लीत डॉक्टरच रुग्णांकडून घेत होते लाच, CBI ने 9 जणांना केली अटक; RML रुग्णालयातील रॅकेटचा भांडाफोड

दिल्लीत सीबीआयने मोठी कारवाई केली असून, आरएमएल रुग्णालयात सुरु असलेल्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. सीबीआयने …