Cold Wave : अरेच्छा! मनालीहून राज्याच्या ‘या’ भागात जास्त थंडी; तापमानातील फरक मोठा

Cold Wave : महाराष्ट्रात दीर्घकाळ मुक्कामी असणारा पाऊस आता कुठच्या कुठे पळाला आणि राज्यात हळुहळू हिवाळ्यानं (Winters in maharashtra) जोर धरला. दिवाळीच्या दिवसांपासून सुरु झालेली ही थंडी आता चांगलीच जोर पकडताना दिसत आहे. इतकी की, हिमाचल प्रदेशातील मनालीहून जास्त थंडी महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला राज्यातील बहुतांश भागांमध्ये संध्याकाळपासून सकाळच्या वेळीसुद्धा थंडीचा कहर पाहायला मिळत आहे. त्यातच घसरणारा पारा पाहता पर्यटनप्रेमींनीही या ठिकाणांवर येण्याचे बेत आखण्यास सुरुवात केली आहे. (Winter Cold wave in maharashtra imd weather forcast)

महाराष्ट्रातील सर्वात निचांकी तापमान कुठे? (Lowest temprature in maharashtra)

महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी (Nashik) नाशिकच्या ओझरमध्ये (Ozar) नोंदवण्यात आलं आहे. ओझरला सोमवारी (आज) 5.7 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आलीये. तर, निफाडचा पारा 7 अंशावर आहे. नाशिकमध्ये येणाऱ्या दिवसागणिक थंडीचा कहर वाढताना दिसत आहे. ही यंदाच्या हंगामातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद असून, कडाक्याच्या थंडीने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आला आहे. 

हेही वाचा :  चेहऱ्यावरील काळ्या डागामुळे सौंदर्यात येतेय अडचण, तर आजच करा असा आयुर्वेदिक उपाय

निफाडमध्ये सलग चौथ्या दिवशी थंडीचा कहर

गुलाबी थंडीचा अनुभव चालु हंगामात निफाड (Niphad) तालुक्यातील नागरिकांना जाणवू लागला आहे. कारण, सलग चौथ्या दिवशीही निफाडचा पारा घसरला आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची राज्यात निच्चांकी नोंद झाली. 

गोंदिया जिल्ह्यातही असंच काहीसं चित्र (Gondia)

तिथे गोंदिया जिल्ह्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे.  पारा सातत्याने घसरत चालला असून जिल्हाचे किमान तापमान 10.4 अंशांपर्यंत खाली उतरलं आहे.  विदर्भात सर्वात थंड जिल्हात दुसऱ्या क्रमांकावर गोंदिया जिल्हा आहे. पुढील आणखी काही दिवस अशीच बोचरी थंडी कायम राहणार, असा अंदाज हवमान विभागाकडून वर्तवण्यात येतोय.  कोल्हापूर, सातारा, अमरावतीमध्येही परिस्थिती वेगळी नाही. 

मुंबईतही गारवा… (Mumbai Winter)

रविवारी राज्यात अनेक शहरांमध्ये तापमान 10 ते 15 अंशापर्यंत नोंदवण्यात आलं. मुंबईतही यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच पारा 20 अंशाखाली घसरला. सांताक्रूझमध्ये 19 अंश इतकं तापमान  नोंदवण्यात आलं. येत्या 24 तासांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी असेल असंही सांगण्यात येतंय. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या (Himachal Pradesh) हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) बर्फवृष्टी होत असल्यामुळं तिथून वाहणाऱ्या शीतलहरींचे परिणाम देशभरात दिसू लागले आहेत. 

हेही वाचा :  Nilpaint remover hacks: रिमूव्हरशिवाय नेलपेंट काढण्याच्या हटके ट्रिक्स एकदा वापराचं..

एकंदरच राज्यात असणारं वातावरण पाहता हिवाळी सहलींचे बेत आखण्यास अनेकांनीच सुरुवात केली आहे. आतातर निफाडचं तापमान पाहता, 8 अंशांवर असणाऱ्या मनालीला जाण्यापेक्षा काहींनी राज्यांतर्गत पर्यटनास प्राधान्यही दिलं आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …