ही 8 लक्षणं ओरडून सांगतात की हार्ट वॉल्व झालाय ब्लॉक, सतत धाप लागली व थकवा जाणवला तर ताबडतोब करा हे काम नाहीतर

valvular disease हा आजार भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये इतक्या जास्त प्रमाणात आहे की सर्वात सामान्य हृदयरोगांपैकी एक समजला आहे. हा रोग समजून घेण्यापूर्वी आपल्याला वॉल्व म्हणजे काय हे माहित असणे आवश्यक आहे. तर मंडळी, आपल्या हृदयात 4 वॉल्व असतात. हृदय निरोगी आणि कार्यान्वित ठेवण्यासाठी रक्त एका वॉल्वमधून दुसऱ्या वॉल्वपर्यंत वाहते आणि नंतर ते शरीरात पंप केले जाते. रक्त एका वॉल्वमधून दुसर्‍या वॉल्वमध्ये जाण्यासाठी एका मार्गातून किंवा दारातून त्याला जावे मागते आणि याच दाराला वॉल्व असे म्हणतात.

तर या व्हॉल्व्युलर आजाराचे प्रकार काय आहेत? या वॉल्वचे रोग प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात एकतर स्टेनोसिस किंवा रिगर्जेटेशन. कडकपणामुळे हे वॉल्व किंवा दार उघडता न येण्याला स्टेनोसिस म्हणतात आणि बंद न होण्यामुळे बॅक लीक होण्याला रेगुर्गिटेशन असे म्हणतात. व्हॉल्व्युलर आजार असलेल्या व्यक्तीला एक किंवा अधिक वॉल्वमध्ये अडथळा किंवा ब्लॉकेजेस असू शकतात. हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलमधील कॅथ लॅबचे डायरेक्टर आणि वरिष्ठ सल्लागार इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. भरत व्ही पुरोहित यांनी व्हॉल्व्युलर आजार म्हणजे काय, त्याची लक्षणे, कारणे आणि उपचार काय हे सांगतले आहे. (फोटो सौजन्य :- iStock)

हेही वाचा :  ना अंडी, ना केळी; मुलांच्या पोषण आहारावर शिक्षकांचा डल्ला, भंडाऱ्यातील संतापजनक घटना

व्हॉल्व्युलर आजाराची लक्षणे काय आहेत?

व्हॉल्व्युलर आजाराची लक्षणे काय आहेत?

सर्वात आधी आपण हा व्हॉल्व्युलर आजार कसा ओळखावा हे जाणून घेऊया आणि त्यासाठी कोणत्या लक्षणांचा आधार घेतला जातो हे समजून घेऊया. तर या आजारचे पहिले लक्षण म्हणजे डॉक्टरांना स्टेथोस्कोपने हुशिंग साउंड ऐकता येतो. याशिवाय छातीत दुखणे, पोटात सूज येणे, थकवा जाणवणे, धाप लागणे, विशेषतः झोपताना धाप लागणे, घोटे आणि पाय सुजणे, चक्कर येणे, बेशुद्धपणा यांसारखी अन्य लक्षणे देखील व्हॉल्व्युलर आजाराचाच संदेश देतात.

(वाचा :- Diabetes Tips : या स्टेजमध्ये कायमचा संपतो डायबिटीज, फक्त हे 2 उपाय करणा-यांना स्पर्शही करत नाही Blood Sugar..)​

काय आहेत कारणे?

काय आहेत कारणे?

लक्षणे तर आपण जाणून घेतली आता जाणून घेऊया या आजाराची कारणे काय आहेत? म्हणजेच हा आजार नेमका होतो तरी कसा आणि कोणत्या गोष्टींमुळे ट्रिगर होतो. तर मंडळी, रूमेटिक हार्ट डिजीज, डिजेनरेटिव्ह वॉल्व डिजीज, हार्ट अटॅक, कार्डिओमायोमाथिस, थायरॉईड रोग, डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, रेडिएशन थेरपी, जेनेटिक हार्ट डिजीज, पेसमेकर किंवा AICD लीड इत्यादीचे रोपण ही सर्व व्हॉल्व्युलर आजाराची लक्षणे आहेत.

(वाचा :- Marburg Virus : मारबर्ग व्हायरसने 9 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर WHO हादरलं, चालता चालता सुरू होतात ‘ही’ 2 लक्षणं)​

हेही वाचा :  Volcano eruption: अतिभयंकर! अंतराळातून असा दिसतो ज्वालामुखीचं रौद्ररुप पाहा, VIDEO

आजारावर निदान आणि उपचार

आजारावर निदान आणि उपचार

डॉक्टरांच्या मते, व्हॉल्व्युलर रोग टाळण्यासाठी उपाय म्हणून लोकांनी त्वचा रोग आणि घसा खवखवणे टाळण्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि यासाठी दात आणि तोंडाच्या स्वच्छता गांभीर्याने घ्यावी. जर एखाद्याला संधिवाताचा किंवा रूमेटिक ताप असेल तर त्याला रोगप्रतिबंधक औषध म्हणून पेनिसिलिन इंजेक्शन दिले जाते. जर व्यक्तीला संधिवाताचा ताप असेल परंतु कार्डिटिस नसेल तर इंजेक्शन 5 वर्षे किंवा व्यक्ती 21 वर्षे वय पूर्ण करेपर्यंत दिली जातात. जर कार्डिटिस असेल परंतु व्हॉल्व्युलर नुकसान नसेल तर, एक रोगप्रतिबंधक इंजेक्शन दिले जाते.

(वाचा :- या आजाराने गळतात केसांचे पुंजकेच्या-पुंजके, 1 दिवसात पडतं टक्कल,शास्त्रज्ञांचे हे 8 उपाय देतात लांब-घनदाट केस)​

या आजारापासून कसा करावा बचाव?

या आजारापासून कसा करावा बचाव?

या आजारापासून तुम्ही स्वत:चा बचाव करू शकता पण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी पाळाव्या लागतील. सर्वात आधी तर

  1. जास्त मीठ असलेले अन्नपदार्थ कमी खा.
  2. नियमितपणे व्यायाम करा (आठवड्यातील 5-6 दिवस किमान 30-45 मिनिटे)
  3. निरोगी वजन राखण्याचा प्रयत्न करा
  4. धूम्रपान आणि मद्यपान टाळा
  5. स्ट्रेसवर मात करा
  6. योग आणि ध्यानधारणेसाठी वेळ काढा
  7. सोशल मीडिया, मोबाईल/व्हिडीओ गेम्सचे व्यसन टाळा.

या काही मोजक्या पण प्रभावी गोष्टी केल्या तर तुम्हाला व्हॉल्व्युलर आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

हेही वाचा :  'वडिलांसारखी केवळ वस्त्रं घालून वारसा सांगता येत नाही'

(वाचा :- हा कॅन्सर लक्षणं न दाखवता जन्मापासून शरीरात कणाकणाने वाढतो, मेंदू व हाडांत पसरण्याआधी दाखवतो फक्त हे एकच लक्षण)​

मेडिकल चेकअप देखील आहे महत्त्वाचे

मेडिकल चेकअप देखील आहे महत्त्वाचे

वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमचा डीएम/हाय ब्लड प्रेशर/लिपिड पातळी आणि हृदयाच्या वॉल्वचे आजार लवकर ओळखण्यासाठी वैद्यकीय तपासणी करून घेत राहा आणि स्थिती अधिक गंभीर होऊ नये यासाठी उपाययोजना करा. अनुवांशिक हृदयविकार टाळण्यासाठी तुमच्या पालकांना हृदयविकाराचा त्रास होता का याची मेडिकल हिस्ट्री शोधा. जर तसे काही आढळले तर स्वत:ची अधिक काळजी घ्या. ज्या व्यक्तीला हा आजार होण्याची उच्च जोखीम आहे त्या व्यक्तीमधील हा आजार लवकर ओळखण्यासाठी फिटल इकोकार्डियोग्रामचा वापर केला जाऊ शकतो.

(वाचा :- हे 6 पदार्थ किडनीचे फिल्टर करतात कायमचे खराब, झपाट्याने वाढतात हे 7 भयंकर आजार, किडनी फेलमुळे होऊ शकतो मृत्यू)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पुण्याचे पोलीस आयुक्त फडणवीस टोळीचे हस्तक असून..’, ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, ‘अग्रवालने कोणाला..’

Uddhav Thackeray Group Slams Pune Police: पुण्यातील कल्याणी नगरमध्ये 19 मे रोजी झालेल्या पोर्शे कारच्या …

Maharashtra Weather News : वादळ, अवकाळी अन् उष्णतेची लाट; राज्यासाठी हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा

Maharashtra Weather News : मागील काही दिवसांपासून देशाच्या एका किनारपट्टीवर ‘रेमल’ चक्रिवादळाचा (Remal Cyclone) धोका …