हाडांचा संपूर्ण भुगा होईपर्यंत बघू नका वाट, ताबडतोब घरी आणा या 6 गोष्टी आणि बघा कमाल

हाडांशिवाय शरीराची कल्पनाही करता येत नाही. शरीराची संपूर्ण रचना ही हाडांवर अवलंबून असते. हाडांमधील कोणत्याही प्रकारची कमजोरी किंवा रोग तुमच्या शरीरासाठी समस्या ठरू शकतात. हेच कारण आहे की एक्सपर्ट्स हाडांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला देतात. हाडे निरोगी आणि मजबूत कशी ठेवायची? हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम खूप महत्वाचे आहे. पोषणतज्ञ आणि आहारतज्ञ अंजली मुखर्जी यांच्या मते, प्रौढांना त्यांची हाडे निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी दररोज किमान 1000 मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते.

हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्या शरीरात कॅल्शियमचे शोषण करण्यासाठी मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी सारख्या इतर पोषक तत्वांची सुद्धा आवश्यकता असते. हाडांमध्ये कॅल्शियमचा कोणताही दोष किंवा कमतरता रिकेट्स आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या घातक आजारांना कारणीभूत ठरू शकते. एवढेच नाही तर वयोमानानुसार किंवा पडल्यामुळे हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोकाही वाढू शकतो. निरोगी हाडांसाठी दूध हा एकमेव उपाय नाही. पुरेसे कॅल्शियम मिळविण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील गोष्टींचाही समावेश करू शकता.

हेही वाचा :  Teachers Job: निवृत्त शिक्षकांना ZP शाळांमध्ये नोकरीची संधी; वयोमर्यादा, पगाराबद्दल जाणून घ्या

गाजर व पालकचा ज्यूस

6 गाजर आणि 50 ग्रॅम पालक घ्या आणि त्यांचा रस तयार करा. आपण या मिश्रणातून सुमारे 300 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळवू शकता. याशिवाय, हा रस त्वचेसाठी फायदेशीर मानला जातो कारण हा अँटीऑक्सिडेंटचा सर्वोत्तम स्रोत आहे.

(वाचा :- किडनी स्टोन, मुतखडा, गुडघेदुखी, हाडांचा चुरा होणं या समस्या झटक्यात होतील दूर,हा पदार्थ ठरेल चमत्कार)

डाळ आणि कडधान्ये

सर्व डाळी आणि कडधान्यांमध्ये जसे की राजमा, काबुली चणे, काळी मसूर याच्या 100 ग्रॅममध्ये सुमारे 200 ते 250 मिलीग्रॅम कॅल्शियम आढळते.

(वाचा :- Omicron Symptom: जगभरात कहर माजवलेल्या ओमिक्रॉन BF.7 चं मुख्य लक्षण Hyposmia, नाकात होते वाढ, कसे ओळखावे संकेत)

काळे आणि सफेद तीळ

दररोज दोन ते तीन चमचे तीळ खाल्ल्यास 1400 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळू शकते. तुम्ही ते गुळासोबतही खाऊ शकता. शक्य असल्यास त्याची चटणी करून खाऊ शकता. ही चटणी स्वादिष्ट आणि हेल्दी असं दोन्हीचं मिश्रण असते.

(वाचा :- पोट साफ होण्यासाठी व इम्युनिटी वाढवण्यासाठी औषधासमान आहेत या 5 भाज्या, रोज खाल्लं तर करोना स्पर्शही करणार नाही)

हेही वाचा :  Ayodhya: 'आता लाऊडस्पीकरचा प्रॉब्लेम नाही का?', ट्रोलरला सोनू निगमचं सणसणीत उत्तर, 'पहाटे कोंबड्यांप्रमाणे बांग देत...'

पालेभाज्या

हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचे उत्पादन मुबलक प्रमाणात होते. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही भरपूर पालेभाज्या खाऊ शकता. पालक, बथुआ, मोहरीची भाजी यांसारख्या भरपूर भाज्या खाव्यात. यामध्ये कॅल्शियमसोबत असे अनेक पोषक तत्व आढळतात जे संपूर्ण शरीरासाठी आवश्यक असतात.

(वाचा :- रिसर्चमध्ये दावा, 3 दिवसांत मुळापासून संपतात Cancer च्या 65% घातक-जीवघेण्या पेशी, जीवनदान ठरतोय हा ग्रीन ज्यूस)

कॅल्शियमसाठी या भाज्या खा

अंजली म्हणाल्या की, सार्डिन मासे, ब्रोकोली, सोयाबीन, अंजीर आणि तृणधान्यांमध्येही कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. मजबूत हाडांसाठी आपण नियमितपणे या सर्व गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे.

(वाचा :- Anti Aging: 10 मिनिटांचा वेळ काढून दिसू शकता तब्बल 16 वर्षे लहान व तरूण, वय कमी करण्यासाठी डॉक्टरचा अनोखा उपाय)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कॅल्शियम रिच फूड्स..!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …

बारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी

Loksabha 2024 Baramati : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात …