दुबईत राहणाऱ्या भारतीयाचे एका रात्रीत नशीब फळफळले; खात्यात आले 45 कोटी, काय घडलं नेमकं?

Indian Man Wins Lottery In UAE: भारतातील तब्बल पाच व्यक्तींचे दुबईत नशीब उजळले आहे. मागच्या आठवड्यात सयुंक्त अरब अमीरातीतील (यूएई) वेगवेगळ्या शहरात राहणाऱ्या कमीत कमी पाच भारतीयांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या लोकांना लकी ड्रॉमध्ये लॉटरी लागली आहे. यातीलच एक नियंत्रण कक्षात ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीला 45 कोटींची लॉटरी लागली आहे. युएईमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक लॉटरीमध्ये पैसे लावतात. यात मध्यम वर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांची संख्याही अधिक आहे. गेल्या काही वर्षात अनेक भारतीयांनी करोडो रुपये जिंकले आहेत. 

बुधवारी 154 ड्रॉची घोषणा करण्यात आली. त्यावेळी ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले श्रीजू यांना महजूज सॅटरडे मिलियन्समध्ये जवळपास 45 कोटींची लॉटरी लागली आहे. श्रीजु हे मुळचे केरळ राज्यातील आहे. गेल्या 11 वर्षांपासून ते युएईत फुजैराहमध्ये राहून कार्यरत आहेत. त्यांना जेव्हा लकी ड्रॉ जिंकल्याची बातमी कळली तेव्हा ते कंपनीत काम करत होते. श्रीजु यांना जेव्हा त्यांनी 45 कोटींची लॉटरी जिंकली आहे हे कळलं तेव्हा त्यांनाही क्षणभर विश्वास बसला नाही. 

गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत श्रीजु यांनी म्हटलं आहे की, मी कारमध्ये बसत असतानाच मला एक मेसेज आला. त्यानंतर मी माझे अकाउंट चेक केले तेव्हा खात्यात भरपूर पैसे जमा झाले होते आणि माझा विश्वासच बसत नव्हता. मी लॉटरी जिंकलोय हे कळताच मी खूप आश्चर्यचकित झालो होतो. माझा आनंद कसा व्यक्त करावा हे देखील मला कळत नव्हतं. पण मी महजूजच्या फोनची वाट पाहिली जेणेकरुन मी लॉटरी जिंकलोय याची पुष्टी होईल. श्रीजु यांना सहा वर्षांची दोन मुलं आहेत. तर, लॉटरीच्या पैशातून ते भारतात एक घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत. 

हेही वाचा :  मारुती 800 मध्ये बदल करून बनवली रोल्स रॉयस कार, असा जुगाड कधी पाहिला नसेल

गल्फ न्यजूच्यानुसार, अन्य एका भारतीयाने मागील शनिवारी इमेरेट्स ड्रॉ फास्ट 5मध्ये राफ्फेल पुरस्कार जिंकला आहे. दुबईत राहणाऱ्या केरळच्या सरत शिवदासने जवळपास 11 लाख रुपयांची धनराशी जिंकली आहे. यापूर्वी 9 नोव्हेंबर पोजी मुंबईत राहणाऱ्या मनोज भावसारने फास्ट 5 राफ्फेलमध्ये जवळपास 16 लाख रुपये जिंकले होते. भावसार गेल्या 16 वर्षांपासून अबूधाबीमध्ये राहत आहेत. 

आठ नोव्हेंबर रोजी अन्य एक भारतीय अनिल जियानचंदानी यांनी दुबई अंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित करण्यात आलेल्या दुबई ड्युटी फ्री मिलेनियम मिलेयनेयर प्रमोशनमध्ये 10 लाख अमेरिकन डॉलर जिंकले होते. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …