गुलाबी लेहंगा व हिरवागार ब्लाऊज,चक दे इंडियातील बलबीरचा नववधू लूक घालतोय भुरळ,हातातील ती एक गोष्ट वेधतीये लक्ष

Shahrukh Khan चा ‘चक दे इंडिया’ चित्रपट तर तुम्हाला आठवत असेलच. आज इतकी वर्षे झाली पण त्या चित्रपटाची जादू काही कमी झालेली नाही. आज सुद्धा टीव्हीला तो चित्रपट लागला की आपण चॅनेल बदलत नाही. या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयची चुणूक दाखवून दिली होती. त्यापैकीच एक होती तान्या अब्रोल जिने चित्रपटात बलबीर कौरची भूमिका साकारली होती. नुकताच तिचा विवाहसोहळा पार पडला. तिने तिचा खूप वर्षांपासूनचा बॉयफ्रेंड आशिष वर्मासोबत लग्नगाठ बांधली.

पंजाबमध्ये दोघांनी सात फेरे घेत एकमेकांना आयुष्यभरासाठी आपलेसे केले आहे. त्यांच्या या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. फोटोंमधील तान्याचा ट्रेडिशनल लूक सर्वांनाच खूप भुरळ घालत आहे. चक दे इंडियामधील अनेक कलाकार सुद्धा तिच्या या विवाह सोहळ्याला आवर्जून उपस्थिती असले दिसले. अभिनेत्री रुबीना दिलैकही तिचा पती अभिनव शुक्लासोबत साडी लुकमध्ये या शुभकार्याला हजर होती. (फोटो सौजन्य :- इंस्टाग्राम @tanyaabrol, @chitrashi, vidyamalavade Twitter – Delhi Times,Lalamughal, Bharat 24 – Vision Of New India, KhabriBhai

हेही वाचा :  K Pop प्रसिद्ध गायिका हेसूचा हॉटेलमध्ये आढळला संशयास्पद मृतदेह, चाहत्यांना धक्का

तान्या अब्रोलचा लुक

तान्या अब्रोलचा लुक

तान्या अब्रोलने तिच्या लग्नासाठी अतिशय साधा लूक निवडला होता, पण तरी त्यात ती खूप जास्त सुंदर दिसत होती. तर यच समारंभाला एथनिक लूकमध्ये आलेली ‘चक दे इंडिया’ची गर्ल गँग तिच्या आयुष्यातील ह्या महत्त्वाच्या प्रसंगी तिला चीअर करतानाही दिसली. तान्याने पिंक कलरचा लेहंगा परिधान केला होता ज्यावर मणी आणि सिक्विन वर्कसह गोल्डन जरी वर्क होते. तिने या सुंदर लेहेंगा स्कर्टसोबत हिरव्या रंगाची चोली घातली होती ज्यावर सिल्व्हर सिक्विन वर्क होते. आपला हा लूक कम्प्लीट करण्यासाठी तान्याने डबल स्कार्फ कॅरी केला होता.

(वाचा :- नेटची काळीभोर साडी,हि-यांची भरजरी नक्षी,ऑफशोल्डर ब्लाऊज,काळीकुट्ट नेलपेंट,हुमा कुरेशीचंं मंत्रमुग्ध करणारं रूप)​

ब्राईडल लुकमध्ये दिसत होती सुंदर

ब्राईडल लुकमध्ये दिसत होती सुंदर

तान्याने लेहेंग्याशी मॅचिंग असणारा गुलाबी रंगाचा दुपट्टा घातला होता आणि दुसऱ्या बाजूला शियर एम्ब्रॉयडरी केलेला दुपट्टा होता. तिने या पारंपारिक आउटफिटसह स्टोन्स आणि पर्ल हेवी नेकलेस, मांग टिक्का, नथ, चुडा आणि कलिरे परिधान केले होते. ब्राइडल मेकअपमध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. दुसरीकडे, तिच्या शेजारी दिसणार्‍या रुबीनाने काळ्या रंगाचा ब्लाउज, स्कर्ट आणि दुपट्टा परिधान केला होता, जो साडीसारखा स्टाईल करत होता.

(वाचा :- ट्यूब टॉप व शॉर्ट्समध्ये तारा सुतारियाने फ्लॉंट केला सडपातळ बांधा, कातील अदा बघून इंटरनेचा पारा गेला सर्रकन वर)​

हेही वाचा :  प्रजासत्ताक दिनाला भरभरून खाल्लेल्या जिलेबीचे Health Benefits जाणून घ्या

हळदी-मेहंदी समारंभातही होता सिम्पल लुक

हळदी-मेहंदी समारंभातही होता सिम्पल लुक

तान्याने तिच्या हळदी-मेहंदी समारंभासाठी अतिशय साधे आउटफिट परिधान केला होता. मात्र पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये ती खुप जास्त छान दिसत होती. या फंक्शन्समध्येही आजकाल नवऱ्या हेवी आउटफिट घालणे पंसत करतात पण तान्याने अगदी साधा पिवळा आणि लाल सूट परिधान करून मन जिंकले होते. ह्या प्री-वेडिंग सेरेमनीमध्येही चक दे इंडियाची संपूर्ण टीम खूप मस्ती करताना दिसली. आपल्या लाडक्या मैत्रिणीचा हा खास क्षण अविस्मरणीय व्हावा म्हणून सगळ्या जणी झटत होत्या.

(वाचा :- दिशाच्या दिलखेचक लेहंगा-क्रॉप चोळी लुकपुढे नवीकोरी नवरी कियाराही फिकी, पोर्णिमेच्या चंद्रावर नवरा राहुलही फिदा)

चित्राशीने सुद्धा गोल्डन लेहंगा परिधान करून बांधली लग्नगाठ

चित्राशीने सुद्धा गोल्डन लेहंगा परिधान करून बांधली लग्नगाठ

‘चक दे इंडिया’ मधील कोमल चौटाला उर्फ चित्राशी रावतनेही काही दिवसांपूर्वी तिचा बॉयफ्रेंड ध्रुवदित्य भगवानानीसोबत लग्न केले आहे. तिने तिच्या लग्नात सोनेरी रंगाचा जड भरतकाम केलेला लेहेंगा घातला होता, ज्यामध्ये तिने डोक्यावर लाल दुपट्टा घातला होता. ब्रायडल ट्रॅडिशनल ज्वेलरी आणि मेकअपमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या ह्या विवाहसोहळ्याची सुद्धा सोशल मिडीयावर खूप जास्त चर्चा झाली आणि सर्वांनाच तिचा लुक खूप जास्त आवडला. या विवाहसोहळ्याला सुद्धा चित्रपटातील अनेक कलाकार उपस्थित होते.

हेही वाचा :  इगतपुरी-कसारा अंतर १० मिनिटांत गाठा, समृद्धीवरील सर्वाधिक लांबीचा बोगदा तयार, वाचा वैशिष्ट्ये

(वाचा :- न्यासा देवगणचा रेड शॉर्ट ड्रेसमध्ये कहर, गुलाबी गाल अन् नखरेल चाल बघून लाखो चाहत्यांच्या काळजाचा चुकला ठोका)​

लुक असावा कम्फर्टेबल

लुक असावा कम्फर्टेबल

आजकाल विवाह सोहळा म्हटलं की हेवी आउटफिट परिधान करण्याची फॅशन आहे पण फॅशन पेक्षाही आपला कम्फर्ट पाहणे गरजेचे आहे. कारण लग्न सोहळा म्हटलं की त्यात तासन तास जातात. अशावेळी जर केवळ फॅशन साठी एखादे आउटफिट परिधान केले आणि ते जर अनकम्फटेर्बल असेल तर आयुष्यातला हा खास प्रसंग खूप आवीत अनुभवही देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही लग्नसोहळ्यात कम्फटेर्बल कपड्यांचीच निवड केली पाहिजे.

(वाचा :- मलायका अरोराचा नादच नको…! ब्लॅक बॉडीसूटमधील किलर लुकसमोर वनपीसमधील करिश्मा कपूरही पडली फिकी, फॅशनची जुगलबंदी)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार…सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीडमधल्या मुंढेवाडी गावातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल …

Maharastra Politics : ‘रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण…’, सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

Jitendra Awhad On Sunil Tingare : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्श प्रकरणातील …