‘मुलीच्या जन्मापेक्षा जगात दुसरा कोणताच आनंद नाही’ अक्षयची भावूक पोस्ट, मुलीला बाबाकडून हव्या असतात या 6 गोष्टी

बॉलिवूडमध्ये सध्या एकच चर्चा आहे आणि ती चर्चा म्हणजे रणबीर कपूर – आलिया भट्टच्या लेकीची. आलिया भट्टने ६ नोव्हेंबर रोजी लेकीला जन्म दिला. कपूर आणि भट्ट कुटुंबाने या चिमुकलीचं मनापासून स्वागत केलं आहे. महत्वाचं म्हणजे मुंबईतील HN Reliance Foundation Hospital मध्ये आलियाने बाळाला जन्म दिला. याच रूग्णालयात ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर देखील उपचार झाले. आजोबा आणि नातीची भेट झाली नाही, पण ही गोष्ट नक्कीच खास असेल.

आलियाच्या लेकीवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तिचं स्वागत केलं. पण या सगळ्यात एक पोस्ट मात्र भरपूर चर्चेत आली ती म्हणजे अभिनेता अक्षय कुमारची. अक्षय कुमार कधीच आपल्या मुलांबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत नाही. पण अक्षय कुमारने आलियाच्या मुलीसाठी दिलेल्या शुभेच्छा खास आहेत. (फोटो सौजन्य – Akshay Kumar इंस्टाग्राम / टाइम्स ऑफ इंडिया)

​अक्षयची भावनिक पोस्ट

अक्षय कुमारने आलिया भट्टच्या पोस्टवर कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत. “अभिनंदन !!! @aliaabhatt, रणबीर. मुलीच्या जन्मापेक्षा जगात मोठा आनंद नाही. तुम्हा सर्वांना आशीर्वाद .” अक्षयच्या या कमेंटने साऱ्यांचच लक्षलं वेधलं.

(वाचा – Alia Bhatt ने लेकीचं नाव आणि जन्माची तारीख आधीच ठरवली होती? ६ नोव्हेंबर आणि ‘हे’ नाव बाळासाठी ठरेल खास))

हेही वाचा :  Alia Bhatt : 'या' फोटोमुळे रणबीर-आलियाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण 

​अक्षय कुमारची लेक

अक्षय कुमार देखील लेकीचा बाप आहे. तिचं नाव नितारा (Nitara). अक्षय कुमारला दोन मुलं आहेत. मोठ्या मुलाचं नाव आरव (Aarav) असं आहे.

(वाचा – अभिनेत्री Urmila Nimbalkarच्या ‘आईपण’ चा अनुभव, बाळाची तुलना करण्यावर बोलली उर्मिला, वाचा ७ टिप्स)

​नितारा या नावाचा अर्थ

नितारा हे नाव संस्कृतमधून आलं आहे. याचा अर्थ आहे मूळाशी खोलवर, ठाम असा याचा अर्थ होतो. अतिशय वेगळं असं हे व्यक्तीमत्व असतं. अंकशास्त्रानुसार ९ हा त्याचा शुभांक आहे. या नावाची रास हे ‘वृश्चिक’ असून याचे नक्षत्र ‘अनुराधा’ हे आहे.

(वाचा – मुलांनी उत्तम यश संपादन करावं असं वाटतंय? सद्गुरू वामनराव पै यांनी सांगितलेल्या उत्कर्षाच्या 7 पायऱ्या फॉलो करा)

अक्षयची लेक

​बाप आणि लेकीच्या नात्यातील खास गोष्टी

लेक आणि बाप यांच नातं अतिशय वेगळं असतं. या नात्यात मुलगी बापासाठी लेक तर असतेच. पण कधी ती आई होते तर कधी बहिणही होते. या नात्यात एक वेगळा गोडवा आहे. लेकीच्या येण्यानंतर बापामध्ये सकारत्मक बदल होतात. हे आपण पाहिलं आहे.

(वाचा – मुलीचं नाव ठरवायला ऐश्वर्या आणि अभिषेकने लावले इतके दिवस, बच्चन कुटुंबियांपासूनही का लपवलं नाव?)

​बापाने लेकीचं सगळं ऐकून घ्यावं

मुलीला कुणाकडून नाही पण बापाकडून मात्र खूप अपेक्षा असते. जगात कुणीही आपल्याबरोबर नसेल पण आपला “बाबा” आपल्यासोबत खंबीर उभा राहिल हा विश्वास त्या लेकीला बापाबद्दल असतं. अनेक मुली इंट्रोवर्ड असतील पण त्या आपल्या बापाशी मोकळेपणाने बोलत असतील. लेकीला बापालाच सगळ्याच गोष्टी पहिल्या सांगायच्या असतात. त्यामुळे लेक अगदी चिमुकली तान्ही असू दे किंवा लग्न झालेली एका बाळाची आई असू दे. तिच्यासाठी तिचा बाबा हा कायमच खास असतो.

हेही वाचा :  Gangubai Kathaiwadi : 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाच्या यशात अमूलही सहभागी, शेअर केले व्यंगचित्र

(वाचा – आक्रमक Virat Kohli मध्ये लपलाय संवेदनशील आणि भावनिक ‘बाप’, लेक Vamika साठी असा आहे तिचा ‘विराट बाबा’))

​चर्चा करा – फक्त हुकूम देऊ नका

मुलगी ही प्रत्येक घराला घरपण आणतं. त्या घराच्या वेलीवर उमलेलं फुलं म्हणजे लेकं. अशा लेकीला भीतीने कोमेजून टाकू नका. तिच्याशी चर्चा करा गप्पा मारा. तिला तुमच्या अंगणात फुलू द्या. अगदी सुरूवातीपासूनच मुलीशी बापाने चर्चा करावी. मग ती कोणत्याही विषयावर असो.

(वाचा – मुलांनी उत्तम यश संपादन करावं असं वाटतंय? सद्गुरू वामनराव पै यांनी सांगितलेल्या उत्कर्षाच्या 7 पायऱ्या फॉलो करा)

​मुलीचं कौतुक करा

कौतुक कुणाला नको असतं, पण तुमच्या लेकीचं आवर्जून कौतुक करा. याने तिचा आत्मविश्वास वाढेल. मुलीशी चर्चा केल्यामुळे तिची स्वतःची अशी वेगळी मत तयार होतात. अशावेळी तिच्या मतांना, भावनांना प्राधान्य द्या. घरात एखादा छोटा बदल जरी करायचा असेल तर लेकीला तिचं मत विचारा. जेणे करून ती स्वतंत्र्य विचार करायला लागेल आणि तिचा आत्मविश्वासही वाढेल.

(वाचा – घटस्फोटाचा निर्णय मागे घेणाऱ्या धनुषच्या मुलांची नावे माहित आहेत? आतापर्यंत अशी नावे कुठेच ऐकली नसतील)

​लेकीच्या आवडीच्या गोष्टीत तुम्ही रमा

मुलगी असंख्य गोष्टी पाहत असते अनुभवत असते. तिच्या शाळेत तिचं एक वेगळं विश्व असतं. हे विश्व तुम्ही तिच्यासोबत अनुभवा. तुमची आणि मुलीची आवड बहुदा सारखी नसेल. पण तरीही तिच्या आवडींमध्ये तुम्ही रमा. अगदी गाणी ऐकणे, चित्र काढणे.. कारण या सारख्या गोष्टी तुम्ही तिच्यासोबत केलात तर तुमचं नातं घट्ट तर होईल.

हेही वाचा :  एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार? भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

(वाचा – सतत लघवीला येणं, स्तनांना सूज हे Early Pregnancy Symptoms, मासिक पाळी येण्याआधीच मिळेल Good News)

​मुलीसमोर आदर्श पुरूष बना

लेकीच्या आयुष्याच जो पहिला पुरूष येतो तो तिचा ‘बाप’ असतो. तिचा बाप समाजातील पुरूषांच प्रतिनिधित्व करत असतो. अशावेळी तुम्ही तिच्याशी अतिशय मोकळेपणाने वागा. तुमच्या वागण्यात एक अदब, आदर, प्रेम आणि विश्वास असू द्या. एवढंच नव्हे तर एक पती आपल्या पत्नीशी कसं वागत असतो, हे देखील तुमची मुलगी अनुभवत असते. त्यामुळे तिचासमोर चांगला आदर्श ठेवा. कारण पुढे जाऊन प्रत्येक मुलगी आपल्या जोडीदारात एक बापाची छबी शोधत असते.

(वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स))Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …

कल्याण लोकसभेची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी; रस्त्यावर सापडले शेकडो मतदार ओळखपत्र

Kalyan Lok Sabha : ठाकरे गटाने कल्याण लोकसभेमधील संपूर्ण निवडणूक ही संशयास्पद असून पुन्हा एकदा …