Chocolate Day 2023 : जगातलं सर्वात महागडं चॉकलेट, आयुष्यभराचा पगारही पुरणार नाही, वाचा किंमत!

Happy chocolate day 2023: प्यार से संवर जाती है जिंदगी, जब रिश्तों में चॉकलेट की तरह मिठास होती है, असं म्हणतात. व्हॅलेंटाईन वीकचा (Valentine’s Week) तिसरा दिवस म्हणजेच चॉकलेट डे (Chocolate day).. चॉकलेट डे दिवशी नात्यातील गोडवा विरघळणार आहे. प्रेमवीर या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. अनेक तरुण तरुणी आपल्या आवडत्या व्यक्तीला चॉकलेट देऊन आयुष्याची नवी सुरूवात करतात. चॉकलेटची किंमत जास्तीत जास्त हजार पर्यंत मिळते. त्यामुळे प्रेमाला किंमत नसले म्हणत अनेकजण एकमेकांना चॉकलेट देतात. मात्र, जगातलं सर्वात महागडं (Most expensive chocolate in the world) चॉकलेट तुम्ही कधी पाहिलंय का?

‘ले चॉकलेट बॉक्स’ हे चॉकलेट जगातील सर्वात महागडं चॉकलेट आहे, असं मानलं जातं. चॉकलेटचा दर्जा हा पाहिल्यावरच दिसून येतो. या चॉकलेटची विशेष गोष्ट म्हणजे चॉकलेट बॉक्स.. याला हिऱ्याचे हार, बांगड्या-पन्ना आणि नीलमणी बनवलेल्या अंगठ्या आहेत. त्यामुळे हे चॉकलेट खूपच खास आहे. सॉफ्ट आणि स्पेशल चवीसाठी प्रसिद्ध असलेलं चॉकलेट कोणीही सहजासहजी घेऊ शकत नाही.

आणखी वाचा – Chocolate Day 2023: एक असा देश जिथं अनोख्या पद्धतीने साजरा होतो ‘चॉकलेट डे’, होनमेई चोको, गिरी चोको असतं तरी काय?

हेही वाचा :  Long Distance Relationship मध्ये कसा कराल व्हॅलेंटाईन डे साजरा, या गोष्टी लक्षात ठेवाल तर भांडणं होणार नाहीत

‘ले चॉकलेट बॉक्स’ च्या एका बॉक्सची किंमत सुमारे 1.5 दशलक्ष डॉलर म्हणजेच 10.94 कोटी रुपये आहे. डेन्मार्कमधून आलेले निप्सचिल्ड चॉकोलेटियरचे चॉकलेट ट्रफल हे चॉकलेट देखील सर्वाधिक किमतीच्या यादीत येतं.  चॉकलेट ट्रफलची किंमत 2,600 डॉलर म्हणजे 1,89,498 रुपये इतकी आहे. महागडे चॉकलेट बनवण्यासाठी 28 दुर्लभ प्रकारच्या गोष्टींचा वापर करण्यात येतो.

दरम्यान, कोको, गोल्ड लीफ आणि La Madeleina Au Truffle या गोष्टींचा समावेश या चॉकलेटमध्ये करण्यात आलाय. नोका चॉकलेट हे चॉकलेट देखील काही दिवसांपासून चर्चत आलंय. सर्वात महागडं चॉकलेट असल्याचे फोर्ब्स मॅगझिनमध्ये देखील नोंद करण्यात आली होती. या चॉकलेटची किंमत 330 डॉलर म्हणजे तब्बल 24602 रुपये होती.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात ‘इतक्या’ होर्डिंगवर कारवाई

Navi Mumbai Illegal Hoarding : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी 13 …

Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्रात गेल्या काही …