ही 5 लक्षणं ओरडून सांगतात झाली आहे कॅन्सरची सुरूवात, Stage 1 आधीच करा ही 7 कामे, वाचेल जीव

कालच World Cancer Day म्हणजेच जागतिक कर्करोग दिन जगभरात साजरा केला गेला. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश या भयंकर आणि प्राणघातक आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे हा आहे. कॅन्सरचे नाव ऐकल्यावर प्रत्येकजण घाबरून जातो आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याबद्दल जागरूकता नसणे. कॅन्सरची लक्षणे लवकर व वेळेत ओळखल्याने चांगले आणि यशस्वी उपचार मिळू शकतात असे तज्ज्ञांचे मत आहे. दुर्दैवाने, कॅन्सरची अनेक लक्षणे प्रारंभिक अवस्थेत आढळून येत नाहीत आणि ज्या वेळेस ती आढळून येतात तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. यामुळेच डॉक्टर आणि एक्सपर्ट्स कॅन्सरच्या साध्या आणि सौम्य लक्षणांवरही बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला देतात.

किंबहुना, कर्करोगाचे संकेत आणि लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात आढळून आल्यास कर्करोगाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात वाढ होण्यापासून रोखता येऊ शकते आणि यशस्वी उपचार करण्यास मदत होऊ शकते. कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरची लक्षणे देखील भिन्न आहेत. आम्ही तुम्हाला कॅन्सरच्या सुरुवातीच्या काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत, ज्याकडे तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करू नये. (फोटो सौजन्य :- iStock)

विनाकारण वजन कमी होणे

विनाकारण वजन कमी होणे

​hopkinsmedicine ने आपल्या एका रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, जर तुमचे वजन कोणत्याही कारणाशिवाय कमी होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. गेल्या काही दिवसांत तुमचे वजन 10 पौंड म्हणजेच 4.5 किलो किंवा त्याहून अधिक कमी झाले असल्यास तुम्ही सावध झाले पाहिजे कारण क्वचित प्रसंगी ते कॅन्सरचे पहिले लक्षण असू शकते.

हेही वाचा :  लठ्ठपणावर मात करायचीय? ऋजुता दिवेकरने सांगितलेल्या ८ टिप्स फॉलो करा, चरबी सगळी वितळून जाईल

(वाचा :- रोज या 5 चुका करणारे लोक खेळतायत स्वत:च्या जीवाशी जीवघेणा खेळ, दुसरी चूक अत्यंत घातक, आजच सोडा नाहीतर..!)​

थकवा व अशक्तपणा जाणवणे

थकवा व अशक्तपणा जाणवणे

दिवसभराच्या कामानंतर थकवा येणे सामान्य आहे, परंतु कॅन्सरचा थकवा हा वेगळ्या प्रकारचा असतो. पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही जर तुम्हाला नेहमी थकवा आणि अशक्तपणा वाटत असेल, जो दूर होत नसेल तर हे कॅन्सरचे प्रारंभिक लक्षण असू शकते. वास्तविक कॅन्सर शरीरात पसरण्यासाठी शरीरातील पोषक तत्वांचा वापर करतो आणि यामुळेच शरीराला सर्व पोषक तत्व मिळत नाहीत आणि तुम्हाला थकवा जाणवतो.

(वाचा :- Cancer Survivor Story: वयाच्या 17व्या वर्षी झाला कॅन्सर, डॉक्टरांनीही मानली हार, पण या 6 पद्धतींनी जिंकली लढाई)​

ताप

ताप

हवामानातील कोणत्याही बदलामुळे ताप येणे सामान्य आहे, जे सर्दी आणि फ्लूचे सामान्य लक्षण असू शकते. हे लक्षणही दोन-तीन दिवसांत बरे होते. परंतु तुम्हाला वारंवार येणारा ताप तुम्ही कोणत्या ना कोणत्या कॅन्सरच्या विळख्यात आहात हे सूचित करतो. कॅन्सरचा ताप हा बहुतेकदा रात्रीच येतो. जर तुम्हाला इनफेक्शन किंवा इतर लक्षणे नसतील आणि घाम येण्यासोबत ताप येत असेल तर ते कॅन्सरचे लक्षण असू शकते.

(वाचा :- World Cancer Day : संधोशनात दावा – 1 नाही तब्बल 34 प्रकारच्या कॅन्सरचं मुळ आहेत रोज खाल्ले जाणारे हे 15 पदार्थ)​

हेही वाचा :  कर्करोगासाठी वरदान ठरतेय टार्गेटेड थेरपी, काय आहे नक्की ही थेरपी

वेदना होणं

वेदना होणं

शरीरात होणा-या वेदना अनेक कारणांमुळे असू शकतात आणि आराम केल्यावर किंवा औषधे घेतल्यावरही त्या ब-या होतात पण तुम्हाला सतत वेदना होत असतील तर तुमच्या शरीरात काहीतरी चुकीचे होत असल्याचे ते लक्षण आहे. कॅन्सरमध्ये वेदना अनेक कारणांमुळे होते जसे- शरीराच्या अनेक भागांमध्ये ट्यूमरमुळे दाब आणि वेदना होतात, कॅन्सर शरीरात रसायने सोडतो. ज्या भागातून मेटास्टेसिस पसरायला सुरू होते त्या भागात वेदना होतात.

(वाचा :- 2023 Budget – खनिज व व्हिटॅमिनचं भांडार आहेत हे पदार्थ, रोज खाल्ले तर वयाच्या 60 नंतरही होणार नाहीत गंभीर आजार )

त्वचेच्या रंगात फरक पडणे

त्वचेच्या रंगात फरक पडणे

त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे आणि त्यावर अनेक प्रकारचा परिणाम होतो. कावीळ (डोळे किंवा बोटे पिवळसर होणे) हे एक लक्षण आहे जे संभाव्य संसर्ग किंवा कॅन्सरचे संकेत दर्शवू शकते. तुम्हाला कावीळची लक्षणे दिसल्यास तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. त्वचेवर येणारे तीळ हलक्यात घेऊ नका, जर तुम्हाला त्यांच्यात वाढ होणे, फोड येणे, एकापेक्षा जास्त वेळा येणे, रंग बदलणे इत्यादी गोष्टी जाणवल्यास डॉक्टरांना दाखवा.

(वाचा :- डायबिटीज, ब्लड प्रेशर, खराब कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर फेकण्यासाठी खा हे 5 पदार्थ, चहा-कॉफीला चुकूनही लावू नका हात)​

कॅन्सरवर मात करण्यासाठी उपाय

कॅन्सरवर मात करण्यासाठी उपाय

Mayo Clinic च्या मते, तुम्ही अनेक गोष्टी लक्षात ठेवून तुमचा कॅन्सरचा धोका कमी करू शकता. सर्वप्रथम, जर तुम्हाला वर नमूद केलेली लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही विलंब न करता चाचणी करून घ्यावी. याशिवाय तंबाखूचा वापर टाळा, फळे आणि भाज्या यांसारख्या आरोग्यदायी गोष्टी नेहमी खाव्यात, वजन नियंत्रित ठेवावे आणि कमी-जास्त झाल्यास डॉक्टरांना भेटावे, सूर्याची थेट किरणे शरीरावर पडणार नाहीत असा प्रयत्न करावा, हिपॅटायटीस बी आणि एचपीव्हीसारख्या लस घ्याव्यात. असुरक्षित लैंगिक संबंध आणि सुया वापरणं टाळा. सतत वैद्यकीय तपासणी करत रहा.

हेही वाचा :  Cancer Causing Food : प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरला जबाबदार आहेत 9 पदार्थ, तरीही दररोज खातात

(वाचा :- मुळव्याध, पोट साफ न होणं, डायबिटीज यासारखे शरीर आतून पोखरणारे तब्बल 20 भयंकर आजार मुळापासून उपटतात या 6 गोष्टी)​

टीप :- हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात ‘इतक्या’ होर्डिंगवर कारवाई

Navi Mumbai Illegal Hoarding : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी 13 …

Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्रात गेल्या काही …