ALERT! तुमचा Smart TV तुमच्यावर पाळत ठेवतोय; सर्वात आधी ही Setting बदला

How to Stop Smart TV from Spying: स्मार्टफोन, लॅपटॉपच्या माध्यमातून हेरगिरी केल्याच्या अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत. पण तुमचा टीव्हीही असं करु शकतो का? हा प्रश्न जितका विचार करायला लावणार आहे. कारण आपण स्मार्टफोनबद्दल जितके सतर्क असतो तितकं आपण टीव्हीच्या बाबतीत विचार करत नाही. कारण येथे ना Incognito Mode असतो, ना कोणत्याही Privacy Features वर आपण कधी लक्ष देतो.

जवळपास एक दशकापूर्वी आपल्या सर्वांच्या घरात वजनाने जड असणारे छोटे टीव्ही होते. या टीव्हींची स्क्रीन फार मोठी नसायची. पण वेळेसह टीव्हीचे डिझाईन आणि फिचर्समध्ये बदल झाले. यामधील सर्वात मोठा बदल म्हणजे टीव्ही स्मार्ट झाले. आता बाजारात खासकरुन स्मार्ट टीव्हीच मिळतात. 

स्मार्ट टीव्हीला आपली माहिती कशी मिळते?

स्मार्ट टीव्हीत अनेक भन्नाट फिचर्स असतात. स्मार्ट टीव्ही वाय-फायला सहज कनेक्ट होतात. टीव्ही पाहण्यासाठी तुम्हाला आता सेट-टॉप बॉक्सची गरज भासत नाही. तुम्ही सर्व  OTT Apps डाऊनलोड करुन ठेवू शकता. मोबाईलमध्ये मिळणारे जवळपास सर्व फिचर्स स्मार्ट टीव्हीत उपलब्ध असतात. 

हेही वाचा :  Republic Day Sale : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं बंपर सेल; हजारोंची खरेदी करा, लाखोंची बक्षिसं मिळवा

पण या सर्व गोष्टींसह टीव्ही एक जोखीमही निर्माण करतो. सध्याच्या काळात युजर्सचा पर्सनल डेटा किती महत्त्वाचा आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आता जर तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा हाच डेटा टीव्ही जमा करत असेल तर काय होईल याचा विचार करा. 

आपण एका डिजिटल वर्ल्डमध्ये राहत असल्याने ट्रॅकिंगपासून बचाव करणं अशक्यच आहे. येथे तुम्हाला प्रत्येक पावलावर ट्रॅक केलं जात आहे. कधी फोन, तर कधी टीव्हीच्या माध्यमातून तुमचा डेटा जमा केला जात असतो. 

तुमचा टीव्ही तुमचा डेटा जमा करत आहे का?

आपला डेटा गोळा करुन कोणी काय करेल असा विचार तुमच्याही मनात आला असेल. पण कंपन्या अनेक पद्धतीने या डेटाचा वापर करत असतात. तुमच्या टीव्हीवर येणाऱ्या जाहिराती, मोबाइलवर येणारे Apps किंवा कार्यक्रम सुचवत त्यातून कंपन्या पैसे कमावत असतात. 

या सर्व गोष्टींमध्ये टीव्हीमधील एक फिचर मदत करत असतं. या फिचरला ACR असं म्हणतात. ACR म्हणजे Automatic Content Recongnition असा अर्थ आहे. हे एक व्हिजुअल रिकग्निशन फिचर आहे. हे फिचर तुमच्या टीव्हीवर येणारी प्रत्येक जाहिरात, टीव्ही शो किंवा चित्रपट यांची दखल घेत असतो. इतकंच नाही तर स्ट्रिमिंग बॉक्सेस, केबल, ओटीटी, DVD यांचीही माहिती जमा करत असतं. 
 

हेही वाचा :  वनप्लस कंपनीच्या दोन नव्या स्मार्ट टीव्ही ‘या’ तारखेला होणार लॉंच, स्पेसिफिकेशन लीक

Setting मध्ये हे फिचर बंद कसं करायचं?

हे फिचर प्रत्येक टीव्हीप्रमाणे वेगळं असतं. त्यानुसार ACR बंद करावं लागतं. पण तरीही आम्ही तुम्हाला एक सामान्य पद्धत सांगतो. जर तुम्ही सॅमसंगचा टीव्ही वापरत असाल तर याप्रकारे सेटिंगमध्ये बदल करा. आधी Smart Hub menu वर जावा नंतर Settings – Support आणि शेवटी Terms & Policy मध्ये जावा. 

इथे तुम्हाला Sync Plus and Marketing हा पर्याय मिळेल, तो तुम्हाला Disable करायचा आहे. जर तुम्ही टीव्ही सेटअप करत असाल तर Terms & Condition मध्ये ACR बंद करण्याचा पर्याय असेल. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …