Republic Day Sale : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं बंपर सेल; हजारोंची खरेदी करा, लाखोंची बक्षिसं मिळवा

Republic Day Sale 2023: एखादी नवी वस्तू खरेदी करायची झाल्यास त्या वस्तूचे दर विविध ठिकाणी पडताळून पाहिले जातात. अनेक दुकानं असो किंवा मग ई कॉमर्स वेबसाईट (E Commerce) असो. आपल्या खिशाला परवडेल आणि आपल्या अपेक्षा पूर्ण करेल अशाच वस्तू मग सारासार विचारानंतर खरेदी केल्या जातात. (TV, AC, Fridge, Laptop) टीव्ही, फ्रीज, एसी, लॅपटॉप या आणि अशा इतर गोष्टींची खरेदी करताना ही जुळवाजुळव केली जाते. तुम्हीसुद्धा अशीच आकडेमोड करत असाल, तर ती वेळ जवळ आली आहे. कारण, यंदाच्या (Republic Day 2023) प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी 2023 ला काही खास सवलतींचा फायदा तुम्ही घेऊ शकता. 

(TATA Group) टाटा समुहाच्याच Croma या रिटेल स्टोअरकडून तुम्हाला ही संधी देण्यात आली आहे. 19 जानेवारी 2023 पर्यंत मुदत असणाऱ्या या सेलमध्ये लॅपटॉपपासून (Smart watch) स्मार्टवॉचपर्यंत अनेक गोष्टींवर मोठी सूट मिळवू शकता. क्रोमाच्या या बंपर सेलमध्ये Apple, Samsung, HP, Dell, Lenovo, LG, Voltas, Redmi, Oppo अशा जगप्रसिद्ध ब्रँड्सवर सवलती देण्यात आल्या आहेत. 

 

(Home Appliences) होम अप्लायन्स, गॅजेट (उपकरणं), अॅक्सेसरीज आणि इतर अनेक गोष्टींवर ग्राहकांना मोठी सूट देण्यात येणार आहे. इतकंच नव्हे, तर दुकानांमध्ये consumer finance मुळे त्यांना 5 हजार रुपयांचा कॅशबॅकही मिळणार आहे. शिवाय विविध बँक कार्ड्ससाठी इथं 10 टक्क्यांची सवलत असेल. कुपन कोड्स, स्क्रॅच कार्ड्स अशा अनेक प्रमोशनच अॅक्टिव्हिटीजसुद्धा क्रोमाकडून आयोजित केल्या गेल्या आहेत. 

हेही वाचा :  Google : तुम्ही जर कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!

Tata Nexon जिंकण्याची संधी… 

क्रोमा स्टोअरमधून तुम्ही एखादा स्मार्टफोन खरेदी केला, तर स्क्रॅच कार्डच्या माध्यमातून तुम्ही 2.5 लाख रुपयांच्या भेटवस्तू किंवा नवीकोरी Tata Nexon EV घरी नेऊ शकता. Revamp Moto Electric Bikes चा पर्यायही तुमच्यासाठी असेल. 

विद्युत उपकरणं आणि इतर गोष्टींवर क्रोमाकडून घसघशीत सवलती… 

Core i3 laptops – रुपये 33,90 पासून पुढे 
इंटेल लॅपटॉप- रुपये 54,990 पासून पुढे 
(लॅपटॉप्सच्या खरेदीवर विद्यार्थी आणि शिक्षकांना 10 टक्के सरसकट सूट)

वोल्टासच्या four-in-one inverter split air conditioner वर महिना 2999 रुपयांच्या इएमआयची सूट. Croma 307L inverter frost-free refrigerator अवघ्या 22990 रुपयांमध्ये. Aquaguard RO+UV water purifier 14990 रुपयांमध्ये. front-load washing machine 19900 रुपयांपासून पुढे अशा धमाकेदार दरांमध्ये आता तुम्ही जी हवी, ती गोष्ट घरी आणू शकता. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …