Nafisa Ali Birthday: नफीसाला जेव्हा सासूने स्वीकारले नाही, नवऱ्यासह राहावे लागले मित्राच्या घरी, बॉलीवूडमध्ये गाठली ‘उँचाई’

माजी मिस इंडिया आणि ‘ऊँचाई’ चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री नफीसा अलीचा जन्म १८ जानेवारी, १९५७ रोजी झाला होता. नफिसाचे आयुष्य हे अत्यंत संघर्षात्मक होते. आज या अभिनेत्रीचा वाढदिवस असून तिच्या लव्हस्टोरीबाबत आपण जाणून घेऊया. हिंदू – मुस्लिम अशी ही कहाणी फारच संघर्षाची होती. पण तो संसार टिकवून नफिसाने एक आदर्शच घालून दिला आहे. प्रत्येक संकटाचा सामना करत नफिसाने आयुष्य सुंदर असते हेच शिकवलं. नफिसा एका मुस्लीम कुटुंबातील होती तर तिने लग्न एका शीख आर्मी ऑफिसर आणि अर्जुन पुलस्कार विजेता पोलो प्लेअरशी केले. नफिसासाठी हे खूपच कठीण होते पण तिने हार मानली नाही आणि आपलं प्रेम मिळवलं. एक वेळ अशी आली की नफिसाला लग्नानंतर तिच्या पतीच्या मित्राच्या घरी राहावे लागले होते.

कोलकाता​मध्ये केले रजिस्टर्ड लग्न

आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन नफिसा आणि रविंदर यांनी कोर्टामध्ये रजिस्टर्ड लग्न केले. कुटुंब या लग्नाला तयार होणारच नाही हे लक्षात घेऊन आपल्या प्रेमासाठी दोघांनी कुटुंबाचा त्याग केला. पण इथूनच त्यांच्या संघर्षाला सुरूवात झाली होती. लग्नानंतर सासूने अजिबात नफिसा यांना स्वीकारले नाही आणि आपला पती रविंदर यांच्यासह त्यांना नाईलाजाने मित्राच्या घरी वास्तव्य करावे लागले.

हेही वाचा :  "राहुल शेवाळे पत्नीला मारहाण करायचे तेव्हा मातोश्रीवर..."; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

(वाचा – 25th Anniversary: लग्नाआधी तासतास फोनवर बोलायचे चंकी पांडे आणि भावना, फिल्मी स्टाईलने केले होते प्रपोज)

भावाने दोघांना घरी नेले

मात्र काही काळ गेल्यानंतर नफिसाच्या सासूच्या भावाने पुढाकार घेत नफिसा आणि रविंदर यांना घरी येण्याची विनंती केली आणि नफिसाची माफीदेखील मागितले. त्यानंतर नफिसाला खऱ्या अर्थाने सासर मिळाले. इतकंच नाही तर रविंदर आणि नफिसाचे पुन्हा एकदा सर्व रितीरिवाज – परंपरेनुसार धुमधडाक्यात लग्न लावण्यात आले. बऱ्याच काळानंतर जेव्हा नफिसाच्या सासूची तब्बेत बिघडली तेव्हाही सासूला शेवटच्या क्षणी नफिसाजवळच राहायचे होते.

(वाचा – एका कमेंटवरून सुरू झाली राहुल वैद्य आणि दिशा परमारची Love Story, नॅशनल टीव्हीवर प्रपोज करून जिंकले मन)

​मोठ्या कुटुंबासह गोव्यात स्थायिक​

इतक्या सर्व संघर्षानंतर नफिसा तिच्या कुटुंबासह अत्यंत सुखात आहे. गोव्यामध्ये आपल्या मोठ्या कुटुंबासह नफिसा राहते. तर अजूनही चित्रपटात काम करत आहे. आपली मुलं, नातवंडं आणि पती रविंदर सोढी या सर्वांसह इथे स्थानिक असून मजेत आहे. तर नफिसाचा मुलगा अजितही बॉलीवूडमध्ये येण्याची तयारी करत आहे.

(वाचा – नीता अंबानी आणि टीना दोन्ही जावांमध्ये आहे मैत्रीचं नातं, कशा जपतात स्पेशल बाँड)

हेही वाचा :  Crime New: ये..लाल इश्क मलाल इश्क! बायकोला बॉयफ्रेंडसोबत बेडवर 'त्या' अवस्थेत पाहिलं अन्...

​नफिसाची अप्रतिम कारकिर्द ​

नफिसा एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नावाजलेल्या आहेतच पण लहान वयातच नॅशनल स्विमिंग चँपियन झाल्यानंतर १९७६ मध्ये Miss India चा बहुमान आपल्या नावे केला होता. त्यानंतर चित्रपटसृष्टीत आपले नशीब त्यांनी आजमावले. आपल्या मुलांच्या जन्मानंतर चित्रपटसृष्टीपासून काळी काळ लांब राहिल्यानंतर १८ वर्षांनी पदार्पण केले होते. २०१८ मध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला सामोरे गेल्यानंतर पुन्हा चित्रपटसृष्टीपासून त्यांना लांब राहावे लागले होते. पण आता कॅन्सरलाही त्यांनी हरवले आहे.

नफिसा आणि रविंदर सोढी यांच्या लव्ह स्टोरी ही अत्यंत फिल्मी असून यावर नक्कीच एखादा चित्रपट तयार होऊ शकतो. पण प्रेम असेल तर नातं इतका काळ टिकू शकते हा आदर्श सध्याच्या पिढीने नक्कीच या जोडप्याकडून घ्यायला हवा.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …