माजी मुख्यमंत्र्यांची नात करतेय आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ, मराठमोळा चेहरा वेधतोय सर्वांचं लक्ष

बॉलीवूडमध्ये टॉपला असणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रींची कमतरता नक्कीच नाही. अगदी नूतन, तनुजा पासून ते माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर, सोनाली बेंद्रे यांच्यापर्यंत यादी संपत नाही आणि आता यामध्ये अजून एक नाव जोडले जाऊ शकते ते म्हणजे अभिनेत्री शर्वरी वाघचे. बऱ्याच कार्यक्रमांनाही शर्वरी वाघची हजेरी हल्ली दिसून येते. बंटी और बबली २ मधून शर्वरीने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला असला तरीही तिला अजून म्हणावा तसा जम बसवता आलेला नाही. मात्र तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावरील फॉलोअर्समध्ये नक्कीच वाढ होताना दिसून येत आहे. केवळ सौंदर्यच नाही तर शर्वरीची स्टाईलही अत्यंत लक्षवेधी आहे. जाणून घेऊया. (फोटो क्रेडिटः योगेन शाह, @sharvari Instagram)

आकर्षक ब्लॅक गाऊन

शर्वरीने घातलेला हा ब्लॅक गाऊन फिल्मफेअर ट्रॉफीची नक्कीच तुम्हाला आठवण करून देत असेल आणि शर्वरीची शरीरयष्टीही इतकी आकर्षक आणि परफेक्ट आहे की हा गाऊन तिला कमालीचा शोभून दिसत आहे. एका बाजूला संपूर्णतः स्किन रंगाची बाजू असून दुसऱ्या बाजूने हा संपूर्ण काळ्या रंगाचा गाऊन आहे. कोणत्याही पार्टीसाठी हा उत्तम लुक आहे. यासह शर्वरीने मोकेळे केस सोडले आहेत आणि मॅट फिनिश मेकअप केला आहे. मात्र तिच्या या ब्लॅक अटायवरून नजर हटत नाहीये.

हेही वाचा :  फोन हरविल्यास Bank आणि Mobile डिटेल्स 'असे' ठेवा सेफ, अन्यथा होतील गंभीर परिणाम

एलिगंट आणि मराठमोळं सौंदर्य

साडीतील शर्वरीच्या अदाही वेड लावणाऱ्या आहेत. ऑरेंज रंगाची ही साडी शर्वरीच्या स्किन टोनवर अधिकच आकर्षक दिसतेय. याशिवाय शर्वरीचं मनमोहक रूप सोज्वळ सौंदर्यामुळे अधिक खुलले आहे. साडी त्यावर डिझाईनर स्ट्रेप्स ब्लाऊज खूपच सुंदर दिसत आहे. तर त्यासह करण्यात आलेला ग्लॉसी मात्र अत्यंत माफक मेकअप चाहत्यांना आवडला आहे. तिने ही साडीची स्टाईल कॅरी करताना गळ्यात केवळ चोकरचा आधार घेतला आहे आणि केसांचा घट्ट आंबाडा बांधत हा स्टाईल लुक पूर्ण केला आहे.

(वाचा – मुलांचा क्रश ठरतेय ही मराठमोळी गायिका, मनाचा ठाव घेणारे सौंदर्य)

सिल्व्हर ब्रालेट मरमेड गाऊन

कोणत्याही पुरस्कार सोहळ्यासाठी हा गाऊन अत्यंत अप्रतिम आहे. यासह करण्यात आलेला मेकअप आणि शिमरी सिल्व्हर अशा या गाऊनला एखाद्या ट्रॉफीसारखी पोझ देत शर्वरीने अधिक लक्ष वेधून घेतलं आहे. तसंच यामध्ये शर्वरीने घेतलेल्या या पोझमुळे तिच्यासारखी फिगर असावी असं वाटलं तर नक्कीच चुकीचं नाही. यासाठी शर्वरी किती मेहनत करत असेल हे वेगळं सांगायची गरज नाही.

(वाचा – ग्लॅमवर्ल्डमधील टीना अंबांनींचा साधा पण आकर्षक लुक अजूनही आहे टिकून, पाहा स्टाईल)

हेही वाचा :  ..म्हणून मोदी-शाहांनी राष्ट्रवादी अजित पवारांना दिली; संजय राऊतांचा दावा

मरमेड गाऊनमधील शर्वरीचे सौंदर्य

समुद्रकिनाऱ्यावरील मरमेड गाऊनमधील शर्वरीचा हा लुक नव्या पिढीला आकर्षित करणारा आहे. ब्लॅक अँड सिल्व्हर असे कॉम्बिनेशन असणारा हा गाऊन शर्वरीच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहे. तर त्यावर तिने सोडलेले मोकळे केस आणि चेहऱ्यावर आलेला नैसर्गिक प्रकाश यामुळे अधिक आकर्षक दिसत आहे. केवळ स्टाईलच नाही तर शर्वरीच्या अदांमुळेही यात भर पडली आहे.

(वाचा – २ लाखापेक्षाही अधिक किमतीच्या ड्रेसमध्ये प्रियांका चोप्रा चित्रपटाच्या स्क्रिनिंगला, असे नक्की आहे तरी काय ड्रेसमध्ये)

ऑल व्हाईट ड्रेस लुक

जॅकेट आणि वन पिस असा कॉम्बिनेशन असणारा ऑल व्हाईट लुक शर्वरीने केला आहे आणि यासह तिने गडद मेकअफ केलाय. तिची ही स्टाईल खूपच आकर्षक आणि सेन्सुअस वाटत आहे. तिचे सौंदर्य यामध्ये अधिक खुलून आले आहे.

शर्वरी वाघ हे नाव हळूहळू आता पुढे येत आहे. केवळ मनोहर जोशी यांची नात हीच ओळख न राहता स्टाईल आणि सुंदरता याबाबती शर्वरी वाघ अनेक अभिनेत्रींना मात देत आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही!

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

हेही वाचा :  काश ! हनिमूनच्या पहिल्या रात्री मला या गोष्टी माहित असत्या तर माझी आज ही अवस्था झाली नसती



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …