Sidharth Shukla Birthday: सिद्धार्थचे स्टायलिश लुक, चाहत्यांच्या मनात आजही क्रेझ

Bigg Boss 16 सध्या चालू आहे आणि आपल्या स्टाईलने अनेक स्पर्धकांनी चाहत्यांना आपलेसे केले आहे. मात्र सर्वाधिक चर्चा कायम झाली ती सिद्धार्थ शुक्लाची. १२ डिसेंबरला सिद्धार्थचा वाढदिवस असतो आणि त्याच निमित्ताने बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात स्टायलिश स्पर्धकाच्या स्टाईलची आजही चर्चा होताना दिसते. सिद्धार्थ शुक्लाची स्टाईल अनेक मुलं फॉलो करतात. त्याच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा सिद्धार्थच्या स्टाईल स्टेटमेंटची झलक. आजही चर्चेत असणाऱ्या सिद्धार्थची कम्फर्टेबल स्टाईल हेच त्याचं वैशिष्ट्य होतं. बेधडक, बिनधास्त आणि तितकाच स्टायलिश सिद्धार्थने चाहत्यांच्या मनात कायमची जागा मिळवली आहे.

कॅज्युअल लुक स्टाईल

सहज मित्रांसह बाहेर जाण्यासाठी अथवा कोणत्याही समारंभात तुम्हाला जर अगदी जास्त भपका करायचा नसेल आणि तरीही स्टायलिश दिसायचे असेल तर अशा पद्धतीचा टी-शर्ट तुम्ही कॅरी करू शकता. सिद्धार्थ शुक्लाचा हा टी-शर्ट कोणत्याही पार्टी, ऑफिस अथवा बाहेर जाण्यासाठी परफेक्ट आहे. कॅज्युअल तरीही स्टायलिश असा हा लुक चाहत्यांचेही लक्ष वेधून घेणारा आहे. त्यामुळे असे टी-शर्ट तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये समाविष्ट करून घेऊ शकता.

हेही वाचा :  Shehnaaz Gill : Sidharth Shukla च्या 'बर्थ-डे' निमित्त शहनाज गिलची भावनिक पोस्ट

परफेक्ट कॉर्पोरेट लुक

बऱ्याचदा ऑफिसमध्ये सूटचा वापर केला जातो. पण मग त्याच त्याच रंगांचाही कंटाळा येतो. सहसा मुलं गुलाबी रंग निवडत नाहीत. पण सिद्धार्थने नेहमीच अपवादात्मक स्टाईल केली आहे. पांढरा शर्ट आणि त्यावर कोट, ट्राऊझर हा परफेक्ट लुक तुम्ही तुमच्या कॉर्पोरेट मीटिंग्जसाठीही करू शकता. आकर्षक आणि तरीही साधा असा हा लुक कोणत्याही मुलासाठी परफेक्ट ठरेल.

(वाचा – अशी नेसा साडी की ४५ व्या वर्षीही दिसाल तिशीत, कळणार नाही तुमचं वय)

पार्टीसाठी ट्रेंडी लुक

खरं तर मुलांसाठी फारच कमी स्टाईल्स आहेत असं अनेकांना वाटतं. पण तुम्ही योग्य स्टाईल केली तर कोणत्याच स्टाईल्सची कमतरता भासत नाही. पार्टीला जाण्यासाठी सोबर लुक हवा असेल तर टी-शर्ट आणि त्यावर जॅकेट अशी स्टाईल कधीच चुकत नाही. कॅज्युअल पार्टी लुक, ऑन गो लुक यासाठी हा योग्य लुक आहे. पार्टीसाठी असो अथवा जॅकेट नसले तरीही टी-शर्ट आणि ट्राऊझर असो हा लुक तुम्हाला इतरांपेक्षा नक्कीच वेगळं ठरवतो. कम्फर्ट लेव्हल जास्त असल्यामुळे तुम्हालाही जास्त वेळ कपडे घालून राहण्याचा कंटाळा येत नाही. बऱ्याचदा मुलांना जास्त कपडे घालण्याचाही कंटाळा असतो. मात्र हा लुक त्याला अपवाद ठरतो.

हेही वाचा :  पुतिन यांनी 25 हजार बंडखोर सैनिकांना अशी काय ऑफर दिली की ते आहेत तिथेच थांबले?

(वाचा – ‘गोष्ट एका पैठणीची’, सायली संजीवचा विविध पैठणी डिझाईन्समधील मनमोहक लुक)

सणासाठी कुरता लुक

सण म्हटल्यानंतर कुरता तर हवाच. पण तो भरजरी अथवा जड असा कुरता मुलांना नको वाटतो. त्यातही काळा रंग असेल तर त्याची बातच वेगळी. सिद्धार्थने घातलेला हा काळ्या रंगाचा कुरता कोणत्याही घरच्या अथवा मित्रमैत्रिणीच्या लग्नासाठी उत्तम ठरतो. यामध्येही सिल्कचा कुरता असेल तर हलका आणि सांभाळायलाही सोपा आहे. तुमचा पारंपरिक लुक या कुरत्यामुळे पूर्ण होतो. त्यामुळे अशा पद्धतीचे कुरते तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच ठेवा.

(वाचा – Bigg Boss Marathi 4: तेजस्विनी लोणारीचा जलवा, फॅशन सेन्सने केले चाहत्यांना घायाळ! खेळ आणि सौंदर्याने जिंकले मन)

स्टायलिश लुक

पांढरा टी-शर्ट आणि निळी जीन्स हा लुक कधीच चुकीचा ठरत नाही. कुठेही जाण्यासाठी हा लुक प्रत्येकालाच आवडतो. अगदीच काही घालायला मिळत नसेल आणि पटकन कुठेतरी जायचं असेल तर सिद्धार्थचा हा लुक नक्कीच मुलांच्या उपयोगी ठरेल. हा लुक स्टायलिश तर आहेच. पण यामध्ये अधिक प्रयत्न करण्याची गरज भासत नाही. प्रत्येक मुलाकडे पांढरे टी-शर्ट आणि जीन्स असतातच. त्यामुळे असा लुक तुम्ही तुमचा लुक परिपूर्ण करण्यासाठी वापरू शकता.

हेही वाचा :  आपण पुन्हा भेटू... सिद्धार्थ शुक्लाच्या वाढदिवसानिमित्त शहनाज गिलची भावनिक पोस्ट

सिद्धार्थ शुक्ला हा अनेकांचा आवडता अभिनेता होता. पण केवळ आपल्या अभिनयानेच नाही तर आपल्या वागणुकीने आणि स्टाईलनेदेखील त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची आठवण म्हणूनच त्याचे काही लुक्स खास त्याच्या चाहत्यांसाठी.

(फोटो क्रेडिट: Instagram)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी ‘अशी’ केली तयारी

UPSC Success Story: आपल्या मुलाने चांगल शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावं असं प्रत्येक आईला वाटत …

चंद्र एकाच जागी स्थिरावणार; तब्बल इतक्या वर्षांनी आकाशात दिसणार भारावणारं दृश्य

Lunar Standstill : चंद्र… इथं पृथ्वीवर प्रेमाच्या आणाभाकांपासून खगोलीय घटनांपर्यंत महत्वाच्या भूमिकांमध्ये आणि रुपांमध्ये हा …