उर्फीच्या तक्रारीची महिला आयोगाकडून दखल; अहवाल सादर करण्याच्या मुंबई पोलिसांना सूचना

Urfi Javed: अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली. चित्रा वाघ यांच्या टीकेला उर्फीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं. उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती. आता उर्फीनं या प्रकरणी महिला आयोगाकडे (National Commission for Women) अर्ज केला आहे. 

उर्फीनं महिला आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जामध्ये नमूद केलं की, “मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे , माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे, असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी करून श्रीमती चित्रा किशोर वाघ यांनी केवळ स्वतःच्या राजकीय फायद्याकरिता किंवा वैयक्तिक प्रसिद्धीकरिता मला मारहाण करण्याच्या धमक्या प्रसारमाध्यमावरून जाहीरपणे दिल्या आहेत, सबब माझ्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे मला असुरक्षित वातावरण निर्माण होऊन मला मुक्तपणे वावरता येत नाही. 

मुंबई पोलीस आयुक्तांनी अहवाल सादर करवा:  महिला आयोग
उर्फीच्या तक्रार अर्जाची दखल घेत महिला आयोगानं मुंबई पोलीस आयुक्तांना यावर तात्काळ कारवाई करावी करण्याचा सूचना दिल्या आहेत. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करावा, अशा सूचना देखील महिला आयोगानं मुंबई पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्वीट केलं आहे. 

कोण आहे उर्फी जावेद? 

हेही वाचा :  जबरा फॅन... मित्राच्या पाठीवर बसून दिव्यांग व्यक्ती गेला 'पठाण' पहायला; पाहा व्हिडीओ

अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Chitra Wagh: ‘आज जर हिला थांबवलं नाही तर, अजून दहा जणी…; चित्रा वाघ यांचे उर्फीवर पुन्हा ताशेरेSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …