सकाळी उठून ही कामे केल्याने रॉकेटच्या स्पीडने धावतो मेंदू, वयाच्या शंभरीपर्यंत स्मरणशक्तीला धक्काही लागत नाही

Brain Health Tips : शरीराचा सर्वात शक्तिशाली भाग म्हणजे मेंदू. पण समस्या अशी आहे की बहुतेक लोक या महत्त्वपूर्ण अवयावाकडे अजिबात लक्ष देत नाहीत. काही सवयी अशा असतात ज्या मनाला निरोगी बनवतात. या सवयी अंगीकारणाऱ्या लोकांच्या मेंदूची शक्ती आणि स्मरणशक्ती (Healthy Habits For Brain) खरंच भन्नाट असते. जर तुम्हाला देखील अशीच तीक्ष्ण स्मरणशक्ती आणि निरोगी मन हवे असेल, तर आजच तुमच्या दैनंदिन दिनचर्येत आम्ही सांगतोय त्या निरोगी सवयींचा समावेश करा.

या सवयी खऱ्या अर्थाने तुम्हाला हेल्दी बनवतील आणि तुमच्यामध्ये एक वेगळाच बदल घडून येईल. या सवयी तुमच्यातला आत्मविश्वास देखील नक्कीच वाढवतील आणि तुम्ही स्वत:च स्वत:कडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागल. काय आहेत त्या सवयी? चला तर जाणून घेऊया!

ओमेगा -3 फूड्स

-3-

ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् मेंदूसाठी एखाद्या खतासारखे काम करते. हे पोषक तत्व मेंदूच्या विकासाला गती देतात आणि त्यामुळे मेंदूची क्षमता वाढू लागते. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशननुसार, ओमेगा-3 प्रदान करणारे पदार्थ खाल्ल्याने मेंदूच्या विकारांपासून संरक्षण मिळते. सॅल्मन फिश, कॉड लिव्हर ऑइल, फ्लेक्ससीड्स, चिया सीड्स, अक्रोड, सोयाबीन यांमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् आढळते. शिवाय तुम्ही काही सप्लिमेंट्सच्या आधारे सुद्धा ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् मिळवू शकता.

हेही वाचा :  धक्कादायक! राज्यामध्ये होमगार्डची डोक्यात गोळ्या झाडून हत्या; थरार CCTV मध्ये कैद

(वाचा :- भारतीय एअरपोर्टवरील तब्बल 200 प्रवाशांत सापडला Omicron BF.7, जगायचं असेल तर दिवसभर करा ही कामे – आयुष मंत्रालय)

सकाळी उठून म्युझिक ऐकणे

जे लोक सकाळी सकाळी रिलॅक्सिंग म्युझिक एकून उठतात त्यांच्यात दिवसभर तणाव कमी असतो. एनसीबीआयच्या एका खास रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, म्युझिकमध्ये तणावविरोधी गुणधर्म असतात, जे मेंदूचे आरोग्य राखतात. ज्या लोकांना सकाळी उठून असे रिलॅक्सिंग म्युझिक ऐकण्याची सवय असते ते लोक इतर लोकांपेक्षा गोष्टी जलद आणि चांगल्या शिकतात आणि त्यांनागोष्टी दीर्घकाळ लक्षात सुद्धा राहतात.

(वाचा :- Thyroid Symptoms in Men : पुरूषांची बाबा बनण्याची क्षमता हा आजार करतो कायमची नष्ट, आधी दिसतात ही 5 घातक लक्षणं)

रिफाइंड शुगरपासून लांब राहा

तुम्हाला जर खूप जास्त रिफाइंड शुगर सेवन करण्याची सवय असेल तर लवकरात लवकर तुम्ही ही सवय सोडली पाहिले. कारण रिफाइंड शुगर मेंदूला खोलवर नुकसान करते. ही वाईट सवय आधीच खराब असलेल्या स्मरणशक्तीला अजून जास्त वाईट बनवते आणि त्यामुळे हळूहळू स्मरणशक्ती अजून कमजोर बनू लागते व गोष्टी विसरण्यास सुरुवात होते. म्हणूनच तुम्ही रिफाइंड शुगरच्या वापरापासून दूर राहीले पाहिजे. यावर पर्याय म्हणून तुम्ही गूळ आणि मध यांसारख्या गोड पदार्थांची निवड करू शकता.

हेही वाचा :  '...तर अजित पवारांच्या गळ्यातच उडी मारेल'; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?

(वाचा :- Stomach Flu Remedy: पोटात हे इनफेक्शन झालं तर पाणी सुद्धा पचवू शकणार नाहीत आतडी, लक्षणं दिसताच करा हे 3 उपाय)

ऊन घेण्याची सवय

जे लोक रोज सूर्यप्रकाश घेतात, त्यांच्या मेंदूत डोपामाइन हार्मोनची पातळी योग्य राहते. हे हार्मोन मन शांत ठेवते आणि मूड सुधारते. म्हणूनच दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 5 ते 10 मिनिटे सूर्यप्रकाश घेण्याची सवय तुम्ही स्वत:ला लावली पाहिजे. काही दिवस ही गोष्ट करून पहा, तुम्हाला स्वत:लाच सवय लागेल आणि तुम्हाला स्वत:ला तुमच्यात बदल देखील दिसून येईल.

(वाचा :- Blood Thickening Foods : हे पदार्थ खात असाल तर सावधान, रक्त घट्ट होऊन बनू लागतील गुठळ्या, ब्लॉक होतील सर्व नसा)

7-9 तासांची झोप

7-9-

पुरेशी झोप न मिळाल्याने मेंदू थकतो आणि त्याची कार्य करण्याची क्षमता मंदावते. जे दररोज 7-9 तास झोपतात ते इतरांपेक्षा जास्त सतर्क आणि सक्रिय असतात. त्याच वेळी, गाढ झोप येण्यासाठी, झोपण्याच्या 3-4 तास आधी कॅफिनचे सेवन बंद केले पाहिजे. म्हणजेच ज्या पदार्थांमध्ये कॅफिन असते असे पदार्थ सेवन करू नये, जसे की कॉफी होय.

(वाचा :- Rishabh Pant च्या गुडघ्याचा हा भाग पूर्ण तुटलाय, हाडे भरून येण्यासाठी डॉक्टरांनी दिला हे पदार्थ खाण्याचा सल्ला)

हेही वाचा :  Balasaheb Thackeray Family Tree : राजकारणातील भगवं वादळ! जाणून घ्या बाळासाहेब ठाकरे यांची वंशवेल

FAQ – प्रश्नोत्तरे

faq-

अनेकांना एक प्रश्न सतावतो की मेंदूला चालना देण्यासाठी मेडिटेशन करणे आवश्यक आहे का?

तर मंडळी याचे उत्तर आहे की मेडीटेश एक चांगली सवय आहे. जी तुमचे मन शांत करते आणि मेंदूची ताकद वाढवते.

व्यायामाचा मेंदूवर कसा परिणाम होतो?

तर मंडळी, याचे उत्तर असे आहे की व्यायाम केल्याने शरीरातील ऑक्सिजन आणि पोषण वाढते व ते मेंदूलाही मिळते.

(वाचा :- 30 Days Yoga: फक्त 30 दिवसांत इम्युनिटी, मानसिक शांती वाढून सर्व रोग होतील दूर, पोट होईल साफ, फक्त करा हे 1 काम)

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …