बापरे! एका विचित्र आजाराने पिडीत रूग्ण तब्बल 2 महिने जगत होता फक्त द्रव पदार्थांवर, कारण जीभेवर उगवत होते ‘काळेभोर केस’!

माणसाला कधी आणि कोणता आजार घेरेल हे काहीच सांगता येत नाही. बहुतेक लोकांना काही आरोग्य समस्या किंवा आजारांबद्दल माहिती असते, परंतु कधीकधी असे विचित्र विषाणू किंवा रोग दिसतात, ज्याबद्दल सामान्य माणसाला किंवा डॉक्टरांनाही माहिती नसते. असेच एक विचित्र प्रकरण केरळमध्ये पाहायला मिळाले आहे. स्ट्रोकने (Stroke) पिडीत असलेल्या व्यक्तीच्या जिभेवर अचानक ‘काळे केस’ वाढू लागल्याचे सांगण्यात येत आहे. एका अहवालात 50 वर्षीय व्यक्ती स्ट्रोकने पीडित होता आणि याला सामोरे जाण्यासाठी तो काही खास आहार घेत होता. दोन महिन्यांनंतर, त्याच्या जिभेवर मृत त्वचा आणि बॅक्टेरियाचा जाड थर जमा झाला असं सांगण्यात येत आहे.

JAMA Dermatology वर प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, जिभेवर केसांसारखी वाढ होण्याची समस्या वैद्यकीयदृष्ट्या लिंगुआ विलासा नाइग्रा (lingua villosa nigra) म्हणून ओळखली जाते. स्ट्रोक आल्यामुळे त्याला डाव्या बाजूने अर्धांगवायू (paralyse) झाला होता आणि त्याला अन्न चघळण्यास त्रास होत होता. चला जाणून घेऊया हा कोणता आजार आहे ज्यामुळे जिभेवर ‘केस’ वाढतात आणि त्याचा धोका जास्त कोणाला आहे. (फोटो साभार: istock by getty images)

हेही वाचा :  Bappi Lahiri Death : घोरण्याशी संबंधित ‘या’ विचित्र आजारामुळे झाला बप्पी लहरींचा मृत्यू, या लोकांना असतो याचा सर्वाधिक धोका!

जीभेवर उगवू लागले काळे केस

रिपोर्ट्सनुसार, केरळमधील एका व्यक्तीला स्ट्रोकची समस्या होती. त्याला शुद्ध अन्न आणि द्रव पदार्थ दिले जात होते. सोबतच तोंडावाटे अँटीप्लेटलेट आणि अँटीहाइपरटेन्सिव्ह दिले जात होते. काही दिवसांनी त्याच्या जीभेवर काळे-पिवळे डाग दिसू लागले ज्याला वैद्यकीय भाषेत लिंगुआ विलास नाइग्रा किंवा black hairy tongue असेही म्हणतात.

(वाचा :- World Kidney Day 2022 : ‘हे’ 5 पदार्थ खाल्ल्यास किडनी आयुष्यभर राहिल हेल्दी आणि पिवळ्या रंगाच्या व दुर्गंध येणा-या लघवीपासून मिळेल मुक्ती!)

शेवटी असा मिळाला आराम

अहवालानुसार स्ट्रोकची समस्या झालेल्या व्यक्तीला दोन महिन्यांनंतर रुग्णालयात नेण्यात आले जेव्हा त्याला अन्न चघळण्यास आणि गिळण्यास त्रास होत होता. खरे तर अन्न त्याच्या जिभेमध्येच अडकायचे. त्यामुळे त्याच्या जिभेवर काळे-पिवळे डाग पडले होते. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याने वीस दिवस कसून साफसफाई करून डाग साफ करण्यात आले ज्यामुळे त्याला थोडा आराम मिळाला.

(वाचा :- Joint pain remedies : जुन्यातील जुनी सांधेदुखी, गुडघेदुखी व हाडांच्या वेदना होतील झटक्यात दूर, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले 5 रामबाण घरगुती उपाय!)

13 टक्के लोकांना याचा धोका आहे

13-

अमेरिकन ऍकॅडमी ऑफ ओरल मेडिसिनच्या मते, सुमारे 13 टक्के लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी ‘काळ्या केसांची जीभ’ किंवा लिंगुआ विलासा नाइग्राचा अनुभव येतो.

हेही वाचा :  'दहा हजारच्या 2 माळा लावा, असा जल्लोष करा की उद्धव साहेबांच्या कानठळ्या बसल्या पाहिजेत'

(वाचा :- Covid 4th wave : चौथ्या लाटेआधी करोनाने बदलले आपले रंगरूप, जनावरांमार्फत धुमाकूळ घालण्याची शक्यता, WHO ने सांगितले बचावाचे 4 उपाय!)

कोणाला आहे लिंगुआ विलासा नाइग्राचा सर्वाधिक धोका?

असे मानले जाते की ही समस्या ब-याचदा तोंडाच्या अस्वच्छतेमुळे उद्भवते परंतु हे त्या लोकांमध्ये दिसून आले आहे जे बहुतांश वेळा मऊ पदार्थ खातात. जेव्हा तुम्ही कडक पदार्थ खातात तेव्हा ते जिभेतून मृत पेशी काढून टाकतात. तथापि, मऊ पदार्थ खाणे धोकादायक असू शकते. तंबाखूचा वापर, माउथवॉश आणि काही अँटीबायोटिक्सचा देखील याच्याशी संबंध असू शकतो.

(वाचा :- Storing eggs : बाजारातून आणलेली अंडी फ्रीजमध्ये ठेवणं सुरक्षित आहे की असुरक्षित? जाणून घ्या किती तासांत होऊ शकतात खराब?)

नरम आणि द्रव पदार्थ वाढवतात धोका

असे मानले जाते की ही स्थिती जीभेवर सुमारे 1 मिमी (0.04 इंच) पर्यंत वाढू शकते आणि जीभ नियमितपणे स्वच्छ न केल्यास ती 18 मिमी (0.7 इंच) लांबीपर्यंत पोहोचू शकते. याचा अर्थ असा आहे की मऊ अन्न आणि द्रव पदार्थ जीभेच्या पृष्ठभागाची पुरेशी स्वच्छता करत नाहीत ज्यामुळे ही स्थिती आणखी वाईट होते.

हेही वाचा :  आहे त्या वयापेक्षा 10 ते 15 वर्षांनी दिसाल लहान व तरूण, डाएटिशियनने सांगितलेल्या 'या' टिप्स करा ताबडतोब फॉलो..!

(वाचा :- Shane Warne death : शेन वॉर्न वेटलॉससाठी वापरत होते ‘ही’ ट्रिक, काय आहे ही ट्रिक आणि कधी बनते शरीरासाठी घातक?)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : देशात सध्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीच्याच अवतीभोवती …

पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासा

महिला आजकाल कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. मग ते राजकारण असो, खेळ असो किंवा डॉक्टर …