दिवसातून केवळ दोन वेळा जेवण आणि अर्धा लीटर दूध, बाबा रामदेव यांचा पूर्ण डाएट प्लॅन

Baba Ramdev Diet Plan For Weight Loss: बाबा रामदेव हे नाव कोणाला माहीत नाही? योगा आणि नैसर्गिक वनस्पतींपासून अनेक गोष्टी निर्माण करून फिटनेस आणि ब्युटी या दोन्ही क्षेत्रात बाबा रामदेव यांचं नाव मोठं आहे. सौंदर्य प्रसाधने बनविण्याच्या व्यवसायातही बाबा रामदेव यांची कंपनी पुढे आहे. महत्त्वाचं म्हणजे केमिकलशिवाय उत्पादने बनविण्यावर बाबा रामदेव यांचा जोर आहे. बाबा रामदेव यांचे ५६ च्या आसपास वय आहे. मात्र अजूनही अंगात एखाद्या तरूणाला लाजवेल असा काटकपणा आहे. योगा हे फिटनेसचं रहस्य तर सर्वांनाच माहीत आहे. मात्र ज्यांना वजन कमी करायचं आहे, अशा व्यक्तींसाठी बाबा रामदेव यांचा डाएट प्लॅनही उपयुक्त ठरू शकतो. जाणून घेऊया योग गुरू बाबा रामेदव यांचा डाएट प्लॅन. (फोटो क्रेडिटः योगेन शाह, Freepik.com)

डाएट आणि खाण्यात कधीच दुर्लक्ष नाही

आजकाल ऑफिसच्या कामाच्या नावाखाली अनेकदा जेवणाकडे दुर्लक्ष करण्यात येतं. तसंच ताणतणावामुळे भूक मारली जाते. पण बाबा रामदेव नैसर्गिकरित्या आपल्या तब्बेतीची काळजी घेतात आणि आपल्या जेवणाकडे कधीही दुर्लक्ष करत नाहीत. आपला दैनंदिन कार्यक्रम ज्याप्रमाणे आखून घेतला आहे, त्यामध्ये कोणताही बदल न करता आरोग्य जपण्याकडे बाबा रामदेव यांचा अधिक कल दिसून येतो. कोणत्याही कार्यक्रमातही बाबा रामदेव यांचा फिटनेस पाहून सर्वच थक्क होतात.

हेही वाचा :  Weight Loss: अळीव ठरतील फायदेशीर, लोण्यासारखी वितळेल पोटावरील चरबी

पहाटे ३.३० ला सुरू होतो दिवस

सूर्यादयापूर्वी उठावे आणि सूर्यास्तानंतर झोपावे असे पूर्वी सांगण्यात येत असे. त्याचा पुरेपूर योग्य पद्धतीने वापर करताना बाबा रामदेव दिसून येतात. ब्रम्हमुहूर्त अर्थात पहाटे ३.३० च्या सुमारास बाबा रामदेव झोप पूर्ण करून उठतात आणि त्यानंतर सर्वात आधी गरम पाण्यासह आवळा आणि कोरफडचा रस एकत्र करून पितात. यामुळे वजन वाढत नाही आणि वजन नियंत्रणात राहाते. ज्या व्यक्तींना वजन कमी करायचं असेल त्यांच्यासाठी हा ज्युस अत्यंत फायदेशीर ठरतो. तसंच वजन कमी करण्यासाठी जिभेवर नियंत्रण ठेवणेही आवश्यक आहे.

(वाचा – सारा अली खानची आश्चर्यचकित करणारी वेट लॉस जर्नी, ४० किलो वजन घटवत केले सर्वांना अवाक्)

वजन कमी करण्यासाठी दुधीचा ज्युस पिण्याचा सल्ला

ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे आहे. त्या व्यक्तींना दुधीचा ताजा रस काढून तो पिण्याचा सल्ला बाबा रामदेव देतात. दुधीमध्ये विटामिन ए, सी, लोह आणि अति फायबर असल्याने वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. वाढते वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात दुधीची भाजी, दुधीचा रस अथवा दुधीच्या सुपाचा समावेश करून घ्यावा असा सल्ला बाबांनी दिला आहे. याशिवाय सकाळी उपाशी पोटी नारिंगी आणि गाजराने ज्युस प्यायल्यानेदेखील फायदा होतो असंही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :  जिमला न जाता अगदी घरबसल्या खा हे ५ पदार्थ, वजनात आपोआप दिसेल फरक

(वाचा – Weight Loss: सोनाक्षी सिन्हाने असे केले होते ३० किलो वजन कमी, वेट लॉसची सोपी पद्धत)

आंघोळीनंतर अर्धा लीटर गाईचे दूध

सकाळी आंघोळीआधी बाबा रामदेव साधारण अर्धा लीटर पाणी पितात आणि योग आटपल्यानंतर गाईचे ताजे दूध साधारण अर्धा लीटर रामदेव बाबा पितात. दुधामुळे शरीराला आवश्यक कॅल्शियम मिळते आणि शरीर अधिक तंदुरूस्त राहण्यास मदत मिळते असे रामदेव बाबांचे म्हणणे आहे. तर सकाळच्या वेळेत बाबा कधीच नाश्ता करत नाहीत.

(वाचा – रोज १५ मिनिट्स मारा दोरीच्या उड्या आणि करा झटपट वजन कमी, दोरी उड्या मारण्याचे फायदे)

दिवसातून केवळ दोन वेळा जेवण

दोन वेळा जेवल्याने पोट भरतं तर तिसऱ्यांदा खाण्याची गरज काय ? असे एका मुलाखतीत बाबा रामदेव यांनी सांगितले होते.

  • सकाळी ११ च्या आसपास बाबा रामदेव दुपारचे जेवण जेवतात तर रात्रीचे जेवण जेवण्याची वेळ ही ७ ते ८ दरम्यान आहे. यामुळे अन्न पचायला मदत होते
  • दुपारच्या जेवणात १ हंगामी भाजी, २ पोळ्या आणि १ वाटी भात हे जेवण असते तर रात्रीच्या जेवणात केवळ पोळी आणि २ वाटी भाजी, दही इतकेच जेवण त्यांना लागते
  • दोन्ही वेळी पौष्टिक खाण्यावरच बाबा रामदेव यांचा भर आहे. कोणत्याही क्रिमपासून तयार करण्यात आलेला पदार्थ जेवणात समाविष्ट करून घेत नाही
  • उकडलेल्या भाज्यांवर त्यांचा भर असून त्यामध्ये दुधी, तूर, पडवळ, तोंडली, हिरव्या पालेभाजी यांचा समावेश करतात
हेही वाचा :  Amruta Fadanvis Video : उपमुख्यमंत्र्यांचीच पत्नी करते सरकारी प्रॉपर्टीचा गैरवापर, अमृता फडणवीस ट्रोल

डाएटसह योगा महत्त्वाचा

नैसर्गिक आणि पौष्टिक आहार घेण्यासह बाबा रामदेव यांचा योगावर अधिक भर असतो. रोज योग शिबिरात जाण्यापूर्वी अर्धा तास वॉर्म अप करणे आणि योग शिबीरापर्यंत १ किलोमीटर धावणे हा बाबा रामदेव यांचा दिनक्रम आहे. त्यामुळे डाएटसह योग आणि व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे असं बाबा रामदेव नेहमीच सांगत असतात.

तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर तुम्ही असा दिनक्रम आणि डाएट फॉलो करावे. जंक फूड, फास्ट फूड टाळावे आणि पौष्टिक आहाराचा समावेश करावा.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …