बॉडी बिल्डिंगमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं,पण आता घर चालवण्यासाठी साफ कराव लागत आहे टॉयलेट

Gold Medalist Body Builder Cleaning Toilet : सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये पटियालाचा सुवर्णपदक विजेता बॉडीबिल्डर कुकू राम (Bodybuilder Kuku ram) टॉयलेट साफ करताना दिसत आहे. भारतासाठी सुवर्ण पदक जिंकूनही त्याला हे काम करायला लागत असल्याने या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स पडत असून व्हिडीओ व्हायरल होत आहे. कुकूने थायलंडमध्ये झालेल्या एमआर आणि एमआयएस वर्ल्ड बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये (MIS World Bodybuilding Championship) सुवर्णपदक पटकावले होते, मात्र या यशानंतरही त्याच्या आयुष्यात काहीही बदल झाले नाही आणि त्याला आता टॉयलेट साफ करण्याची वेळ आली आहे.

परदेशात देशाचा झेंडा फडकवल्यानंतरही तिच परिस्थिती

कुकू राम व्यतिरिक्त मुकेश शर्मानेही (Bodybuilder Mukesh Sharma) या प्रसिद्ध स्पर्धेत देशासाठी रौप्य पदक जिंकले. या कामगिरीनंतरही त्यांना हे काम करावे लागत आहे. कुकू (53 वर्षे) आणि मुकेश (44 वर्षे) यांना दरमहा 9 हजार रुपये सफाई कामासाठी दिले जातात. भारताच्या या दोन शरीरसौष्ठवपटूंनी थायलंडमध्ये 18 देशांतील प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सुवर्ण आणि रौप्य पदकांवर कब्जा केला होता. या स्पर्धेत कुकू राम 50+ या वर्गात सहभागी झाला होता. राम सध्या पटियाला महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करतो. तो अनेक वर्षांपासून बॉडीबिल्डिंग करत आहे. कुकू रामच्या पत्नीने सांगितले की, ‘तो आता साफसफाईचे काम करतो आणि मी घरी कपडे शिवण्याचे काम करते. कुकू 1998 पासून शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये भाग घेत आहे परंतु कमी पैशांमुळे त्याने भाग घेणे थांबवले होते, तरीही 2014 मध्ये तो पुन्हा या खेळांमध्ये परतला आणि स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागला.

हेही वाचा :  Snake video: साप आणि मुंगूस भिडले आणि पुढे जे घडलं ते पाहून येईल अंगावर काटा

‘देशासाठी पदक जिंकूनही काहीही बदललं नाही’

live reels News Reels

दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत (Viral Video on Social Media) असलेल्या व्हिडिओमध्ये कुकू राम म्हणत आहेत की पदक जिंकूनही काहीही बदलले नाही. कुकू सध्या आपल्या आणि कुटुंबाच्या पोषणासाठी शौचालये साफ करत आहे. तर मुकेश कुमार झाडू काढण्याचे काम करत आहे.

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …