Kitchen Hacks: 2 मिनिटात काळा पडलेला तवा कसा चमकवायचा नव्यासारखा…या किचन टिप्स येतील कामी

Cleaning hacks : स्वयंपाक घरात नेहमी वापर होणाऱ्या भांड्यांमध्ये तवा आलाच. चपाती पराठा बनवण्यासाठी तवा (chapati making) हवाच…रोज रोज वापरल्याने तवा काळा पडू लागतो, त्यानंतर तो साफ करणं खूप कठीण होऊन बसत. त्यामुळे आज खास टिप्स मध्ये अश्या प्रकारे काळा पडलेला तवा कश्याप्रकारे स्वच्छ कराल तेही अवघ्या काहीच मिनिटात! आणि तो चमकेल नव्या सारखा…आणि मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला काहीच पैसे खर्च  करण्याची गरज नाही. (kitchen tips how to clean dirty black pan like new one)  

किचन टिप्स (kitchen tips)

बऱ्याचदा अश्या काही किचन टिप्स असतात ज्या आपल्याला माहितीसुद्धा नसतात पण त्या अगदी सोप्या आणि कामाच्या असतात. ज्या वापरून आपण स्मार्ट गृहिणी बनू शकता.

घरातच आहेत उपाय

काळा पडलेला तवा स्वच्छ करण्यासाठी तुमच्या किचन मध्येच (kitchen hacks) काही अश्या गोष्टी आहेत ज्याचा वापर तुम्ही करू शकता, आपल्या दररोजच्या वापरातल्या काही गोष्टी वापरून जाणून घेऊया कश्या प्रकारे तवा चमकवू  शकतो.
व्हिनेगर (vinegar)

हेही वाचा :  Cooking tips: घरी शिजलेला भात नेहमी चिकट होतो का ? 'या' टिप्स वापरून बनवा सुटसुटीत - मोकळा भात

चांदीप्रमाणे तवा चमकवायचा आहे तर व्हिनेगर तुम्हाला खूप मदत करेल, सर्वात आधी तवा गॅसवर उलट गॅस चालू करा तवा चांगला  त्याच्या वर व्हिनेगर घाला आणि स्क्रबर च्या मदतीने घासून घ्या अवघ्या काही सेकंदातच तुम्हाला फरक जाणवू लागेल.  (cleaning hacks)

बेकिंग सोडा (baking soda) 

बेकिंग सोडच्या मदतीने  आपण तव्याला नव्यासारखा चमकवू शकता. यासाठी तव्यावर बेकिंग सोडा घाला त्यावर लिंबू पिळा आणि गरम पाण्याच्या मदतीने घासणीने व्यवस्थित घासून घ्या. असं केल्याने तव्यावरिल काळपटपणा दूर व्हायला मदत होईल.

याशिवाय स्वयंपाक करताना, काही गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तवा काळा पडणार  नाही

चपाती बनवण्याचा तवा हा फक्त चपात्यांसाठीच वापरावा त्यात भाजी किंवा इतर पदार्थ गरम करू नयेत.

तव्याचा वापर करून झाल्यावर तो नेहमी पुसून ठेवावा, नुसता धुवून ओला तसाच ठेवला तर  त्यावर गंज चढतो, आणि हळूहळू खराब होतो. आणि खराब झालेल्या तव्यावर चपात्या चिकटतात आणि खराब होतात.

त्यामुळे वरील काही टिप्स वापरून तवा स्वच्छ करा आणि तुमच्याकडेही काही हटके टिप्स असतील तर त्या आम्हाला नक्की कळवा. 

हेही वाचा :  “देशात 400 वंदे भारत रेल्वे सुरु करणार,” रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …