Gold Silver Price : होळीच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याची उत्तम संधी, जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today : भारतीय लोकांना सोने चांदीचे (Gold-Silver) प्रचंड आकर्षण आहे. सण, उत्सव, समारंभ प्रसंगी सोने चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. तसेच उत्तम गुंतवणूक म्हणूनही सोने-चांदीचा विचार केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीच्या (Gold Silver Price) दर रोजच्या रोज बदलत असतात. सराफ बाजारातही सोन्या चांदीच्या दरात दररोज चढ-उतार होत असतात. 

होळीच्या (Holi 2023) पार्श्वभूमीवर जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर आजची ही सुवर्णसंधी वाया घालवू नका. दरम्यान इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएनच्या संकेतस्थळानुसार, आज सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीच कालच्या तुलनेत आज 22 कॅरेट सोन्याचे (Gold Price) दर 51,950 रुपये प्रति तोळा आहे. तर 24 कॅरेट सोन्याचे दर आज अंदाजे 56550 रूपये प्रति तोळाने विकले जात आहे. तर दुसरीकडे चांदीचे दर स्थिर असून आज 66900 रुपये प्रतिक किलोने विकले जात आहे. 

वाचा : गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर  

हेही वाचा :  'विष्कन्या', 'नालायक मुलगा' या वक्तव्यामुळे भाजप, काँग्रेस आमदारांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोगाची नोटीस

सोने-चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता

आज सोन्याचे भाव स्थिर असल्याचे रांचीतील सराफा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र ज्या पद्धतीने सराफाला मागणी वाढत चालली आहे त्यानुसार येत्या काळात सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 60 हजारांच्या जवळपास जाण्याची शक्यता आहे.

मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. 

अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. 

22 आणि 24 कॅरेट सोन्यामध्ये फरक

24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असले तरी ते अतिशय लवचिक आणि कमकुवत आहे. या कारणास्तव त्यापासून दागिने बनवता येत नाहीत.

हेही वाचा :  Gold-Silver Rate Today : सोने चांदीच्या भावात तेजी; जाणून घ्या आजचे दर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …