Gold Silver Price Today: होळीच्यापूर्वी सोने चांदीच्या किंमतीमध्ये बदल, वाचा आजचे दर

Today Gold Silver Price : अर्थसंकल्पानंतर सोन्याचा (gold Price) भाव काय आहे? हे विचारले तरी अनेकांना गुदगुदल्या होतात. तर काहींना  कपाळावर आठ्या येतात. काय करणार घौडदौडच सध्या तशीच सुरू आहे. मात्र होळीपूर्वी सोन्याचे दर स्थिर आहे तर चांदीच्या दरात तेजी दिसून आली आहे. 

आज 10 ग्रॅम 22 कॅरेटसाठी सोन्याची दर 51,750 रूपये आहे. तर 24 कॅरेट साठी 56,750 रुपये आहे. तर दुसरीकडे चांदीचे 10 ग्रॅमचा दर 669 रुपये आहे . तसेच मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51,750 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,450 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 51,750 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,450 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,750 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,450 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 51,780 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 56,480 रुपये आहे. 

वाचा: पेट्रोल डिझेलच्या दरात मोठे बदल, झटपट पाहा तुमच्या शहरांतील 1 लिटर पेट्रोलचे दर

हेही वाचा :  पतीने पत्नीच्या हत्येसाठी दिली 6 लाखांची सुपारी, पण शुटर्सने पतीलाच गोळ्या घातल्या; कारण ऐकून पोलीसही चक्रावले

अशी जाणून घ्या सोन्याची शुद्धता..

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते. तर काहीजण 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असेल.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक ?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24K सोने विलासी असले तरी ते दागिने बनवण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

मिस्ड कॉलद्वारे किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर SMS द्वारे तुम्हाला आजचे दर समजतील. 

हेही वाचा :  1 डिसेंबरपासून नवे नियम, तुमच्या जीवनावर होणार थेट परिणाम!

हॉलमार्ककडे लक्ष द्या

सोने खरेदी करताना लोकांनी त्याच्या गुणवत्तेची काळजी घेतली पाहिजे. ग्राहकांनी हॉलमार्कचे चिन्ह पाहूनच खरेदी करावी. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमांद्वारे नियंत्रित केली जाते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …