Weight Loss: अळीव ठरतील फायदेशीर, लोण्यासारखी वितळेल पोटावरील चरबी

वजन कमी करण्यासाठी अनेक कष्ट घ्यावे लागतात. कधी कधी तर कितीही व्यायाम केला तरीही वजन हलण्याचे नावही घेत नाही. नुकतेच वजन कमी करण्याच्या पदार्थांमध्ये अळीवाचाही समावेश झाला आहे. तुम्ही सध्या Google Search केल्यानंतर सर्वाधिक सर्च होणारा शब्द सध्या अळीव अथवा हलीम दिसून येईल.

अळीव अर्थात Lepidium sativum असा इंग्रजी शब्द असणारा हा पदार्थ अरब देशातील असला तरीही आता भारतातही अधिक प्रमाणात वापरला जातो. औषधीय गुण असणारा हा पदार्थ आयुर्वेदात अधिक प्रमाणात वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यातील पोषक तत्व आणि औषधीय गुणांमुळे वजन घटविण्यासाठीही याचा उपयोग करता येतो असे आयुर्वेदिक डॉ. माधव भागवत यांनी सांगितले. त्यांनी याचा फायदाही सांगितला आहे. जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Freepik.com)

अळीवातील पोषक तत्वे

अळीवातील पोषक तत्वे

इंटरनॅशनल जर्नल ऑफ फार्मास्युटिकल रिसर्च अँड अलाईड सायन्सेसमध्ये अळीवाच्या फायद्यांवर संशोधनकर्ता हाना अल सईद, एस जिदान इत्यादींनी केलेल्या शोधाचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले असून यामध्ये अळीवात अनेक औषधीय गुणधर्म असून फायटोकेमिकल्स पदार्थ असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये लेपिडीन घटक असून मूत्रवर्धक स्वरूपात काम करतात असेही सांगण्यात आले आहे.
याशिवाय अळीव हे ग्लुकोसिनोलेट्स, फ्लेवोनाईड, यौगिक आणि सेमीलेपिडिनोसाईड अँटीकॅरनोजेनिक, अँटिऑक्सिडंट् आणि अँटीस्थमॅटिक स्वरूपातही कार्य करते. अळीवात जास्त प्रमाणात प्रोटीन, खनिज, फायबर आणि फायटोकेमिकल्स असतात असेही सिद्ध झाले आहे.

हेही वाचा :  Shahid Jawan : अमर रहे, अमर रहे... सांगलीच्या शहीद सुपुत्राला अखेरचा निरोप; पंचक्रोशीत शोककळा

अळीव कसे करते वजन कमी

अळीव कसे करते वजन कमी

आयुर्वेदिक डॉ. माधव भागवत यांनी सांगितले की, अळीव हे शरीरातील अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असून अळीव खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही. सहसा अळीव पाण्यात भिजवून नंतर दुधात शिजवून खीर स्वरूपात खाता येते. केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर निरोगी आहार म्हणूनही याचा उपयोग होतो.

(वाचा – रमजानला खाल्ल्या जाणाऱ्या खजुराचे आहेत जादुई फायदे, रोज सकाळी खा भिजवलेले ४ खजूर )

कसे करावे सेवन?

कसे करावे सेवन?

डॉ. भागवत यांनी सांगितल्याप्रमाणे अळीव हे सुपरफूडपैकी एक आहे. यामध्ये प्रोटीन स्रोत असून जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल आणि तुमच्या मांसपेशी सुधारायच्या असतील तर अधिक पोषणासाठी नियमित स्वरूपात १ चमचा अळीव तुम्ही समाविष्ट करून घ्या. रोज सकाळी तुम्ही उपाशीपोटी अळीव पाण्यातून खाऊ शकता. अळीवाचे लाडू करून रोज १ लाडू खाऊ शकता.

(वाचा – महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत हृदयविकार, जाणून घ्या कारणे आणि उपाय )

अळीवचे प्रमाण किती असावे?

अळीवचे प्रमाण किती असावे?

तुम्ही जर नियमित स्वरूपात अळीव खाणार असाल तर १ टी स्पून इतका त्याचा वापर करावा. आठवड्यातून ३-४ वेळा तुम्ही याचे सेवन करू शकता. याचे प्रमाण अधिक करू नये.

हेही वाचा :  Weight Loss: अतिरिक्त चरबी काढण्यासाठी आणि झटपट वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीमध्ये मिक्स करा या गोष्टी

(वाचा – Weight Loss: ४८ व्या वर्षी प्रीति झिंटाचे कमालीचे ट्रान्सफॉर्मेशन, वजन कमी करण्यासाठी केली इतकी मेहनत)

कोणी अळीव खाऊ नये

कोणी अळीव खाऊ नये

अळीवाचे सेवन करणे ब्लड प्रेशर कमी करू शकते. तुम्हाला ब्लडप्रेशरचा त्रास असेल अथवा हायपोथायरायडिजम असेल तर याचे सेवन करू नये. तसंच पोटॅशियमसंबंधित आजार असल्यासही अळीवाचे सेवन करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अळीव खाऊ नये.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका

Shinde vs Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू …

वसईतील बिबट्या पकडला, मात्र आता भाईंदरमध्ये मोकाट फिरतोय बिबट्या, CCTV Video समोर

Trending News Today: वसई किल्ला परिसरात गेल्या 25 दिवसांपासून धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला मंगळवारी जेरबंद करण्यात …