मकर संक्रांतीला का घालतात काळे कपडे, आरोग्यासाठी ठरतात फायदेशीर

आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आणि परंपरा आजही जपल्या जातात आणि अगदी उत्साहात त्या परंपरा जपत सण आणि उत्सव साजरे केले जातात. आपल्याकडे सणासुदीला कोणते पदार्थ खायचे इथपासून ते कोणते कपडे घालायचे इथपर्यंत सर्व काही पूर्वपरंपरागत चालत आले आहे. यामागेही वैज्ञानिक कारणे आहेत आणि याचा आरोग्याला उपयोग होतो म्हणूनच पूर्वजांनी या रिती परंपरा केल्या आहेत. यातील एक परंपरा म्हणजे मकर संक्रांतीला काळे कपडे घालणे. हिंदू धर्मात प्रत्येक ऋतूनुसार धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वानुसार परंपरा करण्यात आल्या आहेत आणि त्याचे नक्की कारण काय आहे जाणून घ्या.

काळे कपडे का घालावेत?

मकर संक्रांत म्हणजे या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याच्या या राशीपरिवर्तनाला मकर संक्रांत असे संबोधित करण्यात येते. आपल्याकडे या दिवसाला उत्तरायण असेही म्हटले जाते. हिवाळ्यातील सर्वात जास्त थंड असा हा दिवस असतो आणि रात्रही मोठी असते. या मोठ्या रात्रीच्या काळोखाला चांगला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात असे सांगितले जाते.

हेही वाचा :  मसाजच्या नावाखाली लहान मुलींचं लैंगिक शोषण; सेक्स स्कँडलमध्ये माजी राष्ट्राध्यक्षांचंही नाव आलं समोर

आरोग्याच्या दृष्टीने वैज्ञानिक कारण

मकर संक्रांतीला वर्षानुवर्षे काळे कपडे घातले जातात मात्र पुढच्या पिढीला याचे कारण माहीत असणेही आवश्यक आहे. याचे आरोग्याच्यादृष्टीने महत्त्वाचे कारण आहे. हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस मानला जातो. म्हणूनच काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. इतर रंगांच्या तुलनेमध्ये काळा रंग हा उष्णता अधिक शोषून घेतो आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी याची मदत होते. त्यामुळेच या रंगाला मकर संक्रांतीच्या दिवशी प्राधान्य देण्यात आले आहे. शरीर उबदार ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो आणि लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत काळ्या रंगाचा कोणालाही उपयोग करून घेता येऊ शकतो.

(वाचा – बारीक कंबर हवी असेल तर वापरा श्रद्धा कपूरच्या या फिटनेस ट्रिक्स)

सर्व उर्जा निर्माण करणाऱ्या गोष्टींचा वापर

मकर संक्रांतीसाठी शरीरात ऊर्जा आणि उष्णता निर्माण करणाऱ्या सर्व गोष्टींचा वापर केला जातो. सुगडाची पूजा करताना त्यात ऊसाचे तुकडे टाकले जातात. त्यासह तिळगूळ, गाजर, बोरं, गव्हाच्या ओंब्याही यामध्ये समाविष्ट असतात. बऱ्याचदा सुगड हादेखील काळ्या रंगाचाच असतो. एकंदरीतच थंडीच्या दिवसात ऊब मिळावी आणि तुमचे थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठीच हा सण महत्त्वाचा ठरतो.

हेही वाचा :  Makar Sankranti 2023: संक्रांतीसाठी करा भाग्यश्रीसारखे साडी लुक, दिसा स्टनिंग

(वाचा – Makar Sankranti 2023: तिळाचे आरोग्यदायी फायदे, का खावा तिळगूळ)

आरोग्याचा दृष्टीकोन आणि सण

सण साजरे करताना आपल्याकडे बऱ्याचदा वैज्ञानिक कारण आणि आरोग्याच्या दृष्टीनेच साजरे केले जातात. रिती परंपरा जपताना आरोग्य जपणे अधिक गरजेचे असते हे पूर्वजांनीही ओळखले होते आणि त्यानुसारच रितीरिवाज धर्मात करण्यात आले असल्याचे वारंवार सांगितले जाते. त्यामुळे आजही हे सण तितक्याच जल्लोषात साजरे होताना दिसतात. पुढच्या पिढीला याचा वारसा जपण्यासाठी काळ्या रंगाचे संक्रांतीच्या दिवशी महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे.

(फोटो क्रेडिटः @shammikabhidde, @prajakta_official and @aishwarya.narkar Instagram)

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

डोंबिवली MIDC तील आग नेमकी कुठे लागली? 6 किमीपर्यंत आवाज, जवळचे शोरुमही खाक; जाणून घ्या सर्व अपडेट

Dombivali MIDC Fire: डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीशण आग लागली आहे.  डोंबिवली पूर्वच्या सोनारपाडा येथील मेट्रो केमिकल …

गृहिणींचे बजेट बिघडणार, मेथी, कोंथिबीर महागली, एका जुडीचा दर तब्बल…

Vegetable Price Hike In Maharashtra: एकीकडे उन्हाचा कडाका तर एकीकडे अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटाचा …