Makar Sankranti 2023: तिळाचे आरोग्यदायी फायदे, का खावा तिळगूळ

मकरसंक्रांत आणि तिळाचं नातं खूपच महत्त्वाचं आहे. सफेद, काळे आणि चॉकलेटी रंगाचे तिळ हे आपल्या जेवणाच्या वापरात असतातच. तिळामध्ये अनेक औषधीय गुण आढळतात. विविध रोगांपासून दूर राहण्यासाठी तिळाचा वापर करून घेता येतो. इतकंच नाही तर तिळाच्या तेलाने त्वचा आणि केसांनाही फायदा मिळतो. तीळ खाल्ल्याने शरीरामध्ये उर्जा निर्माण होते आणि थंडीपासूनही संरक्षण होते आणि याच कारणासाठी मकरसंक्रांतीच्या सणाला तिळाचे लाडू केले जातात आणि वाटण्यात येतात. यामध्ये तांबे, मँगनीज, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, व्हिटामिन बी१, बी६, थायामिन फोलेट, नियासिन, सेलेनियम, झिंक यासारखे पौष्टिक तत्व असतात. तिळाचे आरोग्यदायी फायदे समजून घेऊया.

उच्च प्रोटीन असणारा शाकाहारी आहार

तीळ हा सर्वात चांगला शाकाहार समजण्यात येतो. कारण प्रोटीनचा सर्वात चांगला स्रोत हा मानला जातो. वास्तविक, प्रोटीन एक महत्त्वपूर्ण पोषक तत्व आहे, जे आपल्या मांसपेशी आणि हाडांसाठी योग्य ठरते. तसंच शरीराला उर्जा देण्याचेही काम करते. इतकंच नाही तर तीळ वजन नियंत्रणासाठीही फायदेशीर ठरतात. जानेवारीत असणाऱ्या थंडीत तिळाचे लाडू शरीरात उर्जा निर्माण करून थंडीपासून संरक्षण करण्याचे काम करतात. त्यामुळेच याचा वापर केला जातो आणि शरीराला यातून प्रोटीनही मिळते.

हेही वाचा :  Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला गुप्त दान का करतात? त्यामुळे कोणते लाभ होतात? हे '5' गोष्टींचे दान करा

मधुमेहापासून संरक्षण

तिळामध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे मधुमेहाशी दोन हात करण्यासाठी उपयोगी ठरतात. एनसीबीआयच्या (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फोर्मेशन) संकेतस्थळावर देण्यात आलेल्या एका शोधानुसार, तीळ मधुमेहाच्या रूग्णांसाठी हृदयासंबंधित समस्या सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्याशिवाय तीळ शरीरामध्ये इन्शुलिनचा स्तर नियंत्रित करण्यासाठीही मदत करतात. यामुळे मधुमेहाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते आणि मधुमेह आटोक्यात राहतो. तर अन्य शोधानुसार, तिळाचे सेवन टाईप २ च्या मधुमेहासाठी लाभदायक ठरते.

(वाचा – Methi For Blood Sugar: डायबिटिज नॉर्मल करेल मेथी दाणे, डॉक्टरांच्या उपायापुढे लाखोंची औषधंही होतील फेल)

उच्च अँटिऑक्सिडंट

तिळात आढळणारे अँटिऑक्सिडंट हे अत्यंत लाभदायक आहे. वास्तविक फ्री रॅडिकल्स, शरीरातील चांगल्या सेल्सना नुकसान पोहचवतात. अशावेळी तिळातील अँटिऑक्सिडंट्स हे फ्री रॅडिकल्सवर मात करून शरीरातील आजार बरे करण्यासाठी मदत करतात. नुकत्याच एका शोधातून सिद्ध झाले आहे की, तिळातील अँटिऑक्सिडंट्स हे हृदयाची सुरक्षा आणि ट्युमरपासून वाचण्यासाठी फायदेशीर ठरतात.

(वाचा – सर्दी झाली आहे की Omicron BF.7, जाणून घ्या २ मिनिट्समध्ये)

चांगल्या हृदय स्वास्थ्यासाठी

जेव्हा शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते, तेव्हा हृदयसंबंधित रोग होण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे हृदयाची काळजी घेण्यासाठी तिळाचे सेवन लाभदायक ठरू शकते. तिळाच्या दाण्यात सेसमोल नावाचे घटक असते ज्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी- इन्फ्लेमेटरी प्रभाव अधिक असतो. तसंच तिळामध्ये अँटी-एथेरोजेनिक गुणही आढळतात. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत मिळते.

हेही वाचा :  Bhogichi Bhaji: एकदम चटपटीत आणि वेगळ्या चवीची भोगीची भाजी; वाचा रेसिपी, महत्व

(वाचा – कोलेस्ट्रॉल होईल झटपट कमी, तुपाबरोबर खा चपाती)

कॅन्सरपासून बचाव

तिळामध्ये अनेक औषधीय गुण आहेत. तिळातील आढळणारे अँटी-कॅन्सर आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुण हे कॅन्सरच्या धोक्यापासून वाचण्यासाठी फायदेशीर ठरतात. एनसीबीआयच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या एका शोधानुसार, तिळातील लिग्नान्सवर अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यात आला आणि या अभ्यानुसार, अँटीएजिंग, अँटीकॅन्सर, अँटीडायबिटीस, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट्स गुणांसाठी तीळ चांगलेच फायदेशीर ठरतात. लक्षात ठेवा की, तिळाचे सेवन हे कॅन्सरचा आजार होऊ नये यासाठी मदत करू शकतो. हा कॅन्सरवरील उपाय नाही. कॅन्सरपीडित रूग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावेत.

तिळाचे हे वरील आरोग्यदायी फायदे लक्षात घेऊन तुम्ही यावर्षी तिळगूळ खावा. मकरसंक्रांतीला तिळगूळ का खायचा असे प्रश्न जर मनात असतील तर या लेखातून तुम्हाला नक्कीच त्याचे उत्तर मिळाले असेल.

(फोटो क्रेडिटः Canva, Freepik.com)

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratime.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …