‘प्राजक्तराज’ अस्सल मराठमोळ्या दागिन्यांचा साज, पारंपारिकता जपण्याचा प्राजक्ता माळीचा प्रयत्न

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या लुक आणि बोलण्यासाठी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेली दिसून येते. महाराष्ट्राची हास्यजत्राचे निवेदन असो अथवा रानबाजारमधील वेगळ्या धाटणीची भूमिका असो प्राजक्ताला नेहमीच चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. दरम्यान प्राजक्ताने आता महाराष्ट्रीयन दागिन्यांची परंपरा जपत वेगवेगळ्या स्टाईलचे आणि पारंपरिक लुक असणारे दागिने खास आपल्या चाहत्यांसाठी आणले आहे. ‘प्राजक्तराज’मध्ये परंपरागत दागिन्यांच्या कलाकुसरीला महत्त्व देण्यात आले आहे. इतकंच नाही त्याच्या नावातही पारंपरिकता जपण्यात आली आहे. यावर टाकूया एक कटाक्ष.

सोनसळा दागिने

सोनसळा या दागिन्यांमध्ये सोनेरी इमिटेशन दागिन्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामधील वैशिष्ट्य म्हणजे अनेक ठिकाणी आता या दागिन्यांची केवळ नावंच ऐकायला मिळतात. तर काही जणांना याची नावंही माहीत नाहीत. साज, छोटा पुतळी हार, बेलपाटनिक, जोंधळे मणी गुंड, एकदाणी, बंद घशाची वज्रटिक, गहू तोडे, पैलू पाटली, चटईवीण बाजूबंद अशा दागिन्यांची मंदियाळीच आहे. हे दागिने आताच्या पिढीला कदाचित माहीतही नसावेत. यामधील वैविध्यता आणि वेगळेपणा डिझाईन्समध्ये दिसून येत आहे.

म्हाळसा दागिने

यामध्ये सिल्व्हर आणि ऑक्सिडाईडज्ड दागिन्यांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या सिल्व्हर आणि ऑक्सिडाईडज्ड दागिन्यांची प्रचंड मागणी आहे. मात्र यामध्येही वेगवेगळे डिझाईन्स करण्यात आले आहेत. गोलमणी, एकदाणी माळ, सरी आणि कुडी, नक्षीमणी कुडी, बेलपान टिक, वज्रटीक ठुशी, मासोळी, जोडवी, गजरी पैंजण, शिंदेशाही जोडे, गुलाबकाटा, मोरकाटा, तोळबंद, चांदीची म्हाळसा नथ, चापेची बुगडी, साज घाट कानातले, कुडी अशा डिझाईन्सचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. ही महाराष्ट्रीयन नावे आणि डिझाईन्स आता पुन्हा एकदा मराठमोळ्या फॅशनमध्ये तुम्ही वापरू शकता.

हेही वाचा :  प्रजक्ता माळीची खास पोस्ट

(वाचा – Makar Sankranti 2023: संक्रांतीसाठी करा भाग्यश्रीसारखे साडी लुक, दिसा स्टनिंग)

तुळजा कलेक्शन

हेरिटेज डिझाईन्सचे युनिक आणि आयकॉनिक कलेक्शन यामध्ये करण्यात आले आहे. तुमच्या आवडीचे हँडीक्राफ्ट दागिन्यांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. रॉयल महाराष्ट्रीयन दागिन्यांचे डिझाईन्स यामध्ये मराळमोळे दागिने आवडणाऱ्या व्यक्तींना जपता येतील. तुळजा नथ, वज्रटिक कानातले असे डिझाईन्स दिसून येत आहेत. तुळजा कलेक्शनमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डिझाईन बनवून घेऊ शकता असंही याचे वर्णन करताना सांगण्यात आले आहे.

(वाचा – स्कर्टची फॅशन करतोय हा डान्सर आणि होतोय बॉलीवूडमध्येही प्रसिद्ध, #menskirt होतोय ट्रेंडिंग)

प्राजक्ताचा दागिन्यांवर जीव

प्राजक्ताला दागिने आणि कपडे प्रचंड आवडतात हे नेहमीच दिसून आले आहे. मात्र वेगवेगळे महाराष्ट्रीयन दागिने सध्या लुप्त पावले असून आपल्याला अनेक ठिकाणी गेल्यानंतर हे जाणवले. त्यामुळेच हे दागिने पुन्हा सर्वांना पाहायला मिळावेत आणि महाराष्ट्रीयन दागिन्यांची परंपरा जपावी यासाठीच प्राजक्ताने आपली आवड जपत हे दागिने आणले आहेत असं उद्घाटनाप्रसंगीही सांगितले आहे.

महाराष्ट्रीयन डिझाईन्सचे दागिने हे खूपच कमी ठिकाणी मिळतात आणि ही नावं एकंदरीतच लोप पावत होती. त्यामुळे ज्यांना वेगवेगळ्या दागिन्यांची आवड आहे, त्यांच्यासाठी ही नक्कीच पर्वणी आहे.

हेही वाचा :  स्पार्कलिंग बॅकलेस पिंक ड्रेसमध्ये नववधू कियाराचा ग्लॅमरस अवतार, सिद्धार्थ म्हणतोय...

(फोटो क्रेडिटः https://www.prajaktaraj.in/ संकेतस्थळ, Prajakta Mali Instagram)

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …