संक्रांतीसाठी काळ्या नेट साडीवर ट्रेंडी डिझाईन्सचे ब्लाऊज दिसतील क्लासी, हटणार नाही तुमच्यावरून नजर

मकरसंक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी नेसणे अथवा कपडे घालणे ही परंपरा आहे. थंडीच्या दिवसात काळा रंग उष्णता शोषून घेतो म्हणून ही प्रथा आजतागायत पाळली जाते. काळा रंग हा अनेक महिलांचा आवडता रंग असतो. खास दिवशी काळ्या रंगाची साडी परिधान करणे सध्याचा ट्रेंड आहे. कारण काळ्या रंगाची साडी ही अनेक महिलांना उठावदार आणि आकर्षक दिसते. यावर ट्रेंडी ब्लाऊजचा वापर करून तुम्ही त्याला अधिक शोभा आणू शकता. कोणत्याही पार्टी अथवा सणासाठी असे डिझाईनर ब्लाऊज तुमच्या ओव्हरऑल लुकमध्ये भर घालतात. त्यातही काळी नेट साडी असेल तर आम्ही सांगितलेले डिझाईन्स या मकरसंक्रांतीसाठी तुम्ही नक्कीच ट्राय करा. कॉटनच्या साडीवर कोणतेही ब्लाऊज चालतात. पण नेटच्या साडीसाठी व्यवस्थित ब्लाऊज डिझाईन्स निवडावे लागते. असेच काही फुल स्लीव्ह्ज ब्लाऊज डिझाईन्स तुमच्यासाठी.

फुल स्लीव्ह्ज ब्लाऊज डिझाईन्स

तुम्ही थोड्या स्टायलिश टाईपचे असाल आणि साडीचा ट्रेंडी लुक हवा असेल तर तुम्ही साधा नेटचा ब्लाऊज निवडावा. तुमच्या ब्लाऊजचे कापड आपल्या साडीच्या हिशेबाने तुम्ही निवडू शकता. वास्तविक नेट ब्लाऊज अनेक पद्धतीचे असतात. तुम्ही फुल स्लीव्हज ब्लाऊज शिवताना मागच्या बाजूला लटकन लाऊ शकता. अथवा डीप नेक डिझाईन केल्यास अधिक आकर्षक दिसेल.

हेही वाचा :  Makar Sankranti 2023: ढील दे दे रे! संक्रांतीला पतंग का उडवतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

MT Style Tips: नेटच्या काळ्या साडीसह तुम्ही गळ्यात काही न घालता मोठे कानातले घालावेत. यासह हिऱ्याचे अथवा मोत्याचे कानातले घातल्यास अधिक चांगले दिसतील. तसंच अशा साडी आणि ब्लाऊजसह तुम्ही मिनिमल मेकअप करावा.

डीप नेक फुल स्लीव्ह्ज ब्लाऊज डिझाईन

डीप नेक ब्लाऊजची फॅशन नवी नाही पण ही फॅशन कधीच जुनी होत नाही. ही स्टाईल ट्रेंडिंग असून नेटच्या साडीसह असा ब्लाऊज अत्यंत सुंदर दिसतो. यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स दिसून येते. डीप नेक ब्लाऊजमध्ये वेगवेगळे डिझाईन्स, लेस अथवा टिकल्या असे वेगवेगळे डिझाईन्स करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डीप नेकमध्ये गोल, व्ही नेक अथवा बोटनेकची स्टाईल तुम्ही करू शकता. याशिवाय ब्लाऊजला क्लासी लुक देण्यासाठी तुम्ही लटकनदेखील वापरू शकता.

MT Style Tips: डीप नेक ब्लाऊज तुम्ही वापरणार असाल तर त्यासह मोठे कानातले घाला. गळ्यात मोठे नेकलेस घालणं टाळा. तसंच मोठे कानातले आवडत नसतील आणि टॉप्स घालायचे असतील तर थोड्या मोठ्या आकाराचे टॉप्स घाला. यासह आंबाडा घालून गजऱ्याची स्टाईल अप्रतिम दिसेल. ट्रेंडी आणि पारंपरिक असा मेळ उत्तम दिसून येईल.

हेही वाचा :  मकर संक्रांतीला भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी का खावी, आरोग्यासाठी कसे होतात फायदे

(वाचा – नोरा फतेहीच्या सिझलिंग गाऊन लुक्सने वाढवले इंटरनेटचे तापमान, ‘हाय गर्मी’ अशी चाहत्यांची अवस्था)

डिझाईनर नेक ब्लाऊज

काळ्या साडीसह डिझाईनर नेक स्टाईल ब्लाऊजही तुम्ही घालू शकता. आजकाल असे ब्लाऊज खूपच ट्रेंडिंग आहेत. डिझाईनर ब्लाऊज आणि प्लेन नेटची साडी असे कॉम्बिनेशन तुमच्या सौंदर्यात भर घालू शकता. मकर संक्रांतीला त्याच त्याच डिजाईन्सच्या साड्या नेसण्यापेक्षा तुम्ही अशी ट्रेंडी साडी नेसा आणि त्यावर डिझाईनर नेक ब्लाऊज घालून तुमचा लुक पूर्ण करा.

MT Style Tips: असा ब्लाऊज अत्यंत स्टायलिश दिसतो आणि साधा पण तरीही आकर्षक लुक तुम्हाला मिळतो. यासह एखादा चोकर अथवा राणीहार अशा पद्धतीचे दागिने तुम्ही कॅरी करू शकता. तसंच गोल गळा अथवा व्ही – शेप डिझाईनचा गळाही तुम्ही ठेऊ शकता.

(वाचा – तरूणींनाही लाजवेल असे सौंदर्याचे ‘ऐश्वर्य’, मॉडर्न लुकमधील ऐश्वर्याचा जलवा)

रफल्ड स्लीव्ह्ज ब्लाऊज डिझाईन

तसं तर काळ्या साडीवर कोणताही ब्लाऊज हा उठावदारच दिसतो. पण आजकाल रफल स्टाईल ब्लाऊजची अधिक चलती आहे. तुम्ही नेट साडी या मकरसंक्रांतीासाठी निवडली असेल तर रफल ब्लाऊज त्यावर नक्की निवडावा. रफल्ड ब्लाऊजचे अनेक फॅब्रिक्स बाजारात मिळतात.

हेही वाचा :  ये मेरा एरिया है और मै...; तरुणाने कल्याण स्थानकात रेल्वे रुळावरच मांडला ठिय्या, अन् मग

MT Style Tips: रफल फुल स्लीव्ह्ज ब्लाऊजसह तुम्ही केस मोकळे सोडा आणि मग त्यावर मोत्याचे दागिने अथवा ऑक्सिडाईज्ड दागिन्यांचाही वापर करू शकता. याशिवाय राणी हार अथवा मोठासा चोकर अशा दागिन्यांचीही निवड करू शकता. ग्लॉसी मेकअप यासह उत्तम दिसू शकतो.

याशिवाय संक्रांतीसाठी नेट साडी निवडत असाल तर त्यावर फ्लोरल फ्रिंट, चिकनकारी प्रिंट, लखनवी प्रिंट आणि वेगवेगळ्या रंगाचे कलर कॉम्बिनेशन उत्तम दिसते. त्यामुळे मकरसंक्रांतीचा लुक वेगळा करायचा असेल तर या स्टाईल टिप्स तुम्ही नक्की वापरा.
(फोटो क्रेडिटः Instagram)

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratime.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …