कॅमेरा दिसताच रितेश-जेनेलियाची मुलं हात का जोडतात? रितेशचं उत्तर सगळ्या पालकांसाठी मोठी शिकवण

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख या दोघांचा वेड हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रितेश-जिनिलियाशी संवाद साधण्यात आला. रितेश-जिनिलिया ही जोडी एक आदर्श जोडी आहेच पण यासोबत हे दोघे आदर्श पालक आहेत. कायमच आपल्या मुलांना मातीशी जोडून ठेवण्याचा या दोघांचा प्रयत्न असतो. या गोष्टी तुम्हाला प्रेरणा देतील.

या सिनेमाच्या निमित्ताने रितेशला काही प्रश्न विचारण्यात आले. ज्याची रितेशने दिलेली उत्तर ही प्रत्येक पालकांसाठी प्रेरणादायी आणि पॅरेंटिंग टिप्स म्हणून फायदेशीर ठरतील. (फोटो सौजन्य – रितेश-जिनिलिया इंस्टाग्राम)

​रितेश-जिनिलियाची मुलं कॅमेऱ्याला बघून का जोडतात हात?

रितेश-जिनिलिया हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. त्यामुळे या दोघांचे अनेकदा फोटो काढले जातात. तसेच सेलिब्रिटी कपल्सची मुलं म्हणून त्यांच्या मुलांचे देखील काढले जातात. यावेळी रितेश-जिनिलियाची दोन्ही मुलं राहिल आणि रियान यांचे देखील फोटो काढले जातात. तेव्हा ते दोघं आवर्जून हात जोडतात आणि थँक्यू म्हणतात.

हेही वाचा :  मुंबईत एसी लोकलवर दगडफेक, काचा फोडल्या; डोंबिवली ते ठाकुर्लीदरम्यानची घटना

(वाचा – गरोदरपणात गोंडस बाळाचा फोटो बघून खरंच तसं बाळ होतं, काय म्हणतात डॉक्टर)

​हात जोडण्यामागचं कारण काय?

रितेश-जिनिलिया आपल्या कामाबद्दल मुलांना सांगतात. या कामामुळेच आपले फोटो काढले जातात. आणि तुम्ही आमची मुलं म्हणून तुमचेही फोटो काढतात. पण या फोटोंसाठी तुम्ही काहीच केलेले नाही म्हणून कोणत्याही फोटोग्राफरला तुम्ही फोटो काढताना हात जोडून थँक्यू म्हणणे गरेजे आहे.

(वाचा – ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांची पहिली झलक, मुकेश-नीता यांनी आजी-आजोबा म्हणून केल्या ‘या’ खास गोष्टी))

​रितेश-जिनिलिया पालकांसाठी आदर्श

आपण मुलांना टेक्नॉलॉजीमध्ये वाढताना बघतो. पण रितेश-जिनिलियाने दोन्ही मुलांना मातीशी देखील जोडून ठेवलं आहे. पालकांनी ही गोष्ट देखील या लोकप्रिय जोडीकढून शिकायला हवी. तसेच आपल्या कामाचं महत्व पालकांनीच मुलांना दाखवून द्यायला हवं.

(वाचा – सगळ्यात महागडी आत्या, बाळांची नावे ठेवण्यासाठी ही घेते तब्बल ७ लाख रुपये!)

​पालकांनी मुलांना आपल्या कामाचं महत्व पटवून द्यावं?

व्यवसाय असो किंवा नोकरी पण पालकांनी आपल्या मुलांना याचं महत्व पटवून दिल पाहिजे. नोकरी, व्यवसाय हे किती महत्वाचं आहे. यासोबतच या सगळ्या समजावर सकारात्मक परिणाम होणे गरजेचे आहे. म्हणजे अगदी प्रत्येकाचे पालक सैन्यात नसले तरीही ते जे काम करतात त्याने समाजावर वाईट परिणाम होत नाही. याची जाणीव मुलांना करून द्यायला हवी.

हेही वाचा :  माधुरी दीक्षितनं ‘मेरा दिल ये पुकारे’ गाण्यावरील डान्सचा ट्रेंड फॉलो केल्यानं नेटकरी संतापले

(वाचा – रोहित पवार यांच्या मुलांच्या नावात झळकतोय साधेपणा, तुम्हालाही भावतील ही नावे)

​आपल्या कामापती कृतज्ञ राहायला शिकवा

मुलांना पालक सकाळी उठून कुठेतरी जातात आणि संध्याकाळी घरी परत येतात हे कळतं. पण ते नेमकं कुठे जातात. तेथे जाऊन जो पगार मिळतो त्याचा किती फायदा होतो हे सांगणे गरजेचे आहे. मुलांना उत्तम शिक्षण आणि आवश्यक गोष्टी मिळवून देण्यासाठी पालक कामाला जातात. आणि या कामातूनच मुलांना सगळ्या सुखसोई मिळतात. तर कामाबद्दल आणि कामावरील लोकांबद्दल कृतज्ञ राहायला शिकवणे गरजेचे आहे.

(वाचा – अभिनेत्रीच्या तीन मुलांचे ३ बाप, तिघांसोबत राहून मुलांचे करते संगोपन… काय आहे ही गोष्ट?))

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण?

Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणावरुन महाराष्ट्रातून मोठा संताप व्यक्त होत आहे. 17 वर्षांचा …

मेळघाटात हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी पायपीट, गावात टॅंकर येताच उडते झुंबड

Amravati Melghat Water Problem : हिरव्यागार निसर्गाचा व मनाला भुरळ घालणारा अद्भूत नजरा म्हणजे मेळघाट. …