पालकत्व म्हणजे काय? रितेश – जेनेलियाने दिल्या पॅरेंटिगच्या ४ सोप्या टिप्स

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया डिसोझा – देशमुख (Genelia D’souza) बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय जोडी आहे. या दोघांकडे परफेक्ट कपलसोबतच परफेक्ट पालक म्हणूनही पाहिलं जातं. रितेश आणि जेनेलिया कायमच आपल्या मुलांसोबत क्वालिटी टाइम घालवत असतात. रितेश आणि जेनेलिया त्यांच्या मुलांना कायमच मातीशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. मुलांचं संगोपन करत असताना पालकांमध्ये उत्तम मेळ असणे गरजेचे आहे. मुलांच संगोपन करत असताना पालकांनी नक्की कोणता विचार करायला हवं, हे रितेश – जेनेलिया आपल्या अनुभवातून सांगतात. (फोटो सौजन्य – रितेश देशमुख – जेनेलिया डिसोझा इंस्टाग्राम)

​रितेश – जेनेलियाला दोन मुलं

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझाने 2012 साली लग्न केलं. यानंतर दोघांना दोन मुलं झाली. राहिल आणि रियान अशी या दोघांच्या मुलांची नावे आहेत. रियानचा जन्म २०१४ तर राहिलचा जन्म २०१६ मध्ये झाला आहे. रितेश आणि जेनेलिया या दोघांनी आपल्या मुलांची अतिशय वेगळी नाव ठेवली आहेत.
(वाचा – आलिया भट्टला मुलीकरता आवडलं ‘हे’ नाव, तुम्हालाही वाचून होईल अतिशय आनंद)

हेही वाचा :  मुंबईत भयानक अपघात; कारच्या धडकेत स्कुटीचे 3 तुकडे

बदलांसाठी तयार रहा

मुलं जन्माला आलं की, पालकांच संपूर्ण जीवनच बदलून जातं. या बदलाकडे सकारात्मकपणे पाहा. कारण मुलांच्या जन्मानंतर पालकांची जीवन विचारही केला नसेल असं बदलतं. अशावेळी फार कठोर न होता प्रवाहाबरोबर जाणे ही आदर्श गोष्ट आहे. पालकत्व हे पूर्णवेळचे काम आहे आणि जितक्या लवकर तुम्ही हे स्विकाराल तितक चांगल आहे. “जोपर्यंत तुम्ही पालक होत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये होणारा बदल तुम्ही समजू शकत नाही किंवा अनुभवू शकत नाही.

(वाचा – ‘मुलीच्या जन्मापेक्षा जगात दुसरा कोणताच आनंद नाही’ अक्षयची भावूक पोस्ट, मुलीला बाबाकडून हव्या असतात या 6 गोष्टी)

​हे फक्त आईचे काम नाही

अनेकदा पालकत्वाचे श्रेय थेट आईला दिले जाते, मात्र हे वडिलांचे देखील काम असते. जेनेलिया एक उदाहरण देताना सांगते की, रितेश उत्तम नवरा असून तो खूप चांगला बाबा आहे. रियान असो किंवा राहिल या दोघांची रितेश खूप काळजी घेतो. मुलांच संगोपन करणे हे फक्त आईचेच काम नाही असं रितेश मानतो. त्यामुळे तो देखील मुलांची तेवढीच जबाबदारी घेतो.

(वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स)

हेही वाचा :  RRR : राजामौलींचा 'आरआरआर' लवकरच होणार 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

​पॅटर्निटीची सुट्टी देखील महत्वाची

महिलांना प्रसूती दरम्यान सुट्टी मिळते. तशीच सुट्टी पुरूषांना देखील मिळणे गरजेचे आहे. ही सुट्टी कमी असली तरीही चालेल. पण या काळात पुरूषाला जन्माला आलेल्या बाळाची आणि मातेची काळजी घेता यावी हा यामागचा उद्देश असावा असं रितेश सांगतो.

(वाचा – एबी डिविलियर्सच्या मुलाचं भारतीय नाव, प्रत्येकजण करतंय या नावाचं कौतुक?)

​एकमेकांना आधार द्या

पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या पाठीशी असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरुन दुसऱ्याला खास वाटेल. हे चिंता दूर करण्यास आणि मनशांत करण्यास मदत करते. पालकत्व हे थोडं दमवणारं देखील असतं. आपली कामे आणि मुलांचा सांभाळ हे अनेकदा कठीण जातं. अशावेळी जर तुम्ही दोघं एकमेकांना आधार देता. तेव्हा ही गोष्ट अतिशय सोपी होते.

(वाचा – वडिलांच्या कामाची मुलीला वाटायची लाज, पण मोठी झाल्यावर जे केलं त्यावर विश्वास बसणार नाही)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …