Tips For Exam: कोणतीही परीक्षा असो ‘या’ टिप्स फॉलो केलात तर सहज व्हाल उत्तीर्ण

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 Dec 2022, 6:00 pm

Tips For Exam: अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा या प्रकाराची भीती वाटते. परीक्षा जवळ आली की त्यांना घाम फुटतो, किंवा ते आजारी पडतात. तसेच अनेक वेळा विद्यार्थी एकाच परीक्षेत वारंवार नापास होतो कारण आपण प्रत्येक वेळी त्याच चुका पुन्हा करतो. कोणत्याही परीक्षेची भीती घालविण्यासाठी आणि उत्तीर्ण होण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊया.

 

Tips For Exam
कोणतीही परीक्षा असो या टिप्स फॉलो केलात तर सहज व्हाल उत्तीर्ण

हायलाइट्स:

  • अनेकांना वाटते परीक्षेची भीती
  • वारंवार त्याच चुका करणे टाळा
  • या टिप्स फॉलो करुन सहज व्हा उत्तीर्ण
हेही वाचा :  मुंबई विद्यापीठ आयडॉलचे जानेवारी सत्राचे प्रवेश सुरू
Tips For Exam: अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा या प्रकाराची भीती वाटते. परीक्षा जवळ आली की त्यांना घाम फुटतो, किंवा ते आजारी पडतात. तसेच अनेक वेळा विद्यार्थी एकाच परीक्षेत वारंवार नापास होतो कारण आपण प्रत्येक वेळी त्याच चुका पुन्हा करतो. त्यामुळे वारंवार त्याच चुका करणे तुम्ही टाळले तर परीक्षेत यशस्वी होऊ शकता. कोणत्याही परीक्षेची भीती घालविण्यासाठी आणि उत्तीर्ण होण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊया.

तुमची स्मृती तपासा

जेव्हा तुम्ही मोकळ्या वेळेत बसता तेव्हा तुम्ही तुमची तयारी तपासू शकता. आत्तापर्यंत जे काही शिकले आहे त्याची उजळणी करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला त्यावेळी आठवत असेल याचा अर्थ तुम्ही तयारी केली आहे पण ज्या गोष्टी तुम्ही विसरत आहात, त्याचा पुन्हा सराव करा.

स्वतःचे ऐका

अभ्यास केल्यावर तुम्हाला असे वाटते की सर्वकाही तयार आहे पण नंतर कळते की आपण बरेच काही विसरलो आहोत. त्यामुळे यासाठी उजळणी करणे खूप महत्वाचे आहे. फोनवर तुमचा आवाज रेकॉर्ड करा. झोपताना ऐकून सुधारित केला जाऊ शकतो.

Career Tips: येत्या ५ वर्षांत तुम्हाला काय करायचे आहे? करिअर प्लानिंगचा होईल खूप फायदा; टिप्स जाणून घ्या

हेही वाचा :  हजारो लोकांच्या नोकऱ्या जाणार! २ अमेरिकन कंपन्यांतील कपातीमुळे आशियातील कर्मचाऱ्यांना फटका

गोष्टी डोळ्यासमोर आणा

अनेक लोकांना पाहिल्यानंतर गोष्टी लवकर लक्षात राहतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी इंटरनेट, ग्राफिकच्या मदतीने गोष्टी समजावून घ्या. केवळ वाचनाच्या तुलनेत चित्र, चार्ट किंवा आकाराद्वारे दिलेली माहिती लक्षात ठेवायला खूप सोपी असेल तर या टिप्सचा अवलंब करता येईल.

वारंवार नोट्स लिहा

लिहिण्याने वाचण्याचे अनेक फायदे आहेत. लिहून लक्षात ठेवा असा सल्ला अनेकजण देतात. नोट्स लिहिल्याने लक्षात ठेवण्यास मदत होते. तसेच आपले लेखन सुधारते. परीक्षेपूर्वी स्वत:हून लिहिलेल्या नोट्स बनवा आणि त्या पाहिल्यावर तुम्हाला वाचलेल्या गोष्टी आठवतील. काही महत्त्वाची बाब असल्यास ती लिहून काढा. तुम्ही वारंवार येत-जाता अशा ठिकाणी या नोट्स चिकटवून ठेवा.

UPSC Preparation: यूपीएससीची तयारी कधीपासून सुरु करायला हवी? जाणून घ्या योग्य वेळ
Career Tips: अनुभव नसला तरी सहज मिळेल चांगल्या पगाराची नोकरी, जाणून घ्या ५ टिप्स

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

हेही वाचा :  IGNOU तर्फे टीईई जून २०२१ च्या विद्यार्थ्यांना यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या परीक्षेतून सवलत

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …