Online MBA Course: तरुणांसाठी आनंदाची बातमी, आता घरबसल्या ‘एमबीए’ची संधी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पूर्णवेळ ऑनलाइन अभ्यासक्रमाला मान्यता दिल्यानंतर, आता सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने ऑनलाइन एमबीए अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘सीओईपी’सारख्या नामांकित शैक्षणिक ब्रँडच्या माध्यमातून कमी खर्चात एमबीएचा अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे ‘सीओईपी’ने खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या वर्किंग प्रोफेशनल्ससाठी एक्झिक्युटिव्ह एमटेक सुरू करण्याचाही निर्णय घेतला आहे.

पारंपरिक पदवीची समकक्षता प्रदान

‘यूजीसी’ने गेल्या काही दिवसांत ऑनलाइन, दूरस्थ आणि नियमित पदवी अभ्याक्रमांच्या अनुषंगाने निर्णय जाहीर केले आहेत. त्यानुसार ऑनलाइन, दूरशिक्षणाद्वारे मिळणाऱ्या पदवी, पदव्युत्तर पदवीला कॉलेज, विद्यापीठांमध्ये पूर्णवेळ शिकल्यानंतर मिळणाऱ्या पारंपरिक पदवीची समकक्षता प्रदान केली आहे. या निर्णयामुळे ऑनलाइन आणि दूरशिक्षण पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

त्याचप्रमाणे आगामी काळात कमी शुल्कात परवडणारे शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. हीच संधी साधून सरकारी विद्यापीठ असणाऱ्या ‘सीओईपी’ने विद्यार्थ्यांना एमबीए आणि तर वर्किंग प्रोफेशनल्सना एमटेक अभ्यासक्रम शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली आहेत.

प्रवेश परीक्षा द्यावी लागणार

सध्या राज्यातील काही अभिमत विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचा अभ्यासक्रम शिकता येतो. सरकारी विद्यापीठांमध्ये मात्र, अशी सुविधा नाही. त्यामुळे ‘सीओईपी’ विद्यापीठाकडून ऑनलाइन पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. अभ्यासक्रमात प्रात्य़क्षिकाचा भाग म्हणून इंटर्नशिप, असाइनमेंट कराव्या लागणार आहेत. या अभ्यासक्रमासाठी पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्याला विद्यापीठाची प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. अभ्यासक्रमाचे शुल्कही विद्यार्थ्यांना परवडेल, असेच राहणार असल्याचे कुलगुरू डॉ. मुकुल सुतावणे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या माहितीसाठी आणि प्रवेश परीक्षेसाठी विद्यापीठाच्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :  Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनाला स्टेजवरुन बोलण्यासाठी 'हे' घ्या संपूर्ण भाषण, टाळ्यांचा कडकडाट होईल

BCom विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, २०२३ मध्ये ‘या’ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार

‘डेटा सायन्स’ला उत्तम प्रतिसाद

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील खासगी कंपन्यांची गरज ओळखून, त्यांच्या सहकार्याने वर्किंग प्रोफेशनल्ससाठी ‘एमटेक इन डेटा सायन्स अँड सिक्युरिटी’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यातच पुढे आता ‘एमटेक इन इलेक्ट्रिक मोबिलिटी’ आणि ‘एमटेक इन इंडस्ट्रिअल आयओटी’ असे नवे अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत पडताळणी सुरू आहे. येत्या काही दिवसांत हे अभ्यासक्रम सुरू होतील.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने उद्योगांना लागणाऱ्या मनुष्यबळाची गरज ओळखून पदव्युत्तर स्तरावरील नवे अभ्यासक्रम तयार केले आहेत. याबाबत नियामक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात येईल.
– डॉ. मुकुल सुतावणे, कुलगुरू, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ

Good News For Students: सरकारी शाळामध्ये मिळणार परकीय भाषांचे धडे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमांच्या गुणपत्रिकांचा गोंधळ

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …