यकृतामधील घाणेरड्या फॅटला एका झटक्यात खेचून काढेल ‘हा’ आयुर्वेदिक उपाय, फक्त कसा घ्यायचा ते पाहा

फॅटी लिव्हर एक गंभीर आणि झपाट्याने वाढणारा आजार आहे. धक्कादायक बाब अशी आहे की, प्रत्येक व्यक्ती दारू पित नाही. तरी देखील यामध्ये अडकतो. याला नॉन एल्कोहलिक फॅटी लिव्हर रोग (NAFLD) या नावाने ओळखलं जातं. या आजारामुळे यकृताला सूज येते. याचा संपूर्ण परिणाम शरीरावर होत असतो.

फॅटी लिव्हरमागे काय कारणे असू शकतात? जर तुम्ही साखरेचे सेवन अधिक प्रमाणात करत असाल तर याचा परिणाम होतो. कारण पचनाला कठीण असणारे पदार्थही फॅटी लिव्हरला कारणीभूत आहेत. तसेच एक्सरसाइज न करणे, सुस्त जीवनशैली यामुळे यकृतात फॅट जमा होतात. असं म्हटलं जातं की, फॅटी लिव्हरचा सुरूवातीला नाही पण याचं प्रमाण वाढलं तर यकृताला सूज येते. ही गोष्ट यकृताकरता घातक आणि हानिकारक असते.

फॅटी लिव्हरची लक्षणे आणि उपाय काय? पोटदुखी, पोट भरल्यासारखे वाटणे, मळमळ होणे, भूक न लागणे किंवा वजन कमी होणे, फिकट गुलाबी त्वचा आणि कावीळ, सूज येणे, थकवा येणे किंवा कमकुवत वाटणे, यकृताच्या कार्यावर परिणाम होत असल्याने लक्षणे जाणवू शकतात. अनेक वैद्यकिय उपचार आहेत. पण आयुर्वेदिक डॉक्टर मिहीर खत्री तुम्हाला त्यावर एक सोपा आयुर्वेदिक उपचार सांगतात.

हेही वाचा :  ...अन् 10 हजारांची खेळणी घेऊन राज ठाकरे 'या' 12 वर्षीय पुणेकराच्या घरी पोहोचले

​फॅटी लिव्हरवर कोरफड महत्वाची

डॉ मिहीर यांच्या मते, कोरफड यकृतासाठी उत्तम आहे. यामुळे यकृताचे कार्य सुधारते. हे यकृतामध्ये साठलेली घाणेरडी चरबी काढून टाकते. ज्यांना वारंवार कावीळ होत आहे किंवा ज्यांना पूर्वी काविळीचा त्रास होत होता त्यांच्यासाठी देखील हे चांगले आहे.

(वाचा – Food For Constipation: जुन्यातील जुना बद्धकोष्ठतेचा समूळ नाश करतील हे ६ पदार्थ, आतड्यांमधली घाण काढून टाकतील)

फॅटी लिव्हरकरता आवळा-ऍलोविरा ज्यूस महत्वाचा

​कसा कराल वापर

जर तुम्ही फॅटी लिव्हर किंवा कावीळ यासारख्या गंभीर आजारांनी त्रस्त असाल किंवा कधी ग्रस्त असाल तर तुम्ही आवळ्याचा रस रोज प्यावा. यासाठी 10 मिली कोरफडीचा रस आणि 10 मिली आवळ्याचा रस समान प्रमाणात पाण्यात मिसळून सकाळी नाश्त्यापूर्वी एकदा प्या.

(वाचा – Kidney Health Tips: मळमळ, खाज सुटणे ही खराब किडनीची लक्षणे, वाढत्या क्रिएटिनला काय जबाबदार?)

​आहाराची घ्या विशेष काळजी

ही गंभीर समस्या टाळण्यासाठी तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यात तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करायला हवा. पचायला जड अन्न टाळावे, भूक लागेल तेव्हा खावे, रात्री जड अन्न खाऊ नये आणि जेवल्यानंतर लगेच झोपू नये.

हेही वाचा :  शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस पक्ष फुटणार? आमदारांचा मोठा गट भाजपत जाणार?

(वाचा – Guava For Cholesterol : घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी करतोय पेरू, नसा साफ होण्यासाठी ठरतोय वरदान)

​सकाळी कोमट पाणी प्या

यकृत निरोगी आणि मजबूत करण्यासाठी, तुम्ही लवकर झोपले पाहिजे आणि दररोज लवकर उठले पाहिजे. याशिवाय सकाळी उठल्यावर १-२ ग्लास कोमट पाणी प्या.

(वाचा – ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी पोटभर खा ‘शिंगाडा’, अनेक पॉइंटने कमी होईल बीपी)

​दररोज व्यायाम महत्वाचा

यकृत निरोगी आणि मजबूत होण्यासाठी दररोज व्यायाम करणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तुम्ही सकाळी उठून चालणे, धावणे, योगा किंवा जिममध्ये काही व्यायाम करू शकता.

(वाचा – Ayurvedic Therapy Hridya Basti : ‘या’ आयुर्वेदिक उपायाने हृदयाचे आरोग्य राहील निरोगी, रक्ताभिसरण होईल सुरळीत)

​तणावापासून राहा दूर

यकृत निरोगी ठेवण्याचा सर्वोत्तम आणि सोपा उपाय म्हणजे तणाव टाळणे. सामान्य जीवनात तणाव टाळणे सोपे नाही. पण 10 मिनिटे प्राणायाम केल्याने तुम्हाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

(वाचा – ३६ व्या वर्षी फेशियल पॅरालिसिस ९० किलो वजनामुळे गमावला आत्मविश्वास, या भाजीमुळे काही महिन्यात केला Weight Loss)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

हेही वाचा :  वावर हाय तर पॉवर हाय! रुबाबात बैलगाडी हाकत वऱ्हाड घेऊन निघाला नवरदेव



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …