‘आमदार निवास’मध्ये सनी लिओनी!, शांताबाई  गाण्यावर थिरकणार

sunny leone Latest Marathi songs : आमदार निवासमध्ये सनी लिओनी आमदार निवासात! चक्लावलात ना? पण ही बातमी अगदी खरी आहे. सनी लिओनी आमदार निवास या मराठी चित्रपाट गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. आमदार निवास या चित्रपटातील शांताबाई या गाण्यावर सनी लिओनी थिरकताना दिसणार आहे. काही वर्षांपूर्वी सनी लिओनी आमदार निवासात दिसली होती, त्यावेळी चर्चेला उधाण आले होते.

अभिनेत्री सनी लियोनीने बॉलीवूड मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आता सनी लिओनीने प्रादेशिक सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला आहे. तेलगू ,तामिळ, मल्याळम आणि कन्नड दर्शकांना उत्कृष्ट अदा दाखवल्यांनतर सनी मराठीमध्ये गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. आमदार निवास या चित्रपाटात आयटॉम साँग करताना सनी लिओनी दिसणार आहे. दरम्यान,  यापूर्वी सनीने बॉईज या मराठी चित्रपटाच्या ‘कुठं कुठं जायच हनिमूनला’ या गाण्यावर थिरकून मराठी प्रेक्षकांची मन जिंकली होती.

लवकरच सनी लियोनी संजीव कुमार राठोड निर्मित व दिग्दर्शित मराठी चित्रपट आमदार निवासामध्ये ‘शांताबाई’ या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. आगामी आमदार निवास या चित्रपटाच्या निमित्ताने सनी आपल्याला आधुनिक शांताबाई रूपाने भेटणार आहे. या मराठी आयटम साँगची बॉलीवुडने सुद्धा दखल घेतली असून या गाण्याची चर्चा बॉलीवूडमध्ये जोरदार सुरु आहे.  आधुनिक ‘शांताबाई’चा अवतार पाहायला सगळेच  उत्सुक आहेत.

हेही वाचा :  दीपिकाच्या फिफा वर्ल्ड कपच्या रिल व्हिडीओला यशराज मुखाटेनं दिला म्युजिकल ट्विस्ट

2015 मध्ये शांताबाई या गाण्याने महाराष्ट्रात धुमाकुळ  घातला  होता. आतापर्यंत युट्युबवर या गाण्याला 85 कोटीहुन जास्त व्हीज मिळाले आहेत. या गाण्याचे मालकी हक्क सुमीत म्युझिकच्या मालकीचे होते. हे हक्क आता जय जगदंब प्रोडक्शनने घेतले असून महाराष्ट्राची आधुनिक ‘शांताबाई’ म्हणून सनी लियोनी दिसणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर विष्णू देवा याने या आयटम साँगचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तर संजय लोंढे यांचं मूळ गीत असलेलं हे गाणं नितीन सावंत यांनी पुर्ननिर्मित करून या गाण्याला आधुनिकतेची झालर घातली आहे. ‘शांताबाई’ या गाण्याची भव्यता आणि गावरान बाज असलेल्या ‘सनी लिओनी’ची दिलखेच अदांनी प्रेक्षकांचा काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान, ‘आमदार निवास’  हा चित्रपट सत्य घटनेवर प्रेरित असून सामाजिक दृष्टया दुर्लक्षित अशा विषयावर भाष्य करतो. सामाजिक आणि राजकीय गोष्ट सांगणारा चित्रपट आमदार निवास लवकरच चित्रपट गृहात प्रेक्षकांच्या मनोरंजनास सज्ज होणार आहे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …