रिअॅलिटी शोमध्ये झाली नजरानजर, मग झाली सहमती, अशी सुरू झाली फरहान आणि शिबानीची प्रेमकहाणी

Farhan Akhtar Shibani Dandekar Love Story : अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) उद्या म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. फरहान आणि शिबानी यांनी त्यांचे प्रेम कधीच लपवून ठेवले नाही. या दोघांनीही अनेकवेळा चाहत्यांसमोर किंवा सोशल मीडियावर आपले प्रेम जाहीर केले आहे. परंतु, चाहत्यांना या जोडीची प्रेमकहाणी जाणून घ्यायची आहे. फरहान आणि शिबानी यांची प्रेमकहाणी कधी? आणि केव्हा सुरू झाली? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.  

फरहान आणि शिबानी यांची पहिली भेट एका रियालिटी शोमध्ये झाली होती. 2015  मध्ये  ‘आय कॅन डू इट’ या रियालिटी शोमध्ये फरहान अख्तर होस्ट होता. तर शिबानी दांडेकर, मंदिरा बेदी , भारती सिंह आणि वीजे बानीसह आणखी काही जण या शोमध्ये स्पर्धक होते. या रियालिटी शो दरम्यानच फरहान आणि शिबानी यांची प्रेमकहाणी सुरू झाल्याचे बोलले जात होते. कारण हे दोघेही याच ठिकाणी एकमेकांच्या जवळ आल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे सोशल मीडियावर या दोघांच्या नात्यावर चर्चाही होऊ लागल्या होत्या.  
 
फरहान आणि  शिबानीनेही चाहत्यांना जास्त वेळ प्रतिक्षा करू दिली नाही. शिबानीने एकदा मिस्ट्री मॅनसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामध्ये ती त्याचा हात धरून चालत होती. मिस्ट्री मॅनच्या फोटोचा मागील भाग दिसत होता. परंतु, नेटकऱ्यांनी फरहानला ओळखलेच. 

या पोस्टनंतर दीपीका पदुकोण आणि रणवीर कपूर यांच्या लग्नात शिबानी आणि फरहान एक मेकांच्या हातात हात घालून आलेले पाहायला मिळाले होते. 2020 मध्ये शिबानीने आपल्या गळ्यावर फरहानच्या नावाचा टॅटू बनवला होता. त्यावेळीही सोशल मीडियावर या दोघांच्या प्रेमकहाणीविषयी चर्चा होऊ लागली. शिवाय दोघांनीही अनेक वेळा क्लोज फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.  

फरहान अख्तर हा पहिली पत्नी अधुना भबानीपासून वेगळा झाला आहे. फरहान आणि अधुना यांनी लग्नाच्या 16 वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. फरहानला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. 

महत्वाच्या बातम्या

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘काला’ मधील गाण्याचा व्हिडीओ व्हायरल; अनुष्का शर्माला पाहून नेटकरी झाले खुश

Qala: दिवंगत अभिनेते इरफान खान (Irrfan Khan) यांचा मुलगा बाबिल खान (Babil Khan) यानं अभिनय …

पा. रंजीत यांनी शेअर केला ‘चैत्यभूमी’ डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर

Chaityabhumi:  काला, कबाली, मद्रास यासारखे प्रसिद्ध सिनेमे करणारा दिग्दर्शक पा रंजीत (Pa.Ranjith) यांनी टाटा इन्स्टिट्यूट …