IND vs WI, 2nd T20: भारताची तडाखेबाज फलंदाजी, वेस्ट इंडीजसमोर 187 धावांचे लक्ष्य

IND vs WI, 1 Innings Highlight: भारत आणि वेस्ट इंडीज(IND vs WI) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात (2nd T20) वेस्ट इंडीजने गोलंदाजी निवडल्याने भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. दरम्यान भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळी करत स्कोरबोर्डवर 186 धावा लावल्या. विराट आणि पंतने अप्रतिम अर्धशतक लगावलं. त्यामुळे आता विजयासाठी वेस्ट इंडीजला 20 षटकांत 187 धावा करायच्या आहेत. 

कोलकात्याच्या ईडन गार्डन (Eden Garden) मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजचा कर्णधार पोलार्डने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर रोहित शर्मा आणि ईशान किशन सलामीला आले. किशन 2 धावा करुन बाद झाला. तर रोहित 19 धावा करुन तंबूत परतला. पण विराट कोहली आज भल्यातच फॉर्ममध्ये दिसत होता. पण अर्धशतक पूर्ण होताच तो त्रिफळाचित झाला आणि 52 धावा करुन तंबूत परतला. सूर्यकुमारनेही 8 धावा केल्या. पण त्यानंतर पंत आणि व्यंकटेश यांनी धमाकेदार फलंदाजी करायला सुरुवात केली. अय्यर 33 धावा करुन बाद झाला. पण पंतने नाबाद अर्धशतक (52) झळकावत भारताची धावसंख्या 186 पर्यंत पोहोचवली. ज्यामुळे आता विजयासाठी विडींजला 187 धावांची गरज आहे. विडींजकडून रोस्टन चेसने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर शेफर्ड आणि कॉट्रेल यांनी 1-1 विकेट घेतली. 

हेही वाचा :  Indian Team : विश्व क्रिकेटवर टीम इंडियाचं वर्चस्व! प्रत्येक ठिकाणी भारतीय आघाडीवर

दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघ (India’s T20I squad) 

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकिपर), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल

दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी वेस्ट इंडीज संघ (WI T20I squad) 

ब्रँडन किंग, काईल मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकिपर), रोवमॅन पोवेल, कायरन पोलार्ड (कर्णधार), रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, अकेल होसेन, ओडेन स्मिथ, जेसन होल्डर, शेल्डॉन कॉट्रेल

हे ही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Steve Smith IPL 2023 : स्मिथ करणार आयपीएलमध्ये पुनरागमन, स्वत:च व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

IPL 2023 News : आयपीएलचा आगामी हंगाम अर्थात 16 वा सीझन काही दिवसांतच सुरु होत …

BCCI च्या आवाहनानंतर ICC चा मोठा निर्णय; इंदूरच्या खेळपट्टीची रेटिंग बदलली

India vs Australia Indore Test Pitch: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील चार …