कन्यादान म्हणजे नेमकं काय? वडील मुलीचं भावनिक नातं

घरात लक्ष्मी जन्माला आली की सर्वांनाच आनंद होतो पण सर्वात जास्त आनंद होतो तो वडिलांना असं नेहमीच म्हटलं जातं. मुलीच्या जन्मापासून तिचं लग्न होईपर्यंत तिला प्रत्येक घरात जपलं जातं. वडील मुलीचं नातंही खास असतं. मुलीचं लग्न करताना अनेक विधी केले जातात. पण त्यात वडील – मुलीचं नातं अधिक घट्ट करणारा आणि अधिक भावनिक असा जर कोणता विधी असेल तर तो म्हणजे कन्यादान. पुण्यवचनाच्या विधीपासून सुरू झालेला विवाहसोहळा कन्यादानाच्या विधीपर्यंत प्रचंड भावनिक होतो. लग्नसोहळ्यातील विधी आपल्याला नावाने माहीत असतात पण त्याचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का? याच कन्यादानाचे नक्की महत्त्व काय आणि हा विधी का करावा, तसंच कन्यादानाची ही प्रथा कशी सुरू झाली याचा इत्यंभूत इतिहास.

कन्यादान म्हणजे काय?

हिंदू धर्मातील लग्नसोहळ्यात कन्यादानाचे अपरंपार महत्त्व आहे. लग्नातील सर्वात महत्त्वपूर्ण संस्कारांपैकी हा एक संस्कार मानला जातो. कन्यादान अर्थात दुसऱ्या मुलाच्या हाती आपल्या मुलीला सोपवणे असा अर्थ सहसा मानला जातो. मात्र कन्यादानाचा हा अर्थ नाही. तर हिंदू लग्नामध्ये एकूण २२ चरण असतात. यामधील कन्यादान अत्यंत महत्त्वाचा चरण आहे. या संस्कारामध्ये मुलीचे वडील केवळ आपली मुलगी दान करत नाहीत, तर अग्निला साक्षी ठेऊन आपल्या मुलीचे गोत्र दान करतात. यानंतर मुलगी आपल्या माहेरचे अर्थात वडिलांच्या कुळाचे गोत्र सोडून आपल्या पतीच्या म्हणजेच नवऱ्याच्या वंशाचे गोत्र धारण करते. त्यामुळेच कन्यादानाला महत्त्व प्राप्त होते. याशिवाय कन्यादान हे सर्वात मोठे पुण्य असल्याचेही पूर्वपरंपरागत समजण्यात येते. इतकंच नाही तर परंपरेनुसार मंत्रोच्चारणादरम्यान मुलाकडून आपल्या मुलीला कायम सुखात ठेवण्याचे वचनही वडील मागून घेतात आणि आपल्या मुलीची सुरक्षा, आनंद याची जबाबदारी आपल्याप्रमाणेच मुलाने सांभाळावी असं सांगून वडील मुलीला त्याच्याकडे सुपूर्द करतात. कन्यादान हे वडील आणि मुलीच्या नात्याचा अनोखा सोहळा मानला जातो.

हेही वाचा :  अनुष्का शर्माचे हटके अंदाज, गळ्यातील लॉकेटने वेधले लक्ष

(वाचा – Live In Relationship मुळे शोषण वाढतेय का, मुलींना का येत आहेत मारहाणीचे अनुभव, यातून बाहेर पडण्यासाठी कसे वागाल)

कन्यादानाचे महत्त्व

हिंदू धर्मात कन्यादानापेक्षा मोठे कोणतेही दान मानले जात नाही. शास्त्रात सांगण्यात आल्यानुसार मुलीच्या वडिलांना आणि कुटुंबाला याचे अधिक पुण्य प्राप्त होते. या विधीनंतर मुलगी सर्वस्वी सासरच्या लोकांची होते. माहेरच्या लोकांशी असणारे तिचे बंध आणि सासरी सुख घेऊन जाण्याचे तिचे दिवस सुरू होतात. तसंच माहेर आणि सासर जोडून सर्वांशी सुखसमाधानाने वागत घरात आनंद निर्माण करावा अशीच या विधीकडून अपेक्षा असते.

(वाचा – माझी कहाणी: माझ्या चुलत भावच्या पत्नीच्या डोळ्यात मी खुपतेय, कारण ऐकून हादरुन जाल)

कन्यादान कसे केले जाते?

लग्नात कन्यादान करणे हे महत्त्वाचे असून अत्यंत भावनिक ठरते. ज्यांना कन्यादानाची पद्धत माहीत नाही त्यांच्यासाठी या स्टेप्स –

  • कन्यादान करताना सर्वात पहिल्यांदा मुलीची आई तिच्या हातावर हळद लावते. मुलीला हळद कुंकू लाऊन तिच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करते.
  • यानंतर मुलगा मुलीचा हात पकडून तिची जबाबदारी आणि आनंद याचा संकल्प घेतो
  • त्यानंतर आई वडिलांच्या हातावर पळीने पाणी सोडते आणि मग मुलीच्या हातावर हात ठेवत गुप्तदान धन आणि फूल ठेवत संकल्प सोडतात आणि आपल्या मुलीचा हात मुलाच्या हातात देतात
  • यानंतर आपली मुलगी संपूर्णतः आता दुसऱ्यांची जबाबदारी झाली असे समजून मुलीला लग्नात सुपूर्द करण्यात येते आणि कन्यादानाचा विधी पूर्ण होतो
हेही वाचा :  बाबो...1,53,000 किंमतीच्या ग्रीन थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये नोरा फतेहीने दिले किलर पोज

(वाचा – शाळेत पाहताक्षणी पडले प्रेमात, मराठमोळ्या अजिंक्य राहणे आणि राधिकाची ‘बचपन का प्यार’ वाली लव्हस्टोरी)

काय आहे कन्यादानाचा इतिहास? कशी सुरू झाली प्रथा?

आपण नेहमी लग्नात हा विधी पाहतो. बरेचदा हा विधी नक्की कसा सुरू झाला असेल असा प्रश्नही मनात येतो. मात्र याचं उत्तर बऱ्याच जणांना ज्ञात नसते. खरं तर पौराणिक कथेनुसार, पहिले प्रजापति दक्ष या राजाने आपल्या मुलीचे कन्यादान लग्नात करण्याची प्रथा सुरू केली असं म्हटलं जातं. प्रजापति दक्ष राजाने आपल्या २७ मुलींचे ज्यांना नक्षत्र असे म्हटले जाते त्यांचे कन्यादान चंद्राला केले होते. या सृष्टीचे संचालन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी आपल्या २७ मुलींचे लग्न चंद्रासह लावत दक्ष राजाने त्यांचे कन्यादान केले आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली असा समज आहे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …